Details
पासपोर्ट सेवा केंद्र आता सायनमध्ये!
01-Jul-2019
”
खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते लोकार्पण
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण- मध्य मुंबईतील नागरिकांना खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने एक खुशखबर नुकतीच देण्यात आली आहे. पासपोर्ट काढण्यासाठी वरळी किंवा ठाण्याला चकरा मारणाऱ्या सायन, धारावी, वडाळा, चेंबूर, मानखुर्दच्या राहिवाशांना आता सायनमध्येच पासपोर्ट काढता येणार आहे. केंद्र सरकार आणि टपाल खात्याच्या वतीने सायन पोस्ट ऑफिसमध्ये सुरू होणाऱ्या नव्या ‘पासपोर्ट सेवा केंद्रा’चा लोकार्पण सोहळा खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते काल पार पडला. यावेळी शिवसेना विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार, मनीषा कायंदे, तुकाराम काते, तामिळ सेलवन आणि टपाल खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरात हक्काचे पासपोर्ट ऑफिस असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून दक्षिण- मध्य मुंबईतील राहिवाशांकडून होत होती. या मागणीची दखल घेत खासदार राहुल शेवाळे यांनी पाठपुरावा केला आणि सायनच्या पोस्ट ऑफिसमध्ये ‘पासपोर्ट सेवा केंद्र’ उभे राहिले.
नवा पासपोर्ट काढणे, पासपोर्ट नूतनीकरण, पुनर्नोंदणी, जलद पासपोर्ट पडताळणी, ऑनलाइन पेमेंट अशा पासपोर्ट ऑफिसात मिळणाऱ्या साऱ्या सुविधा या पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहेत. या नव्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.”
“खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते लोकार्पण