Sunday, March 16, 2025
Homeमाय व्हॉईसमाणिकपूरमध्ये 'डिम्पल'ने साहित्यप्रेमींना...

माणिकपूरमध्ये ‘डिम्पल’ने साहित्यप्रेमींना मारली चापटी!

वसईच्या माणिकपूर या गाववजा शहराने कालच्या रविवारी मुंबई, ठाणे व पुणे येथील साहित्यप्रेमींच्या एक हलकीशी कानाखालीच लगावली. हवं तर त्याला चापटी मारलीही म्हणू शकता!! अशोक मुळे या धडपड्या प्रकाशकाच्या डिम्पल प्रकाशनाला चक्क 50 वर्षे झाल्याचा सोहळा तुडुंब भरलेल्या सभागृहात संपन्न झाला. हल्ली साहित्य वगैरे कार्यक्रमांना गर्दी होत नाही अशी सर्रास भावना असताना डिम्पल या नावाने जादू केल्यासारखी साहित्यप्रेमी या कार्यक्रमाला आले होते. यात युवक, वृद्ध, वयोवृद्ध आदी सर्व होते.

वसईच्या माणिकपूरमध्ये हा सुवर्ण महोत्सवी समारंभ असूनही मुंबई, ठाण्यातील साहित्यप्रेमींनी वाहतूककोंडीची तमा न बाळगता गर्दी केली होती हे विशेष होते. अशोक मुळे यांनाही मानले पाहिजे. कारण ज्या वसई-माणिकपूरमध्ये डिम्पलची गुढी उभारली तेथेच त्यांनी हा समारंभ आयोजित करणे योग्य समजले म्हणून!! पन्नास वर्षांपूर्वी ज्या वसई रेल्वेस्थानकातून पुस्तकाचे गठ्ठे उचलून वितरणास सुरुवात केली त्याच परिसराला उर्जीतावस्था आल्यावर विसरलो नाही यात मनाचा मोठेपणा दिसतो.

या समारंभात सर्वच व्यक्त्यांनी मुळे यांच्या जुन्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या. अगदी ‘ग म भ न’पासूनच्या गोष्टी आठवल्या. भाऊ पाध्ये यांचा वासुनाका आणि त्यावरील वादळाचा उल्लेख नसता तर ही गोष्ट अपुरीच राहिली असती. तसेच लिटिल मॅगेझीन चळवळीतील कवी नसलेला साहित्यिक हे तरी कुणाला समजले असते का? तसेच स्व. आचार्य अत्रे यांच्यावरील ग्रंथ कसा सजला आणि सज्ज झाला हे तरी मुळे यांच्या मित्र परिवाराव्यतिरिक्त कुणाला कळले असते का? अगदी याचप्रमाणे नाटकार अशोक समेळ यांच्या आत्मवृत्तास इतर अनेक नामवंत प्रकाशकानी मागणी घातली होती हेही साहित्य प्रेमींपुरतेच मर्यादित राहिले असते. स्व. आचार्य अत्रे यांच्या कन्या कवयित्री शिरीष पै आणि ‘मराठा’ परिवार मुळे यांच्या किती जवळ होता हेही यामुळेच समजले.

“In publishing we have privilege of bringing divisive voices and perspectives to the forefront” या वचनाप्रमाणे डिम्पल प्रकाशनाने केवळ मनोरंजनावर भर दिलेला नाही हे त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या यादीवरून नजर फिरवली तर सहज कळून येते.

“Publishing is a business, writing may be a art, but publishing when it is said and done come down to money only” हेच या धंद्याचे वैशिष्ट्य आहे. आपल्या भाषणात मुळे यांनी हे अधोरेखित केले आहे. ते म्हणाले सर्वच पुस्तके पैसे मिळवून देत नाहीत. मोजक्या पुस्तकांच्या नशिबातच पैसे असतात. बाकीच्यांसाठी स्वतःच्या खिशातील पैसे मोजावे लागतात. दृष्ट लागेल अशा या नीटस कार्यक्रमाला अशोक बागवे, अरुण म्हात्रे, प्रदीप कर्णिक, अशोक समेळ, आमदार हितेंद्र ठाकूर, अशोक चिटणीस, राजेंद्र पै, गंगाराम गवाणकर व श्रीमती मेहंदळे तसेच तुडुंब भरलेले सभागृह उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर डिम्पल प्रकाशातर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. याच कार्यक्रमात आधी 18 विविध पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले होते.

Continue reading

फिल्टरपाड्यातल्या नाल्याचे पाणी मिळते ८० रूपये बादली!

मुंबईतील गोरेगाव नजीकच्या आरे कॉलनीच्या फिल्टरपाड्यातून एक नाला वाहतो. तो पवईकडे जातो. हा नाला वाहत असताना आपल्याबरोबर गाळ आणि घाण नेत असतो. पण या नाल्याच्या एका टोकाला एका महिला नाला अडवून त्यातील पाणी अर्थात घाणीसह एका खड्ड्यात जमा करून...

मराठवाड्यात अजूनही बरेच ‘वाल्मिक कराड’! तळघरांत कित्येक गुपितांचे अवशेष!!

बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येप्रकरणीचे आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले. वाल्मिक कराडसह इतर काही आरोपींचा यात समावेश आहे. एकीकडे हे आरोपपत्र दाखल झाले असतानाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. सुमारे १५/२० दिवसांपूर्वी...

पोलीस महासंचालक मॅडम.. एक नजर इधर भी!

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक मॅडम, गुंड टोळ्यांची इन्स्टावरील 'रिल्स' बंद करण्यासाठी पोलीस पुढाकार कधी घेणार? की अजून कायदाच नाही? खरंतर पोलीस महासंचालक मॅडम रश्मी शुक्ला यांना प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही. त्या काहींशा आजारी असून विश्रांती घेत असल्याचे समजले. पण...
Skip to content