Details
देवीपाडा सदगुरू नगर विद्युत सबस्टेशनचे स्थलांतरण!
01-Jul-2019
”
आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांना यश
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील सद्गुरू इमारतीमधील नागरिकांच्या विद्युत सबस्टेशन स्थलांतरीतांची समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रविण दरेकर यांनी अथक परिश्रम घेतले. यासाठी ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन पत्रव्यवहार केला. त्या प्रयत्नांना यश येऊन विद्युत सबस्टेशन स्थलांतरीतांचा शुभारंभ आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
शुभारंभप्रसंगी भाषणात आमदार प्रविण दरेकर यांनी नागरिकांच्या एकजुटीचे कौतुक केले. मागाठाणे मतदारसंघात विकासकामे त्यांनी केल्याचे सांगून भविष्यात मागाठाणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा एकच ध्यास घेऊन काम करतोय. यासाठी सद्गुरू इमारतीच्या सोसायटीतील पदाधिकाऱ्यांबरोबरच तरूणांनी पुढाकार घेतल्याबद्दल कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले. मागाठाणे क्षेत्रातील विकासकामासाठी अशाप्रकारे तरूणांनी सक्रीय होऊन सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी नगरसेवक गणेश खणकर, भाजपा विधानसभा अध्यक्ष मोतीभाई देसाई, शिवसेना महिला मा. विभाग संघटक रश्मी भोसले, विकासक अमेय राणे, विक्रम चोगले, भाजपा विधानसभा उपाध्यक्ष रविंद्र जुळवे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित उतेकर, सुलोचना रघुवंश, महेश दाभोळकर, सद्गुरू कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष विनायक मराठे, उपाध्यक्ष स्वप्निल धर्माधिकारी, सेक्रेटरी योगेश देसाई, खजिनदार महेश मांद्रे, उपसेक्रेटरी अभिजीत सकपाळ, उपखजिनदार अनंत तेजम, सल्लागार बबन सावंत, अमोल नाईक, प्रकाश साळवी, हर्षद मराठे, अमित गोपाळे, कमलेश घडशी, सुशील कावळे, राजन बागवे, विनोद चाळके, प्रवीण जुवळे, प्रमोद वैद्य, अरविंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.”
“आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांना यश