HomeArchiveजोगेश्‍वरीत भव्य कला-क्रीडा...

जोगेश्‍वरीत भव्य कला-क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरूवात!

Details
जोगेश्‍वरीत भव्य कला-क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरूवात!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईच्या जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला व क्रीडा गुणांना अधिक वाव मिळावा या उद्द्येशाने विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा क्षेत्रात भव्य ‘कला-क्रीडा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते १३ जानेवारीपर्यंत चालणार्‍या महोत्सवाचे शानदार उद्घाटन ५ जानेवारीला सकाळी माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, शिवाई, पूनम नगर येथे करण्यात आले. 

दरवर्षी विधानसभा क्षेत्रात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात धावणे, कब्बडी, लांब उडी, गोळा फेक, अंडर आर्म क्रिकेट, खो-खो, कॅरम, बुद्धीबळ, सांघिक नृत्य, अभिनय, समूहगान, गीत गायन, हस्ताक्षर व वक्तृत्व स्पर्धांचा यंदा समावेश करण्यात आला आहे. जोगेश्‍वरी पूनम नगर येथील शिवाई मैदान, शिवाई सभागृह, इच्छापूर्ती गणेश रंगमंच, द. गो. वायकर सभागृह गणेश मंदिर, या ठिकाणी विविध स्पर्धा पार पडणार आहेत. विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धांमध्ये जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी होणार असून खुल्या गटातही या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content