Details
दक्षिण मुंबई मतदारसंघात पारंपरिक सामना!
01-Jul-2019
”
अनंत नलावडे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
मुंबईच्या आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय शहर या ओळखीमागे असलेल्या व्यापारी, उद्योगपती, एनआरआय, व्हिआयपींचा मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई मतदारसंघ ओळखला जातो. मूळ मुंबईचे वैभव म्हणजे भुलेश्वर, वाळकेश्वर, मलबार हिल, मुंबादेवी, महालक्ष्मी, हाजीअली अशा पुरातन काळापासूनच्या वास्तू या भागात आहेत. याच भागात देशातील महान हस्ती मुकेश अंबानी, रतन टाटा, लता मंगेशकर, शरद पवार आणि अशा असंख्य दिग्गजांची निवासस्थाने आहेत. येथून 2014 च्या मोदी लाटेत शिवसेनेचे अरविंद सावंत बहुमताने विजयी झाले होते. तरी यावेळी त्यांना हा विजय सहज सोपा नाही.
या मतदारसंघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगात कदाचित असा कोणताच भाग नसेल जेथे सुमारे 50 लाख पेक्षाजास्त चाकरमानी सकाळी कामावर येतात आणि संध्याकाळी आपल्या घराकडे परततात! त्यामुळे वाहतूक कोंडी हा येथे नेहमीचा प्रश्न आहे. याशिवाय नागरी सुविधांवर येणारा ताण, राहत्या आणि व्यावसायिक जागेची चणचण हेदेखील येथील प्रश्न आहेत. मुंबईचा चेहरा बदलून टाकणारे कोस्टल रोड आणि सिप्झपर्यंत जाणारा भुयारी मेट्रो मार्ग ही कामे मागच्या तीन वर्षांत सुरू झाली आहेत. मात्र त्यामुळे येथून लाखापेक्षा जास्त मूळ वाड्या आणि चाळीत राहणारा मराठी मतदार विस्थापीत झाला आहे. छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारकदेखील याच भागात होऊ घातले आहे. त्याचप्रमाणे चौपाटी, हँगींग गार्डनसारख्या स्थळासाठी नेहमीच पर्यटक जगभरातून येथे येत असतात. त्यांच्यासाठी सुविधांचा अभाव हा येथील जुना प्रश्न आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा, त्यात असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनींचा प्रश्न, किनारा नियंत्रण नियमावलीमुळे कोळीवाड्यांच्या विकासाचा अडथळा असे येथील जटील प्रश्न आहेत. पर्यटनाच्या विकासासाठी या भागात अपार संधी असताना या भागाकडे आतापर्यंत दुर्लक्षच झाले आहे. तुकाराम ओंबळे आणि 26/11 च्या घटनांच्या स्मारकाला भेट देण्यासाठीदेखील येथे विदेशी पर्यटक येत असतात. मात्र त्याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही केल्याचे जाणवत नाही. लोकमान्य टिळक यांचे स्मारक, पुरातन देवालये असलेल्या या भागात पर्यटनाचे स्वयंभू सर्कल केले जाऊ शकते. मात्र, त्यावर काम होताना दिसत नाही.
यावेळी पुन्हा एकदा विद्यमान खासदार अरविंद सांवत आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद देवरा यांच्यात येथे सामना रंगणार आहे. हे दोन्ही उमेदवार येथील मतदारांनी अनुभवले असल्याने त्यांच्या निवडून येण्यात मतदारांचा फारसा उत्साह जाणवत नाही. एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे हे दोघेजण असल्याची प्रतिक्रिया एका भाजप कार्यकर्त्यांने दिली. या दोघांनीही त्यांना संधी मिळाल्यानंतरही मतदारसंघाच्या विकासासाठी फार काही केले नसल्याचा मतदारांचा आक्षेप आहे. दोन्ही उमेदवारांवर नाराज मतदार असले तरी मोदी लाट ओसरल्याने आणि आर्थिक क्षेत्रात मोदी सरकारने मागील पाच वर्षात केलेल्या कामगिरीचे खरे मूल्यमापन येथील व्यापारी, एनआरआय मतदारांच्या हाती आहे. त्यामुळे सावंत यांना यावेळी नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. देवरा यांना नुकतेच मिळालेले पक्षाचे विभागीय अध्यक्षपद ही जमेची बाजू असली तरी त्यामुळे त्यांचा संपर्कावर परिणाम झाला आहे. लोकांपासून दूर राहणे त्यांना ही संधी गमाविण्यास भाग पाडू शकते. सर्वात महत्त्वाचे उच्चभ्रू मतदार किती प्रमाणात मतदानात उत्साह दाखवतील यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
तीच गोष्ट सध्याचे खासदार अरविंद सांवत यांची सेनेची जागा असली तरी गेल्या पाच वर्षांत त्यांचा स्थानिक कार्यकर्त्यांना काहीच उपयोग झाला नसल्याचे सैनिक खाजगीत सांगतात. जनसंपर्कात सावंत कच्चे राहिल्याने तसेच दिल्लीतही येथील प्रश्नांसाठी फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. खासदार निधीमधून मलनि:सारण प्रकल्पासाठी चार कोटी, शौचालयासाठी तीन कोटी, रस्त्यांसाठी आणि पाणी पुरवठासाठी अडीच कोटी दिल्याचे ते प्रचारात सांगत असले तरी मतदार ‘मात्र पैसा कहा गया रे’ म्हणत एकमेकांकडे पाहत आहेत! संसदेतील त्यांची मागच्या पाच वर्षांतील उपस्थिती सरासरीच्या 18 टक्के जास्त होती. म्हणजे एकूण 526 पैकी 515दिवस हे हजर राहिले आहेत, 264 प्रश्नांची चर्चा केली आहे, 430 प्रश्न विचारले आहेत असे त्यांच्या वतीने सांगण्यात येते.
