Homeएनसर्कलप्रत्यक्ष कर संकलनात...

प्रत्यक्ष कर संकलनात 12.73% ची वाढ!

2023-24 या आर्थिक वर्षातील 17.06.2023 पर्यंतची प्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी, निव्वळ संकलन 3,79,760 कोटी रुपये झाल्याचे दर्शवते, हे कर संकलन मागील आर्थिक वर्षाच्या 3,41,568 कोटींच्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या तुलनेत 11.18% ची वाढ दर्शवते. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन  (17.06.2023 रोजी) रु. 3,79,760 कोटीमध्ये कॉर्पोरेशन   कर (सीआयटी) 1,56,949 कोटी रुपये (निव्वळ परतावा) आणि वैयक्तिक प्राप्तिकर कर (पीआयटी) यासह सिक्युरिटीज व्यवहार कराचा (STT) रु. 2,22,196 कोटी (निव्वळ परतावा) समावेश आहे.

आर्थिक वर्ष  2023-24 साठी प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन (परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) मागील आर्थिक वर्षातील 3,71,982 कोटी रुपयांच्या तुलनेत 4,19,338 कोटी रुपये आहे, आर्थिक वर्ष 2022-23 च्या संकलनाच्या तुलनेत या  संकलनाने  12.73% ची वाढ नोंदवली आहे.

4,19,338 कोटी रुपयांच्या एकूण कर संकलनामध्ये 1,87,311 कोटी रुपयांचा कॉर्पोरेशन कर आणि 2,31,391 कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज व्यवहार करासह वैयक्तिक प्राप्तिकर समाविष्ट आहे. 17.06.2023 पर्यंत आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीसाठी अग्रीम कर संकलन रु.1,16,776 कोटी आहे, हे कर संकलन आधीच्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या रु. 1,02,707 कोटींच्या   अग्रीम कर संकलनाच्या तुलनेत 13.70% ची वाढ दर्शवते.

17.06.2023 रोजी नोंदवण्यात आलेल्या 1,16,776 कोटी रुपयांच्या अग्रीम कर संकलनामध्ये कॉर्पोरेशन कर (सीआयटी) 92,784 कोटी रुपये आणि वैयक्तिक प्राप्तिकर (पीआयटी) 23,991 कोटी रुपये समाविष्ट आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 17.06.2023 पर्यंत 39,578 कोटी रुपयांचा परतावा देखील जारी करण्यात आला आहे, मागील आर्थिक वर्ष 2022-23 मधील त्याच कालावधीत जारी केलेल्या 30,414 कोटी रुपयांच्या परताव्याच्या तुलनेत हा परतावा  30.13% ची वाढ दर्शवितो.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content