Details
कुणबी कबड्डी चषकाचे यशस्वी नियोजन!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
युवाशक्तीला एकसंघ करण्यासाठी कुणबी बहुजन समाजातील सर्वच संघटना पुढाकार घेत आहेत. समाजिक बांधिलकी तसेच आपले हक्क याप्रती शिकलेल्या पिढीने जागृत असणे गरजेचे असून त्यांना एकसंघ करण्यासाठी गरज आहे ती पुढाकाराची. कोकण विभागात अशा स्पर्धांचे विविध माध्यमातून नियोजन होताना दिसत आहे. समाजातील युवा पिढी शिकली खरी पण त्यांना आपले हक्कच माहित नाही. ज्या लोकांनी हजारो वर्षे आपल्या अधिकाराचा वापर करून कुणबी ओबीसी समाजाला गुलामीची वागणूक दिली. अधिकारापासून वंचित ठेवले ते सत्य आज शिक्षित पिढी ओळखून आहे आणि म्हणूनच कुणबी समाजातील विविध संघटना आज जागृत झाल्या आहेत.
महाड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने महाड तालुका कुणबी समाज रहिवाशी संघ, वसई-विरार-नालासोपारा मर्यादित यांनी ही स्पर्धा मु. गांधारपाले या गावी आयोजित केली होती. स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेला कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे, कुणबी राजकीय संघटन समितीचे मंगेश हुमणे, सत्यवान यादव, संघटनेचे अध्यक्ष विनायक तांबे, परेश बटावले, राजेश देवळे, ज्ञानदेव निंबरे, संजय गोलांबडे, मिलिंद चिविलकर, युवा ब्रिगेडचे योगेश मालप, समीर वनगुले आदी यावेळी उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो