Friday, November 8, 2024
Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी 15,940...

महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी 15,940 कोटींची विक्रमी तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2024-25च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी 15,940 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांना संबोधित करताना सांगितले. 2009 ते 2014, या कालावधीत महाराष्ट्राला देण्यात आलेल्या वार्षिक सरासरी रु. 1171 कोटी अर्थसहाय्याच्या ते जवळजवळ 13.5 पटीहून अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्रात नवीन लोहमार्ग बांधण्याच्या कामाला गती मिळाली असून वर्षाला सरासरी 183 किमी लांबीचे नवीन लोहमार्ग बांधण्यात आले. 2009-2014दरम्यान बांधण्यात आलेल्या वार्षिक सरासरी 58 किमीपेक्षा ते तिप्पट अधिक आहेत. नवीन रुळांच्या बांधकामाबरोबरच विद्युतीकरण करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वेमार्गांचे आता 100% विद्युतीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

रेल्वे

महाराष्ट्रात सध्या एकूण 1.3 लाख कोटी रुपयांचे काम प्रगतीपथावर असून त्यापैकी 5877 किमी लांबीचे नवीन लोहमार्ग बांधण्याचे 41 प्रकल्प चालू आहेत. याचा खर्च रु. 81,580 कोटी इतका आहे. यामध्ये नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, आणि गेज रूपांतरण या कामांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्रातील 128 रेल्वेस्थानके अमृत स्थानके म्हणून विकसित केली जात आहेत. महाराष्ट्रातील रेल्वेची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे, 2014पासून गेल्या 10 वर्षांत विक्रमी 929 रेल्वे उड्डाणपूल आणि अंडरब्रिज बांधण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

येत्या पाच वर्षांत सुमारे 250 लोकल सेवांची भर पडेल तसेच 100 मेल एक्स्प्रेस गाड्यांची भर पडेल. संपूर्ण महाराष्ट्रात होणारा मल्टिपल मेगा टर्मिनसचा विकास, हा भविष्यात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमधील विकासाला चालना देईल. पुणे स्थानकाची सुधारणा, तसेच खडकी, हडपसर, शिवाजी नगर आणि उरळी कांचन, यासारख्या विविध स्थानकांमध्ये पर्यायी कोचिंग टर्मिनसच्या विकासासाठी भविष्यातील नियोजनाचाही यात समावेश आहे, असे वैष्णव म्हणाले.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content