Thursday, November 21, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजएआय गप्पिष्ट आणि...

एआय गप्पिष्ट आणि एकाकीपणा..

एकाकीपणा काय असतो हे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळते असे मानले जाते. मानसशास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिक हे दोघेही शारीरिक आणि मानसिक अशा वेगवेगळ्या प्रकारांनी एकाकीपणाकडे बघतात असे दिसते. एकाकीपणा घालवण्यासाठी सर्वात चांगला मार्ग असतो तो संवादाचा. पण संवादाला किमान दोन व्यक्ती लागतात आणि एकाकी माणसाचा प्रश्न अशी व्यक्ती भेटेल का? हाच असू शकतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हा प्रश्न कदाचित काही प्रमाणात सोडवला जाऊ शकेल अशी कल्पना आहे. त्यातच अमेरिकेचे सर्जन जनरल म्हणजेच सर्वात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी असलेले विवेक मूर्ती यांनी २०२३मध्येच नागरिकांसाठी एक सल्ला दिला आहे. त्यात ते म्हणतात की, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात एका नव्या साथीच्या रोगाचे निदान झाले असून याचे नाव ‘एकाकीपणा’ असे आहे. आपण कुटुंबापासून किंवा समाजापासून विभक्त झालो आहोत या विचारातून एकाकीपणा येतो आणि हळूहळू तो वाढत जातो. आता या विषयाबद्दल प्राथमिकता दाखवली गेली आहे.

भारताच्या बाबतीत एकाकीपणाचे प्रमाण ४५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांसाठी २०.५ टक्के असून त्यापैकी १३.३ टक्के लोक तीव्र अशा एकाकीपणाचे रोगी असतात अशी माहिती मिळते. भारतात एकाकीपणा हा सामाजिक-आर्थिक आव्हानांमधून निर्माण होण्याचे प्रमाण अधिक आहे. एकाकीपणाचे कारण सामाजिक व्यवहारातून गाळले जाणे, प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा एखाद्या समाजात अथवा नात्यात बिघडलेले संबंध असू शकते. नैराश्यदेखील एकाकीपणा आणू शकते. परंतु एक निश्चित असे कारण सांगता येणार नाही. जागतिक पातळीवर एकाकीपणाचे प्रमाण ३३ टक्के असून ब्राझील या देशात हे प्रमाण तेथील अशा लोकांच्या सांगण्यानुसार प्रचंड म्हणजे ५० टक्क्यांपर्यंत आहे. त्यात कधीकधी, बरेचदा आणि नेहमीच अशी वर्गवारी केलेली असते.

भारतात एकाकीपणाने ग्रस्त लोकांना शारीरिक व्यायाम आणि कोणत्याही आवडीच्या कामात वेळ घालवणे असे काही उपाय सांगितले जातात. मात्र हा प्रकार कशामुळे निर्माण झाला आहे याच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेतला गेला तर उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण वाढू शकते. पुरुषांपेक्षा महिलांना एकाकीपणाचा त्रास होण्याचे प्रमाण अधिक आहे.
आता अत्याधुनिक विज्ञानाने यासाठी काय केले आहे ते बघू.

एकाकीपणा

आपल्या सर्वांना आता कृत्रिम बुद्धिमत्ता माहित आहे. ती आज जगात अनेक नव्या संशोधनाला जन्म देत आहे आणि दररोज नवीन एखाद्या क्षेत्रात आपली कामगिरी दाखवत आहे. याच कृत्रिम बुद्धिमत्तेमधून निघालेली एक कल्पना प्रत्यक्षात येऊ लागली आहे. ‘चॅटबॉट” असे या शोधाचे नाव असून ही एक गप्पिष्ट म्हणता येईल अशी प्रतिमा असते आणि ती आपल्या मोबाईलवर अथवा संगणकावर दिसू शकते आणि संवाद साधू शकते. इतकेच नव्हे तर ही प्रतिमा हुशार असून तुम्ही जो विषय सुरु कराल त्यात ती तुमच्याशी संवाद साधू शकते.

मुळात एकाकीपणा हा दोन व्यक्तींचा संवाद बंद झाल्यामुळे येत असल्याने असे कुणी हवे तेव्हा बोलायला येणार असले तर एकाकीपणा काही प्रमाणात का होईना दूर होऊ शकेल अशी कल्पना आहे. पण कोणत्याही तंत्रज्ञानात सध्या फायदे दिसत असले तरी कालांतराने हे तंत्रज्ञान आपल्यावर राज्य गाजवू शकते याचा अनुभव आज आपण घेत आहोत. मोबाईलचा प्रसार आणि त्याचा सर्व वयाच्या लोकांसाठी उपयोग असला तरी आज त्यामुळे मोबाईल नसेल तर आपण काहीसे अवघंडतो हे मान्य करावे लागेल. हा मार्ग चांगला असला तरी त्याचा उपयोग नियमित वैद्यकीय सल्ला घेऊन करावा हे ओघाने आलेच.

एकाकीपणा

ए आय गप्पिष्ट हे तुमच्या घरातील निधन पावलेल्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या स्वरूपातदेखील उपलब्ध होऊ शकतात अशी माहिती मिळते. परंतु आपल्याला हे भावनिक दृष्टीने किती पटेल, जमेल आणि उपयोगी ठरेल हे काळच ठरवणार आहे..

Continue reading

दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये असते सुरक्षिततेला महत्त्व

सुरक्षित असतील तर कोणतेही खेळ प्रकार आणि त्यांच्या अगदी जागतिक स्तरावरील स्पर्धासुद्धा नावाजल्या जातील. पण दिव्यांग ऑलिम्पिकमधील सुरक्षितता ही काही वेगळ्या अंगाने बघावी लागेल. कारण येथे शरीर अगोदरच एका भयानक संकटातून पार झाले असते आणि जीवन पुन्हा सुरु करीत...

एक चित्र हजार शब्दांचे… 

एक चित्र जे सांगू शकेल ते हजार शब्दही व्यवस्थित सांगू शकणार नाहीत, अशी एक चिनी म्हण आहे आणि ती अनेकदा आपल्या प्रत्ययालासुद्धा येत असते. जे ऐकले त्याचा जेवढा परिणाम होत नाही तितका परिणाम तेच पाहिले तर अधिक होतो हेही...

बाटलीबंद पाणी पिताय? सावधान!

जगाच्या एकूण ७९५ कोटींच्या लोकसंख्येतील २०० कोटी लोक बाटलीबंद पाणी पितात असा आताचा अंदाज आहे. यापैकी काहींना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर ही पाळी येते तर इतरांना बाटलीतले पाणी पिणे हे सधन असल्याचे लक्षण म्हणून आणि त्याशिवाय एक...
Skip to content