मागील इतिहास पाहिला तर स. का. पाटील यांचा हा मतदारसंघ मुरली देवरा यांनी 84, 89, 91, 98 असा चार वेळा जिंकला. तर भाजपच्या जयवंतीबेन महेता यांनी 96 आणि 99 मध्ये बाजी मारली होती. 2004 आणि 2009 मध्ये मिलींद देवरा येथून विजयी झाले होते. 2014च्या मोदी लाटेमध्ये शिवसेनेच्या सावंत यांनी त्यांना केवळ 28564 मतांनी पराजित केले होते. सर्वसामान्य मतदारांपासून दूर गेल्याने देवरा यांना हा पराभव झेलावा लागल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. येथील धनिक मतदारांना देवरा यांचे नेतृत्त्व जवळचे वाटत आले आहे मात्र यावेळी मेट्रोमुळे विस्थापीत झालेल्या स्थानिक मराठी मतदारांची गैरहजेरी आणि नाराजीचा ते कसा फायदा घेतील ते पाहवे लागेल. मुंबई अध्यक्षपदाची अचानक मिळालेली जबाबदारी सांभाळताना येथे त्यांना वेळ द्यावा लागणार आहे. त्यांच्या गैरहजेरीचा निसटता फायदा सावंत यांना होऊ शकतो. मोदींना मानणाऱ्या गुजराती राजस्थानी मतदारांचा त्यांना कसा पाठिंबा मिळतो त्यावर बरेच गणित बिघडू किंवा बनू शकते. माझगाव, भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा येथून मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यात एमआयएम आणि सपा प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ही देवरा यांच्या हक्काची मते विभाजीत होणार आहेत. त्याचवेळी गिरगाव, शिवडी, वरळीपर्यंतच्या मराठी मतदारांना राज ठाकरे यांचा मोदीविरोधी प्रचार सावंत यांच्यापासून किती दूर करू शकतो ते पाहवे लागणार आहे. यावेळी येथील 46,090 नवमतदार कुणाला पसंत करतात तेही पाहवे लागेल. मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांवर नजर टाकली तर यावेळी मनसेची मते काँग्रेस आणि सेना यांना विभागली जातील असे दिसते. या 85 हजार मतदारांचा कल जास्त कुणाकडे यावर येथील निकालाचा परिणाम दिसून येतो.
मागच्यावेळी 2014मध्ये अरविंद सावंत (शिवसेना) 3,74,609, मिलिंद देवरा (काँग्रेस) 2,46,045, बाळा नांदगावकर (मनसे) 84773, मीरा संन्याल (आप) 40,298 असा मतदानाचा कल होता. या भागात असणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रात सध्या असलेल्या आमदारांमध्ये सुनील शिंदे (वरळी), अजय चौधरी (शिवडी). वारिस पठाण (भायखळा), मंगल प्रभात लोढा (मलबार हिल), अमीन पटेल (मंबादेवी), राज के. पुरोहित (कुलाबा) असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात हे पाहणे रंजक ठरेल.
सेनाभवन आणि राजगडच्या सामन्यात टिळकभवनचा फायदा?
मुंबईच्या सर्वात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या लोकसभा क्षेत्रामध्ये दक्षिण-मध्य मुंबईचा समावेश होतो. देशाला लोकसभा सभापती देणाऱ्या या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे राहुल शेवाळे 2014पासून खासदार आहेत. शिवसेनेचा गड असलेल्या शिवसेना भवन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गड असलेल्या राजगडसह काँग्रेसचे मुख्यालय टिळकभवन याच परिसराजवळ आहे. माहीम, सायन, धारावी, चेंबूरपर्यंत आणि अणुशक्तीनगरसारखा बहुतांश झोपडपट्ट्यांचा आणि उच्चभ्रू मराठी लोकवस्तीचा हा मतदारसंघ आहे. या भागात आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा समावेश होतो. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर आणि आता होऊ घातलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचाही याच मतदारसंघात समावेश होतो.
धारावीमध्ये असलेल्या एकनाथ गायकवाड आणि वर्षा गायकवाड यांच्या म्हणजे काँग्रेसच्या वर्चस्वाला शिवसेनेचे लोकसभा क्षेत्रातील उमेदवार राहुल शेवाळे यांनी पुन्हा आव्हान दिले आहे. यावेळी मात्र मोदी लाट नसल्याने शेवाळे यांची स्थिती मागच्या वेळेपेक्षा नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. मनोहर जोशी यांना लोकसभा अध्यक्ष असताना हरविण्याचा चमत्कार करणारे एकनाथ गायकवाड यावेळीदेखील येथे बाजी मारतील असे मानले जात आहे. या मतदारसंघातल्या सहापैकी तीन मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व मानले जाते. मात्र त्यातील चेंबूर, अणुशक्तीनगर भागातल्या नागरिकांच्या रिफायनरी आणि बीपीटीच्या जमिनीच्या समस्यांबाबत केंद्रात सत्तेत असूनही शेवाळे यानी फारसे लक्ष दिले नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सायन कोळीवाडा भागात मच्छिमार आणि किनारा नियंत्रण नियमावलीच्या प्रश्नात गेल्या पाच वर्षांत फारसा काही बदल झाला नसल्याचे नागरीक सांगतात. या भागात भाजपचे बऱ्यापैकी बस्तान असलेतरी वडाळा आणि धारावीकडे शेवाळे यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही असे येथील नागरीक सांगतात. त्यामुळे सत्ताधाऱ्यांबद्दलचा रोष येथे उघडपणे व्यक्त होताना दिसत आहे. राज्यात, केंद्रात सत्तेवर असलेल्या आणि महापालिकेच्या कामाचा अनुभव असलेल्या शेवाळे यांच्यासारख्या तरूण उमेदवाराकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. मागील दोन लोकसभा निवडणुकीत सलग विजयी झालेल्या गायकवाड यांना बाजूला करत त्यांच्या हॅटट्रिकचे स्वप्न भंग करून जनतेने शेवाळे यांना निवडून दिले होते. मात्र या मतदारसंघाच्या बकालपणात फरक करण्यात ते यशस्वी झाले नाहीत असे धारावीतील नागरीक सांगतात. मोदी सरकारच्या स्वच्छता अभियानाचे काम जरी शेवाळे यांनी केले असते तरी त्यांना या मतदारांनी पुन्हा हात दिला असता असे येथील शिवसैनिकही खाजगीत सांगतात.
1952पासून 1989 पर्यंत काँग्रेस आणि कम्युनिस्टांचा गड असलेल्या या भागात 1989 मध्ये शिवसेनेने पदार्पण केले. त्यानंतर 20 वर्षे शिवसेना येथे रूजली. मोहन रावले पाचवेळा खासदार झाले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये एकनाथ गायकवाड यानी येथे बाजी मारली. 2014मध्ये त्यांच्याकडून सेनेने पुन्हा हा मतदारसंघ काढून घेतला. त्यावेळी मोदी लाट असल्याने राहुल शेवाळे यांना 381008, मनसेच्या आदित्य शिरोडकर यांना 73096 आणि एकनाथ गायकवाड यांना 242828 मते मिळाली होती. याशिवाय आप आणि बसपाने त्यांच्या मतांची आघाडी कमी केली होती. राहुल शेवाळे पेशाने सिव्हिल अभियंता आहेत. त्यांचे वडील नौसैनिक होते. महापालिकेच्या कामाचा त्यांना मोठा अनुभव आहे आणि मातोश्रीचा वरदहस्त होता म्हणून 2014च्या लाटेत मनोहरपंत जोशी यांना बाजूला करत त्यांना संधी देण्यात आली होती. खासदार म्हणून लोकसभेत 94 टक्के उपस्थिती 206 चर्चांमध्ये सहभाग तर 819 प्रश्न विचारणाऱ्या शेवाळे यांनी 8 खाजगी विधेयकेही मांडली आहेत. एकूण 25 कोटी खासदार निधीपैकी 17.50 कोटी त्यानी विकासकामांवर खर्च केले आहेत. म्हणजे व्याजासह शंभर टक्केपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे.
