HomeArchiveयोग तर होईल...

योग तर होईल पण, कायमस्वरूपी उपायांची गरज!

Details
“योग तर होईल पण, कायमस्वरूपी उपायांची गरज!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
यंदाच्या वर्षाच्या योग दिनासाठी ‘क्लायमेट एक्शन’ हा मंत्र देण्यात आला आहे. पर्यावरण जागरूकता व्हावी यासाठी जगाने प्रयत्न करावे हाच यामागे उद्द्येश आहे. गेल्या तीन वर्षांपासून विश्व पातळीवर सुरू झालेल्या योग दिनासाठी सुमारे १७७ देश सहभागी होत आहेत. व्यायाम करणे हे चांगल्या सवयीचे लक्षण मानले जात असले तरी बहुसंख्य तो करतातच असे नाही. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवतात हे जरी खरे मानले तरी गेल्या काही काळात पर्यावरण प्रश्नाने धारण केलेले उग्र रूप त्यात अधिकची भर घालतेय.

व्यायाम नि त्याचं महत्त्व यावर बरेच काही सांगितलं बोललं जातं. योगासनं हा शुद्ध भारतीय व्यायाम प्रकार. या देशाच्या सांस्कृतिक विविधतेविषयी जगभरात कुतूहल आहे. ऋषीमुनी, वैदिक काळापासून योग या प्रकारात सर्वभाषिक एकवाक्यता दिसते. योगासनं म्हटली की त्यात नाना प्रकारची आसनं येतात. त्यातही इतर आजार बळावणार नाही हे पाहून ती करावी लागतात. त्यासाठी योगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणे अधिक श्रेयस्कर! शरीराच्या विविध व्याधींवरही आसनं आहेत. शरीराच्या नाना ग्रंथींना चालना देऊन विकार बरी करणारीही आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसातच नव्हे तर इतर वेळीही अनेकांना शारिरीक गर्मीचा त्रास जाणवतो. त्यावर शितली प्राणायामसारखा उपचार नाही. अत्यंत सोप्या पद्धतीचा आहे तो. नेहमीचा प्राणायाम उर्जादायक असला तरी याने थंडावा मिळतो. जीभेला नळीसारखं करून श्वास आत घेणे नि तोंड बंद करून तो रोखून धरणे सोडणे. याचा फायदा म्हणजे तहान, भूक नियंत्रित राहते नि मन शांत होते, शरीरात थंडावा येतो, पित्त नाहीसे करून रक्तदाब नियंत्रणात आणतो.

बद्ध कोनासन- हे तणाव नि थकवा दूर ठेवण्यात उपयोगी असून सायटिका, हर्निया यावर परिणामकारक आहे.

शवासन- जमिनीवर पाठीवर झोपून सर्व शरीर शिथिलवस्थेत ठेवावे. श्वास नियंत्रित करून शांत पडावे. याने गर्मीचा त्रास कमी होऊन ताजेतवाने वाटते. प्राणवायू ऑक्सिजन रक्तात अधिक मिसळून थंडावा येतो. याने तणावही दूर पळतो.

उज्जयी प्राणायाम हा सकाळी ज्यावेळी हवेत प्राणवायूचा पुरवठा जास्त असतो तेव्हा करणे उत्तम! या प्रकारात जास्तीतजास्त वायू शरीरात जाऊन सर्वांगात पोषण भरतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. मात्र वायू प्रदूषण, रहदारीच्या रस्त्याजवळ, कारखाना असेल तिथे करणे योग्य होणार नाही. दीर्घ श्वास घेऊन हळुवारपणे तो सोडणे यातून प्राणवायू शरीरात चैतन्य भरतो.

