Homeपब्लिक फिगरअजितदादा याच महिन्यात...

अजितदादा याच महिन्यात भेटणार अमित शाहंना

ऊस उत्पादकांचे नुकसान टाळण्यासाठी ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने कायम ठेवावे. त्याचप्रमाणे इथेनॉलचा दर ३१ रुपयांवरुन ४२ रुपयांपर्यंत वाढविण्यात यावा, या मागण्यांसाठी याच महिन्यात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली.

जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देण्याचे केंद्राचे धोरण होते. त्यासाठीच्या प्रकल्पनिर्मितीस

अजित

सहा टक्के व्याजदराने कर्जही उपलब्ध करण्यात आले. परंतु नंतरच्या काळात साखरेचे दर नियंत्रित ठेवणे आणि साखरेचा तुटवडा टाळण्यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीबाबतच्या धोरणात बदल केला. परंतु आता राज्यात आणि देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असल्याने ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीस बंदी घालण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

यासंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी अनौपचारिक चर्चा झाली असून त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर महिन्याभरात त्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गेल्या काही वर्षांत एफआरपीमध्ये वाढ झाली. त्याच प्रमाणात एमएसपीही वाढण्याची गरज आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या हिताचा विचार करुन यासंदर्भात निर्णय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Continue reading

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...

शरद पोंक्षेंच्या विधानाने खळबळ, भाजपाई अस्वस्थ!

प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि सावरकरभक्तीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. "मी भाजपसारखे दहा पक्ष उभे करू शकतो," असे खळबळजनक विधान पोंक्षे यांनी केल्यामुळे राजकीय...
Skip to content