त्यांचे प्रतिस्पर्धी एकनाथ गायकवाड सध्या तसे निश्चिंत आहेत. कारण त्यांच्या पक्षात जान नसली याच मतदारसंघाचे रहिवासी असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मत यावेऴी त्यांना मिळणार आहे! ‘मोदी-शाह नको’ म्हणून शिवसेनेच्या विरोधात यावेळी मनसैनिक आपल्या राजगड असलेल्या भागात सक्रीय आहेत. किमान ही जागा तरी पाडून दाखविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असल्याने गायकवाड यांच्यापेक्षा जास्त गंभीर आणि खंबीरपणे ते काम करताना दिसत आहेत. त्यामुळे शेवाळे यांना यावेळी हा विजय सोपा नाही. गायकवाड यांच्या तुलनेत मागच्यावेळी शेवाळे यांच्याकडे कोरी पाटी होती आणि मनसेच्या शिरोडकरांसारखे उमेदवार असतानाही शेवाळे यांना मोदी लाटेचा हात मिळाला होता. यावेळी शिरोडकर रिंगणात नाहीत. त्यामुळे मनसेची लाखभर मते सरळ गायकवाड यांच्या बाजूने जाताना दिसत आहेत. मागच्या पाच वर्षांत केवळ वांद्र्यात संपर्क ठेवल्याने जनमानसाशी शेवाळे यांचा संपर्क राहिला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा फटका त्यांना बसेल. सेना भवन आणि राजगड असा सामना असल्याने त्यात टिळकभवनचा फायदा होण्याची शक्यता जास्त असल्याचे जाणकार मानत आहेत.
उत्तर-मध्य मतदारसंघात हायप्रोफाईल फ्रिस्टाईल!
दक्षिण मुंबईप्रमाणेच हायफ्रोफाईल समजला जाणारा मुंबईचा भाग म्हणजे उत्तर-मध्य मुंबई. लोकसभेच्या या मतदारसंघात यावेळीदेखील दोन मोठ्या वलयांकित वडिलांच्या कन्या आमनासामना करण्यासाठी उभ्या राहिल्या आहेत. मुंबईच्या सेलेब्रिटीज ज्या भागातून येतात त्या भागातल्या या लढतीमध्ये याच दोन सेलेब्रिटी उमेदवारांची झुंज 2014 मध्येही झाली होती. त्यावेळी मोदी लाटेमध्ये पूनम महाजन बाजी मारून गेल्या होत्या. मात्र वांद्रे आणि कुर्लासारख्या भागामुळे यावेळी पूनम महाजन यांना प्रिया दत्त शिकस्त देणार असे मानले जात आहे. या भागात मराठी मतदारांची संख्या 5.73 लाख मुस्लिम मतदार सुमारे 3.50 लाख हिंदीभाषिक मतदार सुमारे 2.38 लाख गुजराती आणि राजस्थानी मतदार सुमारे 2 लाख आणि मुंबईच्या कोणत्याही मतदारसंघापेक्षा जास्त ख्रिस्ती मतदार 75 लाखांच्या आसपास आहेत. त्यामुळे कॉस्मोपॉलिटन मुंबईचा खराखुरा चेहरा येथे पाहयला मिळतो. दोन वेळा खासदार म्हणून या भागातून निवडून गेलेल्या प्रिया दत्त यांचा या भागात आजही चाहता वर्ग आहे. मात्र 2014मध्ये 1.8 लाख मतांच्या फरकाने त्या पराभूत झाल्या होत्या. त्यांचे वडील अभिनेता सुनील दत्त यांचा हा पारंपरिक मतदारसंघ होता. पाचवेळा ते येथून खासदार झाले आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी पूनम महाजन या दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. प्रमोद महाजनदेखील मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातून खासदार झाले होते. म्हणजे दोन ‘बडे बाप की बेटीया’ एकमेकांसमोर पुन्हा एकदा मैदानात आहेत. येथील मतदार आता ‘बेटी बचाव’ कुणासाठी करतात ते पाहूया!
मागील पाच वर्षात पूनम महाजन यानी खासदार म्हणून केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला असता सुमारे 20 कोटी रूपये येथील विकासकामांवर खर्च केल्याचा दावा केला जात आहे. संसदेच्या कामकाजातील त्यांची उपस्थिती 79 टक्के असल्याचे दिसते. त्यात त्यांनी 445 प्रश्न विचारले आणि 30 मुद्यांवर चर्चेत भाग घेतला आहे. त्यात महिलांचे रोजगाराच्या ठिकाणी होणारे शोषण, कामगारांचे प्रश्न, देशाच्या नो फ्लाय झोनमध्ये होणारे विमान चालन, मुंबईच्या झोपड्यांच्या समस्या, नागरी मुलभूत सेवा अशा मुद्यांचा समावेश होता. 2014 मध्ये एकूण 48.66 टक्के मतदान झाले होते त्यात 8.5 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. प्रिया दत्त यांनी यावेळी निवडणुकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पक्षाच्या हायकमांडचा आदेश आल्याने त्या नाखुषीनेच रिंगणात आल्या आहेत. पूनम महाजन त्यांच्या वाढत्या संपत्तीचा हिशेब आणि तरीही त्यांच्याकडून देण्यात आलेले धनादेश न वटण्याचे प्रकरण यामुळे चर्चेत आल्या आहेत. सामान्य मतदारांशी जनसंपर्कात प्रिया दत्त पूनम यांच्यापेक्षा जास्त उजव्या असल्याचे मतदार सांगतात. गेल्या पाच वर्षांत पूनम महाजन समान्य मतदारांना क्वचितच भेटल्या. मात्र प्रिया दत्त यांचा जनसंपर्क खासदार नसतानाही चांगला होता असे लोक सांगतात.
