Details
प्रतीक्षा गायकवाडची चमकदार कामगिरी!
01-Jul-2019
”
भारताकडून खेळताना 4 रौप्य पदके पटकावली
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
हाँगकाँग येथे पार पडलेल्या एशियन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशीप-2019 या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार्याे प्रतीक्षा गायकवाड हिने चमकदार कामगिरी करून चार रौप्य पदके पटकावली आहेत. गेल्या सात वर्षांच्या काळात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणार्याे प्रतीक्षाचे पुढचे स्वप्न कॉमनवेल्थ गेममध्ये खेळणे व एशियन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणे आहे.
प्रतीक्षाने हाँगकाँग येथे पार पडलेल्या पॉवर लिफ्टिंग या स्पर्धेत 72 किलो वजनी गटात तब्बल 457.5 किलो वजन उचलून भारताला चार रौप्य पदके मिळवून दिली. रायगड जिल्हा, महाड तालुका, आसनपोई गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या प्रतीक्षाला हाँगकाँग येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यानंतर तिने ही निवड सार्थ ठरवली आहे. प्रतीक्षाने देशाचे पर्यायाने महाराष्ट्राचे नाव मोठे केल्याने तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रतीक्षाने जिद्द व मेहनतीच्या बळावर हा पल्ला गाठला असला तरी याचे श्रेय ती प्रशिक्षक नवनाथ गायकर यांना देते. कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून आजतागायत ते मला कायम मार्गदर्शन करत असल्याने आपण ही कामगिरी करू शकलो, असे प्रतीक्षा आवर्जून सांगते. आपल्या यशामागे आपली आई सुनिता गायकवाड, वडील तसेच कुटुंबियांचा मोलाचा वाट असल्याचे प्रतीक्षा सांगते. जिल्हा ते राष्ट्रीय व आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळणार्याप प्रतीक्षाला स्ट्राँगेस्ट वुमन ऑफ इंडिया, राजमाता जिजाऊ पुरस्कार, कोकण गौरव पुरस्कार, कोकणरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.”
“भारताकडून खेळताना 4 रौप्य पदके पटकावली