HomeArchiveनैराश्‍यावर बोलू काही..

नैराश्‍यावर बोलू काही..

Details
नैराश्‍यावर बोलू काही..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
नैराश्‍य, या मानसिक आजाराविषयी आपण माहिती पाहत आहोत. नैराश्‍य कोणत्‍याही व्‍यक्‍तीला येऊ शकते. श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरूष, लहान मुले ते वृद्ध या सर्वांच्या आयुष्यावर नैराश्य प्रभाव करते. शारीरिक आजारातून एकवेळ मनुष्य बरा होऊ शकतो. मात्र, नैराश्यातून बाहेर येणे अवघड बाब आहे. छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टीपासून ते व्यक्तिमत्व व करिअरवरदेखील नैराश्यामुळे परिणाम होतो. नैराश्य हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीस नेहमी उदास व निराश वाटते व दैनंदिन कामे तसेच सर्वच घटनांमधील इंटरेस्ट कमी होतो. सर्वसाधारणपणे दोन आठवडयांपेक्षा जास्त दिवस मानसिक त्रास झाल्यास त्यास आजार संबोधले जाते. त्याचा वागणुकीवर, नात्यावर व कुटुंबावरही तसेच दररोजच्या कामावरसुध्दा परिणाम होतो.

मानसिक त्रासाचा सर्वात मोठा दुष्परिणाम आणि अंतिम निष्कर्ष म्हणजे आत्महत्त्येचा विचार. या आजाराच्या रुग्णांना सतत उदास/निराश वाटते किंवा सतत चीडचीड होणे. थकवा येणे, शक्ति नसल्यासारखे वाटते. भूक कमी लागते, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे ही लक्षणे दिसतात. काही लोकांमध्ये मात्र विरूध्द लक्षणे दिसू शकतात. झोप न लागणे किंवा शांत व पुरेशी झोप न लागणे. काहीजणांना मात्र खूप झोप लागणे असाही त्रास होऊ शकतो. कामावरती लक्ष न लागणे, इच्छा कमी होणे, निर्णयक्षमता कमी होणे. आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही अशी नकारात्मक भावना मनात येते. आत्महत्त्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे, दुर्घटनेनंतर काही दिवस उदास, निराश वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येकवेळी असं घडायलाच हवं असं नाही.

काहीवेळा विनाकारणही डिप्रेशन येऊ शकतं. याला मुख्यतः मेंदूत होणारे रासायनिक बदल कारणीभूत असतात. बाळंतपणानंतर होणारे संप्रेरकातील बदल बऱ्याच स्त्रियांमध्ये कारणीभूत ठरतात. ब्लड प्रेशरची काही विशिष्ट औषधं, स्टेरॉइडस आणि काही पित्तशामक औषधांमुळेसुद्धा या आजाराची लक्षणे दिसू शकतात. लहानपणी घडलेल्या एखाद्या दुर्दैवी प्रसंगामुळेही मोठेपणी डिप्रेशन येऊ शकतं. गरिबी, बेरोजगार आयुष्यातील मोठ्या घटना/मानसिक आघात, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्फोट, प्रेमभंग, शारीरिक आजार तसेच दारू किंवा ड्रग्जचे व्यसन असल्यास नैराश्य होण्याचा धोका अधिक असतो. नैराश्य आल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीशी, नातेवाईक, मित्र यांच्याशी बोला. गरज असल्यास मनोविकारतज्ञाची मदत घ्या. आराम करा. तणावाची कारणमीमांसा शोधा. स्वतःसाठी वेळ द्या, छंद जोपासा, वाचन, खेळ, व्यायाम यामध्ये मन रमवणे सर्वात उत्तम.

आपल्यासमोर एखादी नैराश्यग्रस्त व्यक्ती असल्यास त्याच्याशी बोला, त्याला बोलते करा व त्यास मनोविकारतज्ञाची मदत घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे. नैराश्य रोखण्यासाठी मुलांना लहानपणापासूनच ताणतणाव, समस्या यांना सामोरे जाण्याची शिकवण दिली पाहिजे. नियमित समतोल आहार, व्यायाम, विश्रांती व सकारात्मक दृष्टिकोन यांमुळे नैराश्य रोखता येऊ शकते. औषधे आणि अल्कोहोल यापासून दूर राहणेही कधीही चांगले. कोणत्याही आजारावरील योग्य उपचार आणि समुपदेशनही भविष्यातील नैराश्य रोखू शकतात. १५ ते ३० टक्के व्यक्तींना कधी न् कधी नैराश्याच्या आजार होतोच. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. काही कुटुंबांमध्ये या आजाराबाबत आनुवंशिकता असते. वेगवेगळ्या आजारांमुळेही मेंदूचे आरोग्य बिघडून नैराश्य येते. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे मन उदास होते. व्यक्तीचे लक्ष नकारात्मक विचारांकडे केंद्रित होऊ लागते. त्यामुळे नैराश्य आणखीनच वाढते.

नैराश्यावर सर्वात महत्त्वाचा उपाय, समुपदेशन म्हणजे काऊन्सलिंग हाच आहे. मात्र समुपदेशन म्हणजे केवळ गप्पा करून वा बडबड करून हा आजार कमी होतो असे नाही. त्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी समुपदेशक असावे लागतात. योग्य प्रशिक्षित समुपदेशक असेल आणि सांगितलेले बदल करण्याची रुग्णात क्षमता असेल तर समुपदेशनाचा चांगला उपयोग होतो. समुपदेशन व्यवस्थित झाले पाहिजे अन्यथा त्याचे उलट परिणामही होऊ शकतात. नैराश्य आलेल्या व्यक्तीसोबत राहणे हेसुद्धा अनेकदा त्रासदायक होते. दु:खी चेहरा करून त्या सतत कसली तरी काळजी करत असल्याने इतरांचाही मूड बिघडतो. त्यांना समजवायचा प्रयत्न केला की, त्या एकतर रडायला सुरुवात करतात किंवा भांडायला उठतात. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काही प्रयत्न करायला त्या तयार नसतात. एकांतात राहयला त्यांना आवडते किंवा चिडचिड, भांडण यातच त्या अधिक वेळ घालवतात. अशी एखादी व्यक्ती आपल्या आजुबाजूला असेल तर प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की, त्या मुद्दामहून असे करत नाहीत. एखाद्याच्या विरोधात वागायचे किंवा बरोबरच्या व्यक्तीला त्रास द्यायचा, असे काही लोकांच्या मनातही नसते. त्यांना काहीही करायचा कंटाळा आलेला असतो.

मानसिक आणि शारीरिक थकवा आल्याची त्यांची भावना असते. कोणी बोलायचा प्रयत्न केला की त्रास होतो. आपल्याला होणाऱ्या त्रासावर त्यांना मृत्यू किंवा आत्महत्त्या हाच पर्याय वाटतो. नैराश्यग्रस्त व्यक्तीला पाठिंब्याची आणि सौहार्दपूर्ण वागणुकीची गरज असते. नैराश्य ही वैद्यकीय समस्या आहे आणि त्यासाठी औषधांची गरज आहे. उपचार व समुपदेशनामुळे निराशेतून लवकर बाहेर येण्यासाठी, त्रास टाळण्यासाठी, आत्महत्त्येपासून परावृत्त होण्यासाठी मदत होते. नैराश्यावर उपाययोजना करणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. याबाबत आजच विचार केला गेला नाही तर येत्या काळात नैराश्य हा सर्वात मोठा आजार असेल व मृत्यूचे सर्वात मोठे कारण हे नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्त्या असतील.”
 
“वैभव मोहन पाटील

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content