Homeपब्लिक फिगरआज खऱ्या अर्थाने...

आज खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला नव्या पर्वाचा..

विजयाच्या जोशाने, मताधिक्याच्या त्वेषाने, प्रचंड संख्येने उसळलेल्या या जनसागराच्या उपस्थितीत आज माझ्या निवडणूक प्रचाराची सांगता सभा पार पडली. या सांगता सभेवर उपस्थित जनसमुदायाने अफाट जल्लोषात प्रेमाचा, पाठिंब्याचा जो वर्षाव केला, तो पाहता आज प्रचाराची सांगता जरूर झाली. मात्र खऱ्या अर्थाने प्रारंभ झालाय तो नव्या पर्वाचा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीतल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल व्यक्त केल्या.

बारामतीत या सभेसाठीची आजची गर्दी आणि या गर्दीचा जोश “न भूतो न भविष्यती” असाच होता. त्या जोशातून घुमणाऱ्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. माझ्या भाषणाला मिळालेला प्रतिसाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी टिपेला पोहोचला. आजची सभा अजितदादांनी अक्षरशः एकहाती जिंकली. या सभेचा उत्स्फूर्तपणे निर्माण झालेला उत्साही माहोल चेतना निर्माण करणारा, केवळ विजयाची नव्हे तर प्रचंड मताधिक्याची खात्री देणारा होता. ही खात्री देणाऱ्या तमाम मायबाप जनतेचे खूप खूप आभार, असेही त्या म्हणाल्या.

या सभेस राष्ट्रवादीसह महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. शिवाय अनेक संघटना, संस्थांनी यावेळी जाहीर पाठींबा दिला. त्याबद्दल त्यांचेही आभार आणि मंगळवारी, ७ मे रोजी “घड्याळ” या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, अशी विनंतीही सुनेत्रा पवार यांनी केली.

Continue reading

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...
Skip to content