मुंबईतल्या गोरेगावामधील नागरी निवारा संकल्प गणपती मंदीर येथे दर्शन घेत येथील उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी नुकतीच आपल्या प्रचाराची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांशीही संवाद साधला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मागिल आठवड्यात गोरेगाव, दिंडोशी व जोगेश्वरी

येथे जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित केली होती.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाव निश्चित झाल्याने पक्षाचे उपनेते अमोल कीर्तिकर यांनी आपल्या प्रचाराला नागरी निवारा संकल्प गणेश मंदिरात दर्शन घेत सुरुवात केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक कट्टा प्लॉट नं. 6 व कृष्णा कावेरी येथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मुंबईचे माजी उपमहापौर सुहास वाडकर, शाखाप्रमुख संदीप जाधव तसेच वार्ड क्र. 41चे माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, शाखाप्रमुख संपत मोरे व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.