HomeArchiveभारतीयांनी काश्मीर पर्यटनावर...

भारतीयांनी काश्मीर पर्यटनावर बहिष्कार घालावा – डॉ. मनीषा कायंदे

Details
भारतीयांनी काश्मीर पर्यटनावर बहिष्कार घालावा – डॉ. मनीषा कायंदे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
काश्मीर प्रश्‍न सुटल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही हे पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने सिद्ध झाले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले असून उरीमध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्याविरोधात रशिया, भूतान, अमेरिका, कॅलिफोर्निया, अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, इस्राईलसह जगभरातील अनेक देशांनी भारतीय जवानांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. गेल्या काही काळात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या घडामोडी या सगळ्याच देशाच्या चिंतेचा विषय झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील तरूणांनी, महिला व लहान मुलांनीदेखील जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलातील व भारतीय सैन्यांच्या ताफ्यावर दगडफेक फेकण्यापर्यंत मजल मारली आहे. या मानसिकतेवर जर अंकुश ठेवायचा तर जम्मू काश्मीरमधील नागरिकांची आर्थिक रसद बंद केली पाहिजे. त्यासाठी या हल्ल्याच्या निषेधार्थ पुढील २ वर्षे सर्व भारतीयांनी काश्मीर पर्यटनावर बहिष्कार घालावा, असे आवाहन शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केले आहे.

काश्मीरमधील भौगोलिक समृद्धीने व सुंदरतेने सदैव परदेशी व देशातील पर्यटकांना आपलेसे केले आहे व अनेक पर्यटकांचा ओढा हा जम्मू-काश्मीरची अनुभूती घेण्यासाठी असतो व हीच बाब तेथील स्थानिक नागरिकांसाठी फायद्यासाठी ठरत आहे. परंतु या अर्थाजनाचा वापर जर भारताच्या व भारतीय सैनिकांच्या विरोधात होत असेल तर भारतातल्या नागरिकांनी जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर पुढील दोन वर्षांसाठी बहिष्कार घालावा. दहशतवादाविरोधात लष्कर योग्य पद्धतीने कारवाई करत असते. परंतु लष्कर व दहशतवाद्यांमध्ये जेथे चकमक घडते, तेथे आसपासच्या गावातील युवक एकत्र येतात. दगडफेक करून दहशतवाद्यांना तेथून पळून जाण्यासाठी मदत करतात.जम्मू-काश्मीरमधील ही लढाई आता फक्त भारतीय सैन्याची नसून भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे या पर्यटन बंदीसाठी आपण सर्वानीच पुढाकार घेतला पाहिजे. चीन हा आपला मित्र असल्याचे वरकरणी दिसत असले तरी संयुक्त राष्ट्र सभेमध्ये चीनने पाकिस्तानाच्या बाजूने नेहमीच कौल दिलेला आहे, हे कधी विसरता कामा नये व यासाठी “मेड इन चायना” वस्तूंवर बाहिष्कार घालून चीनची आर्थिक कोंडी करायला हवी, असेही त्या म्हणाल्या.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content