यावेळी या लोकसभा क्षेत्रात या दोन महिलांच्या फ्रिस्टाईल उमेदवारांच्या टक्करीला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. यावेळी अपक्ष उमेदवार स्नेहा काळे या तृतीयपंथी उमेदवाराने अर्ज भरून धमाल उडवून दिली आहे. या भागात स्नेहा यांच्या समाजाची सुमारे 40 ते 50 हजारइतकी मतदारसंख्या आहे. त्यामुळे झोपडपट्टयांप्रमाणेच सामान्य मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्येही स्नेहा यांच्या प्रचाराने लोकांचे कुतूहल जागे झाले आहे. मुंबईतल्या अन्य लढतींपेक्षा वेगळी म्हणून या लढतीला त्यामुळे नवी ओळख मिळाली असून स्नेहा काळे कोणाची किती मते पळवतील यावर पूनम आणि प्रिया यांच्या फ्रिस्टाईलचा निवाडा होणार आहे. शिवसेनेचे नारायण आठवले, मनोहर जोशी, रिपाईचे रामदास आठवले, काँग्रेसचे शरद दिघे, एकनाथ गायकवाड यापूर्वी या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार नेमके कुणाच्या मागे उभे राहतील ते यावेळी सांगणे कठीण झाले आहे. वांद्रे, कालिना, चेंबूर, कुर्ला असा झोपडपट्टयांचा भाग, विमानतळांच्या भागातील केंद्र सरकारच्या जमीनींचा प्रश्न, वांद्रे, जुहू भागातील किनारा नियंत्रण नियमावलीच्या अटीमुळे येणारा विकासकामातील अडथळा, कोळीवाड्यांच्या नवनिर्माणाचा प्रश्न, मिठी नदी भागातील पर्यावरण आणि पुनर्वसनाचे तसेच विमानतळ सुरक्षेबाबतचे प्रश्न, बुलेट ट्रेन आणि मेट्रो यामुळे नव्याने निर्माण झालेल्या विस्थापनाचे प्रश्न, बीकेसीसारख्या भागात येणाऱ्या कोट्यवधींच्या गुंतवणूकदारांचे प्रश्न आणि कागदावर होणाऱ्या विकासातून सामान्यांच्या पदरात पडणारी निराशा असा या मतदारसंघातील समस्यांचा गोषवारा आहे. नागरी समस्या, वाहतुकीचे प्रश्न, यासोबतच हायप्रोफाईल लोकांच्या सुरक्षेचा तसेच दैनंदीन जीवनशैलीच्या नव्या समस्या येथे भेडसावताना दिसत आहेत. त्यात सायबर क्राईम, हुक्का पार्लर, लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे हा मतदारसंघ वर्षानुवर्षे सुधारण्याऐवजी बिघडण्यात अग्रेसर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कालिना येथे मुंबई विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या समस्यांकडे खासदार म्हणून प्रिया दत्त किंवा पूनम महाजन यांनी काहीच लक्ष दिले नाही असे येथील विद्यार्थी आणि शिक्षकांचे गाऱ्हाणे आहे. यावेळी या मतदारसंघातून 90,708 मतदार कमी झाले आहेत. एकूण 16,47,639 नोंदणीकृत मतदार यावेळी या मतदारसंघाचे भवितव्य निश्चित करणार आहेत.
या मतदार संघात विधानसभेच्या सहा जागामध्ये विलेपार्ले येथून भाजपचे पराग अळवणी, कुर्ला येथे शिवसेनेचे मंगेश कुडाळकर, चांदिवलीमधून काँग्रेसचे नसीम खान, कालीनामध्ये शिवसेनेचे संजय पोतनीस, वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेच्या तृप्ती सावंत आणि वांद्रे पश्चिममधून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आमदार आहेत. 2014 मध्ये येथून लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन (भाजप) यांना 4,78, 535 मते मिळाली होती. काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना 2,91,064 मते मिळाली होती. आपचे उमेदवार फिरोज पालखीवाला यांनी त्यावेळी 34, 824 मते मिळवली होती. यावेळी कोण बाजी मारतोय हे पाहूया.
उत्तर-पश्चिम मुंबईत आजी-माजी शिवसैनिकांची झुंज
मुंबईच्या उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे संजय निरूपम आणि शिवसेनेचे गजानन कीर्तिकर असा सामना होत आहे. २०१४मध्ये मोदी लाटेमध्ये खासदार झालेल्या कीर्तिकरांना यावेळी प्रस्थापित विरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्यामागे मजबूत पक्षसंघटना असलीतरी व्यक्तिगत छबी पाहता त्यांना यावेळी येथून विजयी होताना संजय निरूपमसारखा उमेदवारदेखील नाकीनऊ आणू शकतो. लढाऊ आणि खटपट्या असलेल्या निरूपम यांचा पूर्वी शिवसेनेत आणि आता काँग्रेसचे काही काळ मुंबई अध्यक्ष राहिल्याने या भागात जनसंपर्क वाढला आहे. नेमके त्याउलट खासदार झाल्यापासून कीर्तिकर ‘खास लोकांसाठीच’ दार उघडतात, असे त्यांच्या पक्षातले लोकच सांगू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत नाराजीचा सूर आहे. निरूपम यांना गटबाजीच्या राजकारणात काँग्रेसची साथ किती मिळणार हा प्रश्न असलातरी यावेळी मनसेच्या मराठी मतांचा त्यांना फायदा होऊ शकतो. या मतदारसंघात पश्चिमेला मोठ्या हायफ्रोफईल मतदारांचे अलिशान बंगले, इमारती तर दुसऱ्या बाजूला डोंगरउतारावरच्या दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या असा मतदार विखुरला आहे. मुंबईचे मूळ निवासी कोळी आदिवासींच्या गावठाणांचा प्रश्न आरेच्या तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भागातील तबेले आणि वनजमिनींचा प्रश्न, आरेचा भूखंड आणि नव्याने मेट्रोमुळे येथे होत असलेला विकास, त्याला विरोध आणि समर्थन करणारे नागरीक त्यामुळे समविषम पध्दतीने विभाजन झालेल्या या मतदारांमध्ये एकसारखेपणा नाही. हेच मोठे आव्हान इथल्या दोन्ही उमेदवारांना आहे. कोस्टल रोड, जोगेश्वरी-मुलूंड लिंक रस्ता, मेट्रोसोबत मोठ्या विकासकांना आंदण देत घशात घातले जाणारे भूखंड अशा अन्य प्रश्नांनी हा मतदारसंघ व्यापला आहे.
