Homeपब्लिक फिगरकृषी मंत्री मुंडे...

कृषी मंत्री मुंडे यांनी पाठवली ‘त्या’ शेतकऱ्याकडे बैलजोडी

शेतात हळद लावण्याआधी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी बैलजोडी नाही म्हणून भावाला व मुलाला कोळप्याला जुंपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी बालाजी पुंडगे यांना काल राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बांधावर बैलजोडी भेट पाठवली.

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. दोन एकर शेतीसाठी बैलजोडी घेणे परवडत नाही आणि ऐनवेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाईगडबडीत सरी काढण्यासाठी त्याने स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला जुंपले होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी काहींनी आवाहनही केले होते.

बैलजोडी

या आवाहनाची दखल घेत मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर काल मुंडे यांच्या वतीने बी. डी. बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुंडगे यांच्या शेतात पोहोचले.

दरम्यान मुंडे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधला. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण बैलजोडी पाठवत असून शेतातल्या कामांसाठी आपण कृषी विभागाकडे संबंधित योजनेतून ट्रॅक्टरसाठीही अर्ज करावा, असे पुंडगे यांना सांगितले. बालाजी पुंडगे यांनीसुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्येसुद्धा काम करून आपण या बैलजोडीचा सांभाळ करू, असा शब्द मुंडे यांना दिला. यावेळी बी. डी. बांगर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी शिरळे गावात उपस्थित होते.

Continue reading

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...

शरद पोंक्षेंच्या विधानाने खळबळ, भाजपाई अस्वस्थ!

प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि सावरकरभक्तीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. "मी भाजपसारखे दहा पक्ष उभे करू शकतो," असे खळबळजनक विधान पोंक्षे यांनी केल्यामुळे राजकीय...
Skip to content