पश्चिमोतानासन, पूर्वोत्तनासन, वीरभद्र आसन, ओमकार अनुलोम विलोम, भ्रमरी प्राणायाम आदी माध्यमातून तणाव दूर ठेवायला मदत होते. जीवनातील उत्साह वाढून बेहत्तर बदल घडवून आणतो. अलीकडच्या काळात विशेषतः काही गुरूंच्या टी व्ही शोमुळे बऱ्याच जणांच्या जीवनशैलीत फरक पडलेला दिसतो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या काही व्हिडिओच्या माध्यमातून विविध आसनांचा प्रचार करीत आहेत. गेल्या वर्षी डेहराडून इथे योग करणारे पंतप्रधान यावेळी झारखंडच्या रांची येथे कार्यक्रमात सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय योगदिनी राष्ट्रीय कार्यक्रमासाठी दिल्ली, सिमला, म्हैसूर, अहमदाबाद यांची निवड केली आहे. दरम्यान, राज्यस्तरीय योग नांदेड येथे होत असून मुख्यमंत्री फडणवीस, बाबा रामदेव तिथे उपस्थित राहतील. दीड लाख लोक हजर राहतील अशी सोय केली आहे. ३६ जिल्हा नि ३२२ तालुका मुख्यालयासह ३५८ ठिकाणी राज्य योग करेल, असं शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जीवनातील व्यायामाचे महत्त्व सांगणारी कविता इयत्ता नववीच्या पुस्तकात आहे. व्यायाम आरोग्यासाठी रक्षक असून तुमचा मित्र आहे. आळस हा सार्वत्रिक नि सर्व प्रकारचा शत्रू आहे. व्यायाम न करता चांगला आहार केला तर तो विष बनून शरीराला मारक ठरतो. पोट अग्नी प्रज्वलित होऊन अन्न सहज नि छान पचते. स्थूलता सुस्तपणा निघून जातो, अंगात उत्साह संचारतो. शरीर टवटवीत प्रसन्न राहते, बुद्धीचा कस वाढून ती समृद्ध आणि विचारांचा सजीवपणा टिकवून ठेवते. स्नायू बळकट होतातच शिवाय आयुष्य वाढते. अन्यथा, वायू, कफ, पित्त त्रिदोष तयार होऊन शरीराला जीर्ण करतात. शरीराची आजाराला प्रतिकारशक्ती वाढून स्वावलंबनाची वृत्ती येऊन अंगात काम करण्याचा उत्साह नि जोम वाढतो असा या कवितेचा भावार्थ आहे.

योगाभ्यासासाठी फार काही नियम नाहीत. सामान्य पातळीवर त्याच्या आचरणाची गरज नसते. पण, आध्यात्मिक हेतूने तो करणाऱ्या साधकांना आवश्यकता असते. स्वच्छ हवेशीर जागा, कपडे, सोयीचे असतात. वेळेचं काटेकोर बंधन, विशिष्ट जागा असं नसतं. रिकाम्या पोटी किंवा हलक्या पोटी, तसंच आपल्या क्षमता, इच्छेच्या तीव्रतेनुसार योगाभ्यास वेळ नि कार्यक्रम ठरवावा. त्यात नियमितपणा असावा. स्वस्थ सक्षम साधकप्रमाणे अतिवृद्ध, व्याधीग्रस्त अशक्त आदी समाजघटक यास पात्र असल्याचे ‘दृढप्रदीपिके’त नमूद आहे. यात अतिरेक नसावा तर यथाशक्ती आणि निरंतर आचरणात आणावा एवढी साधी अपेक्षा आहे. साधारण २५-३० मिनिटे इतका वेळ पुरेसा असतो.

तणाव मुक्ती, पोटाच्या तक्रारी, हृदय रोग, स्थूलत्व निवारण, मान कमरेचे दुखणे, मनस्वास्थ्य, प्रभावी श्वसन, आदींसह अनेक आजार विकार याने बरे होऊ शकतात. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने. मग बघा योग साधून आरोग्य मिळते का? पण रोज करण्याचा निर्धार करून. त्यासाठी म्हणा, सर्वेपि सुखिंन सन्तु सर्वे सन्तु निरामय!!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना अजून शासकीय ई-मेलच नाही?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिंदू मंदिर संवर्धन अभियान, मुंबई सांस्कृतिक...

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....
Skip to content