HomeArchiveबाळासाहेबांना दिलेला शब्द...

बाळासाहेबांना दिलेला शब्द पडू दिला नाही – उद्धव ठाकरे

Details
बाळासाहेबांना दिलेला शब्द पडू दिला नाही – उद्धव ठाकरे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जनता जनार्दन सत्ता देते. त्यांचा विश्वास गमावू नको, असा सल्ला बाळासाहेबांनी दिला होता. हा सल्ला जपत प्राण गेला तरी बेहत्तर.. पंरतु शब्द पडू दिला नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कोकणातल्या गुहागर येथे झालेल्या जाहीर सभेत केले.

येथे येताना दिंडीने स्वागत झाले. हा शुभशकून आहे. वारकऱ्यांचे आशीर्वाद लाभले आहेत. त्यांच्या खांद्यावर भगवा आहे. आपल्याही खांद्यावर भगवा आहे. ही भगवी पताका घेऊन ते पंढरपुरकडे जातात तसेच आपले मावळे दिल्लीत पाठवायचे आहेत. आम्ही अन्यायविरोधात दगडधोंडे हाती घेतो. मच्छिमारांचा विषय आम्ही मार्गी लावला. केंद्र सरकारने यावर मार्ग काढला. सर्व नेते प्रचारात असताना कोकणातील मच्छिमारांचे प्रश्न मार्गी लावले. एलइडी लाइटद्वारे मासेमारी केली जाते, हा भयंकर प्रकार आहे. अनंत गितेवर टीका करतात. टीका करणाऱ्यांनी अनेक उद्योग सुरू केले. त्यांनी सिंचन घोटाळा केला. त्यांच्या नेत्यांनाही लोकांनी लाथा घातल्या आहेत, असे ते म्हणाले.

परवा विदर्भात असता वर्तमानपत्रात एक जाहिरात वाचली. लाज नाही का वाटत, अशी ही जाहिरात होती. हा प्रश्न विचारणारे कोण होते तर काँग्रेस-राष्ट्रवादीवाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा लाजेशी कधी संबंध आला काय? आम्ही युती केल्यानंतर शिवसेना लाचार झाली असे शरद पवार म्हणत होते. आम्ही लाचारी कधी स्वीकारली नाही. आमच्याकडे नम्रता आहे. मी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारतो की तुम्हाला लाज वाटत नाही काय? शरद पवारांची राजकीय कारकीर्द गद्दारीने झाली आहे. ज्यांच्यासोबत राहिले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केले. पवारांनी सुरूवातील राजीव गांधींवर टीका केली. सोनिया गांधीवर टीका केली. तरी काँग्रेसच्यासोबत राष्ट्रवादी जाते. ही लाचारी आहे, असे ठाकरे म्हणाले.

येत्या पाच वर्षांत लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोकणवासीयांना जे हवे ते देण्याचे प्रयत्न केले जातील. २५ वर्षांपासून आमची युती आहे. ती मजबूत राहणार. राममंदिराचा विषय थंड बस्त्यात पडला होता. आता हालचाली सुरू झाल्या आहेत. कोर्टानेदेखील कालमर्यादा ठरवून द्यावी. माझा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. युतीच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना टेन्शन देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. जे जे देशविरोधी कारवाया करतात, त्यांना फासावर लटकवण्याची ग्वाही जाहीरनाम्यात देण्यात आलेली आहे. युतीचे सरकार नेभळट आणि नपुसक असू शकत नाही. जो कोणी स्वराज्यासोबत द्रोह करणारे असतील त्यांना टकमक टोकावरून ढकलले पाहिजे. हा हिंदुस्थान आहे. इटली नाही. राहुल गांधीला सांगू इच्छितो येथे नामर्द जन्माला येऊ शकत नाहीत. राहुल गांधी यांनी सावरकरांवर हिनकस पद्धतीने टीका केली आहे. ज्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे ते आम्ही विसरू शकत नाही. जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यांसाठी जे काय केले त्याचा आम्हाला आदर आहे. परंतु सावरकरांवर टीका करणे योग्य नाही. सावरकारांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. सावरकर आणि त्यांचे बंधू एकाच जेलमध्ये होते. राहुल गांधी या नालायक कारट्याने सावरकरांचा अवमान केला आहे, असेही त्यांनी सांगितले. कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प येणार नाहीत. त्याला शिवसेनेचा कायम विरोध राहील, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

