HomeArchiveगृहनिर्माण संस्थांसाठी रविवारी...

गृहनिर्माण संस्थांसाठी रविवारी बोरीवलीत मार्गदर्शन शिबीर

Details
गृहनिर्माण संस्थांसाठी रविवारी बोरीवलीत मार्गदर्शन शिबीर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या पुनर्विकासापासून ते डीम्ड कन्व्हेन्सपर्यंत सर्व प्रश्नांसंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यासाठी पहिले शिबीर गेल्या आठवड्यात मुंबईच्या दादर येथे झाले. त्यांनतर आता दुसरे शिबीर रविवारी दि. २० जानेवारी रोजी मुंबईतच बोरीवली येथे होत आहे.

गृहनिर्माण संस्थांचे कामकाज, सहकारी कायदा व उपविधी, अभिहस्तांतरणबाबत मोफत “मार्गदशन शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर सकाळी १० ते १ या वेळेत, स्वर्गीय रघुवीर सामंत सभागृह, फुलपांखरू उद्यान, मागाठाणे बस डेपोशेजारी, बोरीवली पूर्व येथे होत आहे.

शिबिराचे उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, बँकेचे संचालक व सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर उपस्थित असतील. हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल.
विविध विषयवार विभागीय सहनिबंधक मो. अ. अरिफ, जिल्हा निबंधक आर. आर. वीर, उपनिबंधक जे. डी. पाटील, एम. व्ही, निकाल, डॉ. अविनाश भागवत, आर. आर. बोर्डाचे मुख्याधिकारी दिनकर जगदाळे, हौसिंग फेडरेशनचे सचिव ऍड डी. एस. वडेर, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण कदम, आर्किटेक्ट सौरभ चॅटर्जी, चंद्रशेखर प्रभू, अमितकुमार हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष मोहित परुळेकर आणि मुंबई बँकेचे उपव्यवस्थापक उदय दळवी मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरात खालील विषयावर चर्चा होईल

* संस्थेचे सभासदत्व, नामांकन आणि व्यवस्थापन.
* सदनिका हस्तांतरण (ट्रान्स्फर), प्रीमियम आकारणी व बिनभोगवटा शुल्क.
* घटनादुरुस्तीनुसार गृहनिर्माण संस्थांची नवीन निवडणूक कार्यपद्धती.
* कलम १०१ अंतर्गत वसुलीची कार्यपद्धती व अंमलबजावणी.
* घटनादुरुस्तीनुसार मोफा कायदा आणि त्याअंतर्गत अभिहस्तांतरण व मानीव हस्तांतरण.
* अभिहस्तांतरण व स्वयं-पुनर्विकास.
* लेखापरीक्षण, तपासणी व चौकशी.
* प्रश्नोत्तरे.
या शिबिराला गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव, कार्यकारी सदस्य, तसेच सभासदांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी केले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना अजून शासकीय ई-मेलच नाही?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिंदू मंदिर संवर्धन अभियान, मुंबई सांस्कृतिक...

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....
Skip to content