Details
डेंग्यू!
01-Jul-2019
”
वैभव मोहन पाटील
[email protected]
डेंग्यू हया आजाराबाबत आपल्या मनात खूप भीती आहे. या आजाराचा रूग्ण लवकर बरा होत नाही असा आपला सर्वसाधारण समज असतो. डेंग्यू हा किटकजन्य आजार असून विषाणूंमुळे पसरतो. म्हणजे योग्य आहार, द्रवपदार्थ व आराम या त्रिसूत्रीचा उपयोग केल्यास या आजाराचा रूग्ण बरा होतो. त्यामुळे या आजाराची भीती न बाळगता योग्य प्रतिबंधात्मक उपाय व उपचारांची अधिक गरज आहे. जगामध्ये डेंग्यूचा उद्रेक मागील तीन शतकांपासून शितोष्ण, समशितोष्ण व उष्ण कटीबंधात आढळून आलेला आहे. डेंग्यूचा पहिला उद्रेक इसवीसन १६३५ मध्ये फेंच वेस्ट इंडीज येथे आढळून आला. डेंग्यू ताप व एडिस इजिप्टाय डास प्रामुख्याने जगातील शितोष्ण कटिबंधात पसरलेला आहे. आजतागायत जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सहा विभागात (युरोप व्यतिरिक्त) डेंग्यूचा मोठया प्रमाणात उद्रेक आढळून आलेला आहे.
डेंग्यू हा विषाणूपासून होणारा आजार असून त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो. मागील दोन दशकांपासून डेंग्यू, ताप, डेंग्यू रक्तस्त्रावी ताप व डेंग्यू शॉक सिंड्रोमचे रूग्ण संपूर्ण जगात आढळून आलेले आहेत व त्यात सातत्याने वाढ होत आहे. स्वच्छ, साचलेल्या पाण्यात अंडी घालणारा ‘एडीस इजिप्ती’ हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो. हे डास शक्यतो सकाळी व संध्याकाळी चावतात. पावसाळय़ानंतर तापमानात होत असलेल्या चढउतारांमध्ये डेंग्यूच्या विषाणूंची संख्या वाढते आणि त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढते. डांसामुळे आलेल्या विषाणूंशी लढण्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडली की डेंग्यूची लागण होते. डेंग्यूची लक्षणे ही सर्वसामान्य विषाणू संसर्गाप्रमाणेच असतात. मात्र काही वेळा दोन-तीन दिवसांनी ताप उतरला की असह्य़ डोकेदुखी होऊ लागते, उलट्या होतात, अंग मोडून येते, सूज येते. डेंग्यूच्या तापामध्ये सांधे दुखतात, अंगावर चट्टेही उठतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळयांच्या मागे दुखणे इ. लक्षणे जाणवतात.
रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरूवात तीव्र तापाने होते व त्याच्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे जाणवतात. सुरुवातीच्या काही दिवसात याची लक्षणे साध्या डेंग्यू तापासारखी असतात व क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. नाकातून, हिरडयातून व गुदव्दारातून रक्तस्त्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात. भरमसाठ लोकसंख्या वाढ, अनियंत्रित शहरीकरण, कचऱ्याचे अपुरे व अयोग्य व्यवस्थापन, पाणीपुरवठयाचे अयोग्य व्यवस्थापन, अनियमित व कमी पाणीपुरवठा, पर्यटनातील वाढ, ग्रामीण भागातील मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणातील व जीवनशैलीतील बदल हे घटक डेंग्यू उद्रेकासाठी मुख्यत्वे कारणीभूत आहेत. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी फार काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र पुरेशा जनजागृतीअभावी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फार दक्षता घेतली जात नाही हेदेखील वास्तव आहे. डेंग्यू तापावर निश्चित असे औषधोपचार नाहीत. तथापि आजाराच्या लक्षणानुसार उपचार करण्यात येतात. या रूग्णांना अॅस्प्रिन, वेदनाशामक आणि झटके प्रतिबंधक औषधे दिली जात नाहीत. डेंग्यू तापाची तीव्र लक्षणे आढळल्यास त्या रूग्णाला संपूर्ण विश्रांती (बेड रेस्ट) घेण्याबाबत सल्ला देण्यात येतो. रूग्णाचे तापमान ३९ डिग्री सेल्सिअसच्या खाली राहण्यासाठी ताप प्रतिबंधक औषधे देण्यात येतात व रूग्णांना ओल्या कपडयाने पुसून घेणे आववश्यक असते. ज्या रूग्णांना जास्त प्रमाणात वेदना होतात त्यांना वेदनाशामक औषधे देण्याची आवश्यकता भासू शकते. ज्या रूग्णांना मोठया प्रमाणात उलटया, जुलाब, मळमळ व घाम येतो अशा रूग्णांच्या शरीरातील क्षार/पाणी कमी होऊ नये यासाठी घरी बनविलेल्या फळांचा रस व ओ.आर.एस.चे द्रावण दयावे. शरीरात जास्त प्रमाणात पातळ द्रव जातील याची काळजी घ्यावी. डेंग्यूचे निदान जेवढय़ा लवकर होईल, तेवढे चांगले आहे.
डेंग्यूवर परिपूर्ण उपचार सापडलेले नाहीत. मात्र त्याच्या लक्षणांवर उपचार केले जातात. दिवसातून दोन ते अडीच लीटर द्रवपदार्थ शरीरात जाणे आवश्यक आहे. आजार गंभीर स्वरूपाचा असल्यास रक्तदाब कमी होतो. रूग्णांना आयव्ही फ्लुइड (सलाइन) आणि प्लेटलेट्स द्याव्या लागतात. बहुतांश वेळा डेंग्यू बरा होत असला तरी त्यातील हेमोरेजिक प्रकार मात्र प्राणघातक आहे. या प्रकारात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाटय़ाने घसरते. अंतर्गत रक्तस्राव होऊन अवयव निकामी होतात. उपचार करण्यास उशीर किंवा आळस केल्यास प्रकृती गंभीर होते. डासांची संख्या कमी करणे व त्यांना दूर ठेवणे हाच या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय आहे. घरात व परिसरात पाणी साचू न देणे, फुलदाण्या, शोभेची झाडे, नारळाला कोंब यावा म्हणून ठेवलेले पाणी यातही डेंग्यूच्या अळ्या सापडतात. त्यामुळे साचलेले पाणी फार दिवस न ठेवता ते बदलत राहिले पाहिजे. अळया व डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून त्या जागा स्वच्छ ठेवायला हव्यात. सध्या सुरू झालेल्या पावसाळयात डेंग्यूची लागण व प्रसार रोखण्यासाठी सर्वांनीच दक्ष राहणे गरजेचे आहे.”
“वैभव मोहन पाटील