मुंबई गुजरातच्या सीमेवर असल्याने राज्याबाहेर जाणारा वाहतुकीचा ताण आणि मराठीप्रमाणेच अन्य भाषिकांची या मतदारसंघातील लक्षणीय उपस्थिती या मतदानावर प्रभाव टाकणाऱ्या बाबी आहेत. येथे फिल्मसिटी असल्याने जगभराला वेड लावणाऱ्या पेज थ्री सेलेब्रिटीचा राबता या भागात असतो. २०१४ मध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते गुरूदास कामत यांना १,८३,०२८ मतांनी पराजीत करत कीर्तिकर खासदार झाले होते. यावेळी मात्र मोदी लाट नसल्याने काँग्रेसने प्रयत्न केल्यास ही जागा निघू शकते असे मानले जात आहे. असे असलेतरी अलिकडे झालेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी येथे सुमार दर्जाची राहिली आहे. येथे असलेल्या सहापैकी एकाही विधानसभेत काँग्रेस नाही. भाजपचे राम जेठमलानी कधी काळी येथून खासदार झाले आहेत. त्यापूर्वी उत्तर भारतीयांच्या मतांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. राम जेठमलानी यांच्यानंतर सुनील दत्त यांनीदेखील 1984 पासून 1991 पर्यंत तीनवेळा येथून विजय मिळवला होता. त्यानंतर दोनवेळा मधुकर सरपोतदार शिवसेनेचे खासदार झाले होते. त्यानंतर दोनवेळा पुन्हा सुनील दत्त विजयी झाले होते. २०१४ मध्ये गुरूदास कामत हरले. त्यापूर्वी २००९मध्ये कामत येथून विजयी झाले होते. २०१९मध्ये या मतदारसंघात १७ ७५ १८७ मतदार आहेत. मागीलवेळी कीर्तिकर यांना चार लाख ६४ हजार ८४० मते मिळाली होती. त्यावेळी मनसेच्या महेश मांजरेकर यांना ६६०८८ मते मिळाली होती. मनसेची ही मते यावेळी निर्णायक असतील ती कुणाला जातील यावर कोणता उमेदवार बाजी मारेल ते ठरणार आहे.
आपचे मयांक गांधी यांनीदेखील मागच्या वेळी ५१८६० मते घेऊन कामत यांना अडचण करण्यात हातभार लावला होता. या भागात भाजप आणि सेना यांचे प्रत्येकी तीन आमदार आहेत. तर ४२ पैकी पाच वगळता सारे नगरसेवक भाजप सेना यांचे आहेत. त्यामुळे महायुतीचा फायदा झाला तर या मतदारसंघात तो होण्याची शक्यता जास्त आहे. महापालिकेत भाजपचे २१ तर शिवसेनेचे १५ नगरसेवक असून वेगळे लढून त्यांची एकत्रित मते पाच लाखांपेक्षा जास्त होती. त्यामुळे कीर्तिकर निवडून येण्यात ही मते हुकूमी असतील. अलिकडे सुषमा राय या काँग्रेस नगरसेविकेचे पती कमलेश सेनेत आले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शक्तीमध्ये वाढ झाली आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी ७ ७ हजारपेक्षा जास्त मतदारसंख्या घटल्याचा परिणाम येथील मतदानावर होणार आहे. गेल्या पाच वर्षांत कीर्तिकर यांनी खासदार म्हणून जनसंपर्क ठेवला नाही. त्यामुळे यावेळी ‘गायब खासदाराला गायब करा’ असा प्रचार विरोधी पक्षातून होत आहे. लोकसभेत ७९ टक्के उपस्थिती लावून मतदारसंघात २९ कोटी रूपये खर्च केल्याचे ते सांगतात. पण केवळ संघटनेच्या बळावर त्यांना विजयी होता आले तरी हा त्याचा विजय नसेल.
ईशान्य मुंबईतील राजकीय वारसदारांचे भवितव्य!
ईशान्य मुंबईच्या जागेची चर्चा यावेळी नकारात्मक पध्दतीने देशभरात झाली आहे. भाजपचे सदाबहार नेते आणि गेल्या काही वर्षांत पक्षाला अच्छे दिन देण्यासाठी झटलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ. किरीट सोमैय्या यांचे नावे अग्रभागी आहे. आघाडी सरकारच्या काळात भुजबळांपासून अगदी सामान्य गुंतवणूकदारांच्या पॉन्झी घोटाळ्यांनादेखील उजेडात आणायचे काम त्यांनी केले आहे. पक्षाचा चेहरा बनून दिवसरात्र प्रतिस्पर्धी नेत्यांच्या वर्मावर घाव घालणाऱ्या निष्ठावंत भाजप नेत्याला यावेळी पक्षांतर्गत संक्रमणाचा बळी ठरविण्यात आले आणि या मतदारसंघात उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतरही सोमैय्या यांनी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जी समजदारी दाखवली आहे ती आजच्या काळात इकडून तिकडे पळणाऱ्या राजकीय नेत्यांच्या काळात विरळाच म्हणून चर्चत आली आहे. मुंबईत प्रवेश करताना आपण ज्या भागातून जातो त्या मुलूंड, भांडूप, चेंबूर, घाटकोपर या भागात विस्तारलेला हा ईशान्य मुंबई मतदारसंघ आहे. 1967 पासून 1980 पर्यंत येथे तीन वेळा काँग्रेसने, दोन वेळा जनता पक्षाने जागा पटकावली आहे. त्यानंतर प्रत्येकवेळी अदलाबदल करत येथील मतदारांनी कुणा एका पक्षाला येथे निश्चिंतपणे राहू दिले नाही. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील एकमेव लोकसभा जागा असलेल्या या मतदारसंघात भाजपाने नव्या दमाचे मनोज कोटक या नगरसेवक आणि भाजपचे मुंबई महापालिकेत नेते राहिलेल्या नवख्या उमेदवाराला मैदानात उतरविले आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील आहेत, जे यापूर्वीच्या काळात मौनी खासदार म्हणून गाजले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत या जागेवर भाजपाने उमेदवार जाहीर केला नाही त्याचा फायदा संजय दिना यांना होण्याची शक्यता असली तरी उशिराने प्रचारात उतरलेल्या भाजप उमेदवाराची जबाबदारी शिवसेनेच्या ‘राऊटर्स ब्रदर्स’नी घेतल्याचे सांगितले जात आहे. भांडूप येथील शिवसेना आमदार सुनील राऊत आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू ‘सामना’कार खा. संजय राऊत यांनी सोमैय्या यांना बदलण्याच्या प्रकरणात ‘मातोश्रीचे दूत’ म्हणून यशस्वी कामगिरी केल्याचे संगितले जाते. त्याशिवाय मतदारसंघाचे भवितव्य आमच्या हाती असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता भाजपाने सोमैय्या यांना बाजूला ठेवून कोटक यांना पुढे केल्याने शिवसेनेच्या नेत्यांना काही करून ही जागा भाजपाला जिंकून देण्याची जबाबदारी घ्यावी लागली आहे.
