Homeचिट चॅटअभिनय कौशल्य अभ्यासक्रम...

अभिनय कौशल्य अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया सूरू!

मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या पदव्युत्तर आणि पदविका (पूर्ण वेळ) अभ्यासक्रम, मास्टर ऑफ थिएटर आर्टस् अभिनय कौशल्य पदविका २०२३-२४ वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांनी दिली आहे.

मास्टर ऑफ थिएटर आर्टस् अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा तत्सम दर्जाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले आणि नाटकाचा अनुभव असणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. अभिनय कौशल्य पदविका  अभ्यासक्रमासाठी (वय मर्यादा ३० वर्षापर्यंत) बारावी (H.S.C.) किंवा तत्सम दर्जाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले आणि नाटक, शॉर्ट फिल्म किंवा फिल्ममध्ये अनुभव असणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील.

अभ्यासक्रमाचा कालावधी मास्टर ऑफ थिएटर आर्टस् २ वर्ष पूर्ण वेळ कोर्स अभिनय कौशल्य पदविका १ वर्षाचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ असून दोन्ही अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रक मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसच्या  https://theatreartsdepartmentmu.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ९९८७२१८७७९ या क्रमांकावर दूरध्वनी करावा. अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार ११.०० ते ५.०० या वेळेत, १ ला मजला, सांस्कृतिक भवन, मुंबई विद्यापीठ,विद्यानगरी उत्तर गेटसमोर, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ५५ संपर्क साधावा.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content