युतीच्या सर्व जागा पुन्हा निवडून द्या – सुभाष देसाई

महाराष्ट्रात युतीचा झंझावात सुरू झाल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीला वेड लागले आहे. युतीची घोषणा झाल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या संघर्षयात्रेच्या गाड्या पंक्चर झाल्या आहेत. युतीमध्ये जादू आहे. युतीपुढे सर्वजण हतबल झाले आहेत. जेव्हा जेव्हा देश संकटात येतो, तेव्हा महाराष्ट्रात धावून जातो. हिमालय अडचणीत आला तर सह्याद्री धावून जातो. त्याप्रमाणे या निवडणुकीत देशहिताचा विचार करून भाजपसोबत युतीची घोषणा केली, असे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

अनंत गिते यांची निवड बाळासाहेबांनी केली. तेव्हापासून ते विजयी होत आले आहेत. सहा-सहा वेळा जनतेने त्यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. यावरून त्यांच्यावरील जनतेचा अतूट विश्वास दिसून येतो. बाळासाहेबांचा हाच विश्वास पुढे नेत उद्धव ठाकरे यांनीदेखील गिते यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. शिवसेना आणि कोकणाचे नाते अनेक वर्षांपासूनचे आहे. मागच्या पंधरा वर्षांत आघाडीने रखडून ठेवलेली कामे शिवसेना-भाजपने पूर्ण केली आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे, हे त्याचे उदाहरण होय. नितीन गडकरी, अनंत गिते यांनी पुढाकार घेऊन रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. कोकण रेल्वेच्या दुसऱ्या पटरीचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी गितेंची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

गिते आणि मी आम्ही दोघे रत्नागिरीची सुपूत्र आहोत. आमच्या भाग्यात एकाचवेळी उद्योगमंत्रीपद उपभोगण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही छोटे-मोठे आहोत. परंतु खोटे नाहीत. सत्तेवर आल्यानंतर मी विरोधकांचे खाण्याचे मार्ग बंद केले. एमआयडीसीचे पैसे तातडीने मिळावे आणि त्यांना कमिशन मिळावे, यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी दबाव झुगारून त्यांचे काम होऊ दिले नाही. अनेक वर्षे असे कारस्थान सुरू होते. गेल्या पाच वर्षांत हे कारस्थान बंद केले. त्यामुळे माझ्याबाबत जळफळाट होता. पैसे ढापण्याचे मार्ग बंद झाले. कुत्रा वेडा झाल्यानंतर तो वाटेल त्याला चावतो. मग महापालिकेचे लोक येतात आणि त्यांना घेऊन जातात. तशाच प्रकारे या पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडून अंधाऱ्या कोठडीत टाकले पाहिजे, असेही देसाई म्हणाले.

सिंचन घोटाळ्यातील आरोपींना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सध्या या घोटाळेबाजांचा एक पाय तुरूंगात तर एक पाय बाहेर आहे. माणगावच्या सभेत मी याचा पुराव्यानीशी समाचार घेणार आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून या पट्ट्यात भगव्याची सत्ता आहे. २०१४ प्रमाणे यावेळीदेखील आपण युतीचे सर्वच्या सर्व खासदार निवडून द्यावेत, असे आवाहनही देसाई यांनी केले.

सापाला ठेचून काढा – अनंत गिते

मी भाषण करणार नाही तर आपणाला दंडवत घालणार आहे. याठिकाणी फक्त एक किस्सा सांगणार आहे. काही दिवसांपूर्वी मी अलिबाग तालुक्यातील कुसुडे गावात गेलो होतो. सभेला मोठी गर्दी होती. रात्री साडेआठ वाजता मी सभेला गेलो. मी बोलण्यास उभा राहिल्यानंतर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला गोंधळ सुरू झाला. तेव्हा सभेत साप शिरल्याचे जाणवले. त्यामुळे घबराट झाली. सापाला कोणी मारू नका असे मी कार्यकर्त्यांना सांगितले. ग्रामस्थांनी सांगितले की हा साप विषारी आहे. त्याने दंश केला तर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. तो साप सळसळत स्टेजकडे येत होता. एका कार्यकर्त्यांने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्याला ठेचून काढले. या निवडणुकीत आपल्याला दुसऱ्या सापाला ठेचायचे आहे. गेल्या वेळी तो अर्धमेला झाला होता. यावेळी त्याला कायमचे ठेचायचे आहे, असे येथील उमेदवार आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content