याशिवाय गेल्या पाच वर्षात मुंबईतल्या मतदारांना नेहमी भेटणारा खासदार म्हणून डॉ. किरीट सोमैय्या यांनी जे काम केले आहे ते भाजपाला उपयोगी पडणार आहे. सामान्य नागरीक, ज्येष्ठ नागरीक रेल्वे प्रवासी यांना डॉ. किरिट यांनी त्याच्या समस्यांसाठी भरपूर वेळ दिला आहे, त्याचे फलित स्थानिक लोकांमध्ये भाजपच्या उमेदवाराबद्दल जरी तो बदलण्यात आला असला तरी तक्रारी फारश्या नाहीत, नवा चेहरा असणाऱ्या कोटक यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांना उशिराने उमेदवारी मिळाल्याने किमान एकदा तरी प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. भाजपचे या भागातील खासदार म्हणून डॉ. सोमैय्या यांची लोकसभेतील उपस्थिती 97 टक्के तर 116 चर्चामध्ये त्यांनी भाग घेतला आहे. 459 प्रश्न विचारले तर 2 खासगी विधेयके त्यांनी लोकसभेत मांडली आहेत. पेशाने सनदी लेखापाल असलेल्या सोमैय्या यांनी आदर्शपासून अनेक घोटाळ्यांची प्रकरणे जीवाची पर्वा न करता वेशीवर टांगण्याचे काम केले आहे. खासदार निधीतून त्यांनी 25 कोटी रूपये खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे, म्हणजे एकूण निधीच्या 93 टक्के निधी खर्च झाला आहे. याशिवाय अनेक सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून ते आरोग्यापासून शिक्षणापर्यंतच्या क्षेत्रात सदैव कार्यरत राहिले आहेत. 2014पर्यंत त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हयांची संख्या वाढून दहा झाली आहे. असे असलेतरी येथील मतदारांचा मूड गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघात बदलत राहिला आहे. 1980 मध्ये येथे सुब्रमण्यम स्वानी यांनी जनता पक्षाकडून तर 89 मध्ये जयवंतीबेन महेता यांनी भाजपकडून जागा जिकंली आहे. 96 मध्ये प्रमोद महाजन तर त्यापूर्वी 91 मध्ये गुरूदास कामत यांनी येथून काँग्रेसला जय मिळवून दिला होता. त्यानंतर पुन्हा गुरूदास कामत, संजय दिना पाटील आणि डॉ. सोमैय्या आलटूनपालटून येथे खासदार झाले आहेत. 2014मध्ये सामाजिक आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकरदेखील येथे उमेदवार होत्या. त्यांना 76451 मते मिळाली होती तर भाजपचे किरीट सोमैय्या यांना 5,25,285 मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे संजय पाटील यांना 208163 मते मिळाली होती.
या मतदारसंघात मानखूर्द शिवाजीनगरमध्ये मुस्लिम बांगलादेशी आणि अन्य भाषिकांचा भरणा असून येथून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी अनेक वर्षे आमदार आहेत. याशिवाय विक्रोळी, भांडूप आणि घाटकोपरचा काही भाग शिवसेनेच्या नगरसेवकांच्या ताब्यात आहे. दोन जागा भाजपच्या आमदारांकडे आहेत. त्यात सरदार तारासिंह हे जुने कार्यकर्ता आमदार आहेत तर प्रकाश महेतादेखील सध्याच्या भाजपामधील हेवीवेट नेते समजले जातात. शिवसेनेच्या राऊतबंधूचे वर्चस्व असल्याने या भागात सेना-भाजपशी पंगा घेणे यावेळी राष्ट्रवादीला सोपे नाही. शिख, मुस्लिम, बांगलादेशी गुजराथी, राजस्थानी, कच्छी समाजासोबतच मराठी मतदारांची मतेही येथे निर्णायक समजली जातात. या भागातील पिण्याचे पाणी वन आणि खार जमिनींचे प्रश्न तसेच रेल्वेच्या समस्यामध्ये स्थानिक खासदारांना काम करण्यास अजूनही खूप मोठा वाव आहे. वेगाने विकसीत होणाऱ्या या भागात डोंगरी भाग आहे. तेथे पाण्याची आणि मलनि:सारणाशी संबंधित समस्या आहेत तर झोपड्यांच्या भागात नागरी सुविधांचा आभाव जाणवतो. येथे विजय कुणाला मिळणार ते मतदानाचा कल काय राहील यावर ठरणार आहे. भाजपने आयत्यावेळी लोकप्रिय उमेदवार बदलण्याचा केलेला अवसानघातकीपणा त्यांच्या अंगलट येवू शकतो. जर मतदारांनी नाराजी दाखवली तर मोदी लाट नसल्याने गुजराती व्यापारी मतदारांचा कल काय असेल ते सांगता येत नाही. भाजपाच्या सरकारने मागील काळात केलेल्या भ्रमनिरासातून यावेळी विरोधी मतदान झाल्यास संजय पाटील यांना लॉटरी लागू शकते. मात्र सपाकडून त्यांची किती मते पळवली जातात ते पाहवे लागेल. संजय पाटील विकयी झालेच तर सेना भाजपच्या संबंधात ‘नवा मोड’ घेण्यास आणि आगमी विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात चर्चेत येण्यास हा मतदरांसंघ कारण ठरणार आहे.
उत्तर मुंबईत मराठी लेकीचा करिष्मा?
