Wednesday, February 5, 2025
Homeचिट चॅटतब्बल २९ वर्षांनंतर...

तब्बल २९ वर्षांनंतर महिला अधिकारी ‘मॅट’वर!

महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी मेधा गाडगीळ यांची महाराष्ट्र प्रशासकीय  न्यायाधिकरण (मॅट)  येथे सदस्य (प्रशासन) या पदावर नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. १९८३ च्या बॅचच्या निवृत्त आयएएस अधिकारी मेधा गाडगीळ यांच्या रूपाने तब्बल २९ वर्षांनंतर महाराष्ट्रात एका महिला अधिकाऱ्यास हा बहुमान मिळत आहे.

मॅटच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांच्या उपस्थितीत नुकतीच मेधा गाडगीळ यांनी सुत्रे स्वीकारली. मेधा गाडगीळ यांनी आपल्या ३६ वर्षांच्या सेवेत  सहाय्यक जिल्हाधिकारी (ठाणे), जिल्हाधिकारी अहमदनगर, सहसंचालक ऊद्योग, संचालक हाफकीन बायो., अप्पर मुख्य सचिव गृह (अपिल) व अ. मु. स. वैद्यकीय शिक्षण यासारख्या अनेक पदांवर काम केले आहे.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content