HomeArchiveडॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी...

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदेंचे संसदेत खासगी विधेयक

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
डॉक्टर आणि रूग्णालयांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी अस्तित्वातील कायदे निष्प्रभ ठरत असल्यामुळे स्वतः डॉक्टर असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या कायद्याचे खासगी विधेयक मांडले.

डॉक्टर तसेच रूग्णालयांवर हल्ल्यांचे प्रकार वाढत आहेत. डॉक्टरांच्या हेतूवरच शंका घेऊन रूग्णाच्या नातलगांकडून हल्ले केले जातात. पोलीस आणि सरकार हे हल्ले रोखण्यास तसेच हल्लेखोरांना अटक करून न्यायपालिकेमार्फत त्यांना शिक्षा देण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळेच हे प्रकार वाढत असून ते रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी यापूर्वी लोकसभेत केली होती. मात्र, या मागणीची दखल घेतली न गेल्यामुळे शुक्रवारी खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत याबाबतचे खासगी विधेयक मांडले. याअंतर्गत हल्लेखोरांना किमान सहा महिने ते कमाल पाच वर्षे तुरूंगवास आणि किमान पाच हजार ते कमाल पाच लाख रूपयांचा आर्थिक दंड या शिक्षेची तरतूद आहे. तसेच, हल्ल्यात स्थावर, जंगम मालमत्तेचे जे नुकसान होईल, त्याचीही वसुली हल्लेखोराकडून करण्याची तरतूद या खासगी विधेयकात आहे.

आर्थिक दंड भरण्याची क्षमता हल्लेखोरांची नसल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही विधेयकात आहे. त्याचबरोबर, उपचार करण्यापूर्वी रूग्ण आणि नातलगांना रूग्णाची सद्यस्थिती, करावे लागणारे वैद्यकीय उपचार आणि त्यासाठी राबवली जाणारी प्रक्रिया, या उपचारांचे होऊ शकणारे परिणाम, त्यातील संभाव्य धोके यांची संपूर्ण कल्पना लिखित स्वरूपात देण्याची जबाबदारी डॉक्टरांवर टाकण्यात आली आहे. या कठोर कलमांमुळे डॉक्टर अथवा रूग्णालयांवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोर दहादा विचार करतील. हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांना शिक्षा होण्याऐवजी हल्ला होऊच नये, यादृष्टीने कायद्यात कठोर कलमांची तरतूद करण्यात आल्याचे खा. शिंदे यांनी सांगितले. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासही या कायद्यामुळे मदत होईल, असेही त्यांनी या विधेयकात म्हटले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content