दक्षिण मुंबई जसा मुंबईच्या धनिकांचा गढ मानला जातो तसा उत्तर मुंबई हा श्रमिकांचा गढ मानला जातो. कधीकाळी या मतदारसंघातून देशातील कम्युनिस्टांचे भिष्मपितामह समजले जाणारे कॉम्रेड डांगे यांनी विजय मिळवला होता. मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय, गुजराती आणि अमराठी मतदारांचा भरणा असलेल्या या मतदारसंघात नागरी समस्यांचा महापूर आहे. चिंचोळ्या, दाटीवाटीच्या वस्त्यांचे प्रश्न, किमान मुलभूत समस्यांची वानवा तरीही सुखवस्तू मध्यमवर्गीयांसाठी घर असलेल्या या भागात भाजपाचे राम नाईक यांनी पक्षाचे ब-यापैकी बस्तान जमविले होते. 2004मध्ये मात्र त्यांना केंद्रीय मंत्रीपद असताना बॉलीवूडचा हिरो नंबर वन गोविंदा याने राजकीय वनवासात पाठवून दिले. 2014 मध्ये त्यांच्या पठडीतून तयार झालेल्या कार्यसम्राट गोपाळ शेट्टी यांना मोदी लाटेत सूर गवसला आणि ते खासदार झाले. कागदावर त्यांची मोठी कामगिरी ते सांगत असले तरी सामान्य मतदारांमध्ये त्यांची नाळ जुळल्याचे चित्र दिसत नाही. सेना भाजप यांची युती असलीतरी गोपाळ शेट्टी यांना यावेळी काँग्रेसच्या मराठमोळ्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अल्पावधीत जबरदस्त आव्हान दिल्याचे दिसत आहे. एका बाजूला खूप मोठी कामगिरी केल्याचा दावा, राजकीय वारशाची आणि सत्ताधारी भाजपाच्या रसदीची तैनात तर दुसऱ्या बाजूला कोरीपाटी, समाजवादी विचारसरणीचा वारसा आणि बोल्ड बिनधास्त व्यक्तिमत्व या जमेच्या बाजू असा हा रोमांचक सामना उत्तर मुंबईत ‘रंगिला’ आहे.
यावेळच्या निवडणुकीत खरेतर अखेरच्या मिनीटांपर्यंत काँग्रेसचे त्यावेळचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांना येथे उमेदवारी देण्याचा विचार सुरू होता. मात्र त्यात अडचणी होत्या. कारण शेट्टींना ते आव्हान देतीलच याची खात्री नव्हती. त्यामुळे महाआघाडीत सपाला हा मतदारसंघ सोडण्याचादेखील विचार सुरू होता. मात्र सपाने त्यावेळी उत्साह दाखविला नाही आणि काँग्रेसने 2004चा फॉर्मुला वापरत आधी शिल्पा शिंदे या मराठी भाभीजींना उमेदवारी देण्याचा विचार करत पक्षात प्रवेश दिला. मात्र त्यापेक्षा जास्त हॉट फॉर्मुला देत उर्मिलाची एंट्री झाली आणि भाजपाच्या तंबूत घबराट पसरल्याचे जाणवू लागल्याने हा फर्मास फॉर्मुला कामाला येणार असे वाटू लागले आहे.
मोदी लाट ओसरली आहे, 2014चा शंभर टक्के गुजराती मतदार यावेळी मोदीसोबत ‘आपणो माणस’ म्हणत जाईल असे वातावरण नाही. गोपाळ शेट्टी हे भाजपाचे मनापासून दिलेले उमेदवार नाहीत. त्याची मागील काळात पदाचा राजीनामा देण्याची वक्तव्ये पाहता पक्षात त्यांच्या वरिष्ठांशी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ आता राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार झाल्यानंतरही स्थानिक भागात नगरसेवकांच्या परिघाबाहेर पडून खासदार म्हणून ठसा त्यांना उमटवता आलेला नाही. रेल्वेचे प्रश्न असलेल्या या भागात सामान्य जनतेच्या प्रश्नापासून ते दूर राहिले आहेत. सत्ताधारी खासदार म्हणून स्थानिक सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यानी गेल्या पाच वर्षात किती वेळ दिला असा प्रश्न आता विचारला जात आहे. सध्या सहापैकी चार विधानसभा तसेच 24 नगरसेवक असलेल्या भाजपाला 12 शिवसेनेच्या नगरसेवकांच्या महायुतीचा किती फायदा होणार हा प्रश्न आहे. कारण महायुती असली तरी भाजप व सेना यांचे मनोमीलन काही येथे झाल्याचे दिसत नाही. पाच वर्षांत 17 कोटी नागरी कामांवर खर्च केल्याचे सांगत गोपाळ शेट्टी यांनी जी यादी दिली आहे ती नगरसेवक असताना केलेल्या कामांची आहे की आमदार असतानाच्या असा खोचक प्रश्न त्यांच्या भागात काही सैनिकानी केला आहे! जॉगिंग पार्क, जिमखाना, पिण्याचे पाणी म्हणजे वॉटर, मिटर, गटर या नगरसेवकाच्या परिघात खासदार अडकल्याचे दिसत आहेत. ते ‘खास’दार आहेत. पण रेल्वेच्या समस्यांमध्ये त्यांना का लक्ष घालता आले नाही? याचे उत्तर मुंबईतील मतदाराना त्यांना उत्तर द्यावे लागणार आहेच. राज्यातील आणि महापालिकेतील भाजपाच्या सत्तेला दिल्लीच्या सत्तेची जोड त्यांनी दिल्याचे दिसत नाही. मेट्रोच्या कामांचा दाखला दिला जात असलातरी बोरीवलीच्या वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जमिनींवरून ते वादात आहेत. मोक्याच्या जागा विकासकांच्या घशात घालताना शेट्टी यांची खासदारकी वादात आहेच. ऐन्टी इन्कंबंसीचा फटका मुंबईत जर भाजापाला बसला तर तो शेट्टी यांच्या जागेला बसेल असे सांगण्यात येत आहे.
2014मध्ये येथे संजय निरूपम यांना 4 लाख 46 हजार 528 मते मिळाली तरी पराभव पत्करावा लागला होता. त्यापूर्वी 2009 मध्ये त्यांना राम नाईक यांच्यासमोर 4779 मतांनी निसटता विजय मिळाला होता. त्यामुळे यावेळी शेट्टी यांच्यासमोर त्यांचा निभाव लागण्याची शक्यता नसल्याने त्यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची कुर्बानी देत उत्तरमध्य मुंबईमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या यावेळच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचे दहा वर्षांनी लहान असलेल्या काश्मिरी मुस्लिम तरूणासोबत विवाह करणे हा मुद्दा समाजमाध्यमातून आणि प्रचारातून गाजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरूनच मातोंडकर यांच्यासमोर भाजपाला प्रचार करण्याचा मुद्दाच सापडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर चर्चा करून राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्तीचा स्टंट करण्यात आला. मात्र तो आता भाजपच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. कारण मातोंडकर यांनी त्यांना चोख उत्तरे दिली आहेत आणि त्यामुळे महिला आणि तरूण मतदारांप्रमाणेच पारंपरिक काँग्रेस मतदार त्यांना जवळचे झाले आहेत. कोरी पाटी असली तरी संधी देऊन बघा म्हणताना मनसे आणि सेनेच्या मराठी मतदारांना त्या मी ‘कोकणची लेक’ आहे असे आवर्जून सांगतात. समाजवादी विचारांचा राजकीय वारसा आहे, फिल्मी चेहरा आणि रंगीला अंदाज असल्याने उर्मिला यांच्या प्रचारात तर नक्कीच रंग भरला आहे. भाजपच्या साम दाम दंड नीतीचा त्यांना अंदाज आहे. त्यामुळे त्यांची भाषणे अधिक प्रगल्भ होताना दिसत आहेत. गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय मतदारांना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. ‘आयतोबा’ म्हणून खासदारकी त्या मिळवणार नाहीत तर त्यात त्यांच्या संघर्षाचा हिस्सा असल्याने त्या यश खेचून आणतील असा विश्वास त्यांच्या महिला सहकाऱ्यांना आहे!”
