Details
ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू करा! खासदार राहुल शेवाळे यांची मागणी
01-Jul-2019
”
केएचएल ब्युरो
वाहनांची वाढती संख्या, होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे वायुप्रदूषण आणि शहराच्या रस्त्यांवर पडणारा अतिरिक्त ताण यावर उपाय म्हणून मानखुर्दजवळच्या ट्रॉम्बे येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली आहे.
हा जलवाहतुकीचा मार्ग लवकरात लवकर सुरू करून त्यानंतर शहरांतर्गत जलवाहतुकीसाठी नवे पर्यायही शोधण्याची गरज असल्याचे शेवाळे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत नमूद केले. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत दररोज सुमारे सहा लाख वाहने प्रवेश करतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असल्याचे, स्पष्ट झाले आहे. मुंबईत, देशभरातून लाखो लोक रोजगारासाठी येत असतात. वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण या समस्यांबरोबरच प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहे. मुंबईतील जागा आता नव्याने वाढू शकत नाही. त्यामुळे जलवाहतुकीचा पर्याय सरकारने लवकरात लवकर उपलब्ध करावा आणि त्याची सुरूवात ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गाने करावी, असे खासदार शेवाळे यांनी केंद्रीय वाहतूक राज्यमंत्र्यांना सांगितले. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले. याआधीही शेवाळे यांनी या मागणीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली होती.”
“केएचएल ब्युरो