Homeचिट चॅटहरी ओम परिवाराचा...

हरी ओम परिवाराचा अभिनव उपक्रम

मुंबईतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धीरज राठोड यांच्या अधिपत्याखालील हरी ओम परिवाराने डहाणूजवळील मल्याणमधील जिल्हा परिषद शाळेतल्या पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व गरीब विद्यार्थ्यांना छत्री, रेनकोट तसेच शालेय साहित्याचे वाटप केले.

पावसामुळे बऱ्याचवेळा मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. काहीवेळा पावसामुळे भिजून आजारी पडतात आणि मग त्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हरी ओम परिवाराने धीरज राठोड यांच्या अधिपत्याखाली मल्याण जिल्हा परिषद शाळेत जाऊन शाळकरी गरीब मुलांना पेन्सिल, खोडरबरपासून आवश्यक ते शालेय साहित्य तसेच छत्री, रेनकोटचे वितरण केले. हे साहित्य मिळताच या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. हीच आपल्या सामाजिक कार्याची पावती म्हणावी लागेल, असे राठोड यांनी सांगितले.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content