“अनंत नलावडे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
मुंबईच्या आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय शहर या ओळखीमागे असलेल्या व्यापारी, उद्योगपती, एनआरआय, व्हिआयपींचा मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई मतदारसंघ ओळखला जातो. मूळ मुंबईचे वैभव म्हणजे भुलेश्वर, वाळकेश्वर, मलबार हिल, मुंबादेवी, महालक्ष्मी, हाजीअली अशा पुरातन काळापासूनच्या वास्तू या भागात आहेत. याच भागात देशातील महान हस्ती मुकेश अंबानी, रतन टाटा, लता मंगेशकर, शरद पवार आणि अशा असंख्य दिग्गजांची निवासस्थाने आहेत. येथून 2014 च्या मोदी लाटेत शिवसेनेचे अरविंद सावंत बहुमताने विजयी झाले होते. तरी यावेळी त्यांना हा विजय सहज सोपा नाही.
या मतदारसंघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगात कदाचित असा कोणताच भाग नसेल जेथे सुमारे 50 लाख पेक्षाजास्त चाकरमानी सकाळी कामावर येतात आणि संध्याकाळी आपल्या घराकडे परततात! त्यामुळे वाहतूक कोंडी हा येथे नेहमीचा प्रश्न आहे. याशिवाय नागरी सुविधांवर येणारा ताण, राहत्या आणि व्यावसायिक जागेची चणचण हेदेखील येथील प्रश्न आहेत. मुंबईचा चेहरा बदलून टाकणारे कोस्टल रोड आणि सिप्झपर्यंत जाणारा भुयारी मेट्रो मार्ग ही कामे मागच्या तीन वर्षांत सुरू झाली आहेत. मात्र त्यामुळे येथून लाखापेक्षा जास्त मूळ वाड्या आणि चाळीत राहणारा मराठी मतदार विस्थापीत झाला आहे. छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारकदेखील याच भागात होऊ घातले आहे. त्याचप्रमाणे चौपाटी, हँगींग गार्डनसारख्या स्थळासाठी नेहमीच पर्यटक जगभरातून येथे येत असतात. त्यांच्यासाठी सुविधांचा अभाव हा येथील जुना प्रश्न आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा, त्यात असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनींचा प्रश्न, किनारा नियंत्रण नियमावलीमुळे कोळीवाड्यांच्या विकासाचा अडथळा असे येथील जटील प्रश्न आहेत. पर्यटनाच्या विकासासाठी या भागात अपार संधी असताना या भागाकडे आतापर्यंत दुर्लक्षच झाले आहे. तुकाराम ओंबळे आणि 26/11 च्या घटनांच्या स्मारकाला भेट देण्यासाठीदेखील येथे विदेशी पर्यटक येत असतात. मात्र त्याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही केल्याचे जाणवत नाही. लोकमान्य टिळक यांचे स्मारक, पुरातन देवालये असलेल्या या भागात पर्यटनाचे स्वयंभू सर्कल केले जाऊ शकते. मात्र, त्यावर काम होताना दिसत नाही.
यावेळी पुन्हा एकदा विद्यमान खासदार अरविंद सांवत आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद देवरा यांच्यात येथे सामना रंगणार आहे. हे दोन्ही उमेदवार येथील मतदारांनी अनुभवले असल्याने त्यांच्या निवडून येण्यात मतदारांचा फारसा उत्साह जाणवत नाही. एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे हे दोघेजण असल्याची प्रतिक्रिया एका भाजप कार्यकर्त्यांने दिली. या दोघांनीही त्यांना संधी मिळाल्यानंतरही मतदारसंघाच्या विकासासाठी फार काही केले नसल्याचा मतदारांचा आक्षेप आहे. दोन्ही उमेदवारांवर नाराज मतदार असले तरी मोदी लाट ओसरल्याने आणि आर्थिक क्षेत्रात मोदी सरकारने मागील पाच वर्षात केलेल्या कामगिरीचे खरे मूल्यमापन येथील व्यापारी, एनआरआय मतदारांच्या हाती आहे. त्यामुळे सावंत यांना यावेळी नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. देवरा यांना नुकतेच मिळालेले पक्षाचे विभागीय अध्यक्षपद ही जमेची बाजू असली तरी त्यामुळे त्यांचा संपर्कावर परिणाम झाला आहे. लोकांपासून दूर राहणे त्यांना ही संधी गमाविण्यास भाग पाडू शकते. सर्वात महत्त्वाचे उच्चभ्रू मतदार किती प्रमाणात मतदानात उत्साह दाखवतील यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
तीच गोष्ट सध्याचे खासदार अरविंद सांवत यांची सेनेची जागा असली तरी गेल्या पाच वर्षांत त्यांचा स्थानिक कार्यकर्त्यांना काहीच उपयोग झाला नसल्याचे सैनिक खाजगीत सांगतात. जनसंपर्कात सावंत कच्चे राहिल्याने तसेच दिल्लीतही येथील प्रश्नांसाठी फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. खासदार निधीमधून मलनि:सारण प्रकल्पासाठी चार कोटी, शौचालयासाठी तीन कोटी, रस्त्यांसाठी आणि पाणी पुरवठासाठी अडीच कोटी दिल्याचे ते प्रचारात सांगत असले तरी मतदार ‘मात्र पैसा कहा गया रे’ म्हणत एकमेकांकडे पाहत आहेत! संसदेतील त्यांची मागच्या पाच वर्षांतील उपस्थिती सरासरीच्या 18 टक्के जास्त होती. म्हणजे एकूण 526 पैकी 515दिवस हे हजर राहिले आहेत, 264 प्रश्नांची चर्चा केली आहे, 430 प्रश्न विचारले आहेत असे त्यांच्या वतीने सांगण्यात येते.
मागील इतिहास पाहिला तर स. का. प