HomeArchiveकाँग्रेसने पंतप्रधानपदाचे केवळ...

काँग्रेसने पंतप्रधानपदाचे केवळ स्वप्नच पाहवे – उद्धव ठाकरे

Details
काँग्रेसने पंतप्रधानपदाचे केवळ स्वप्नच पाहवे – उद्धव ठाकरे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
काही लोक म्हणतात शिवसेनेने काय केले? आम्ही काय केले हे जनतेला माहित आहे. विरोधकांनी आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना ठेचून काढू. आमच्याकडे आता असे पुरावे आहेत की आम्ही तुम्हाला पुरून टाकू. कोकणची जनता ही साधी भोळी, पण मर्द आहे. या मतदारसंघाला मधु दंडवते आणि सुरेश प्रभू यांची परंपरा आहे. मतदार हा प्रत्येकाला संधी देत असतो. या संधीचे सोने करायचे की माती करायची हे उमेदवाराने ठरवायचे असते, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी सिंधुदूर्गाच्या जाहीर सभेत केले.

सिंधुदूर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारसभेत ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले की, काँग्रेसला पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. त्यांना म्हणावे तुम्ही फक्त स्वप्नच पाहत रहा. साठ वर्षे सत्तेत राहून माजलेली काँग्रेसची लोकं या पाच वर्षांत सुधारतील का? काँग्रेसवाले स्वतः दरोडेखोर आहेत आणि दुसऱ्यांना चोर म्हणत आहेत. 56 पक्ष यांना एकत्र बोलवा आणि विचारा की एकमताने तुमच्या पंतप्रधानांचे नाव सांगा, पंतप्रधानांची खुर्ची ही काही संगीत खुर्ची नाही. युती हिंदुत्वासाठी केलेली आहे. मी जाहीर सभेमध्ये सांगतो की, युती करताना मी माझ्या स्वतःसाठी काहीच मागितलेले नाही. जे मागितले ते तुमच्यासाठीच मागितले. बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन यांना बोलले होते की एक दिवस या देशात हिंदू हिंदुत्वासाठी मतदान करेल. मी युती केली आणि या निर्णयाची मला लाज वाटत नाही. आम्ही चोरूनमारून काही करत नाही. जे करतो ते खणखणीतपणाने करतो. खोटं बोलणारी आमची अवलाद नाही. जे बोलतो ते करून दाखवतो. मला आपणा सर्वांकडून वचन पाहिजे. इथे आम्ही रोजगार उपलब्ध करू. तुम्ही इथे रोजगारासाठी या पण मुंबईसोबत असलेले नाते कधीही तोडू नका.

मुफ्ती म्हणाल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपने उमेदवारी दिली. नरेंद्र मोदी 370 कलम काश्मीरमधून काढणार, असे बोलत आहेत यांना तुम्ही मतदान करणार की, 370 कलम आम्ही काढणार नाही म्हणणाऱ्या राहुल गांधी यांना मतदान करणार? पाकिस्तानने जर पुन्हा हल्ला केला तर पाकिस्तानच शिल्लक ठेवणार नाही. राहुल गांधींसारखा कारटा कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही, किंबहुना त्याला आम्ही होऊ देणार नाही. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये निर्णय घेण्यात आला की सावरकरांवर धडे देणार. कन्हैया कुमार यांच्यासारख्या माकडांना कळले पाहिजे सावरकर कोण होते. राहुल गांधीने काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर सावरकरांविरोधात उद्गार काढले. शरद पवार बोलतात की, ज्या घराण्यांनी देशासाठी त्याग केलेला आहे, त्यांचा आदर केला पाहिजे. मणिशंकर अय्यर यांनी अंदमानातील सावरकर यांच्या ओळी काढल्या होत्या. ही आहे काँग्रेसची अवलाद. तुम्हाला सावरकरांची एलर्जी का? सावरकर यांनी एका जन्मात दोन वेळा जन्मठेप भोगली. नेहरूजींची कोठडी बघा आणि सावरकर यांची कोठडी बघा. राहुल गांधी तू एक दिवस सावरकर यांच्या कोठडीत राहा आणि मग सांग, साही ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादी नाही खुर्चीवादी

देव, देश आणि धर्म यांसाठी मी युती केली. राम मंदिर हा मुद्दा युतीच्या जाहीरनाम्यात आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नाही. कोकणचा विकास पर्यावरण अबाधित ठेवून मी करून दाखवीन हे मी तुम्हाला वचन देतो. विनायक राऊत यांना भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्या असे मी आपणास आवाहन करतो, असेही ते म्हणाले.

युवकांच्या हाताला रोजगार देणार- विनायक राऊत

मधू दंडवते आणी सुरेश प्रभू यांच्यासारख्या लोकांनी इथे नेतृत्त्व केले आहे. ही भूमी संतांची आहे. या मतदारसंघात 55 हजार नवीन युवक मतदार आहेत. जे प्रथमच मतदान करणार आहेत. नवीन युवकांना रोजगार देण्याचे काम ही आमची जबाबदारी आहे. सिंधुदूर्गात मी नवीन उद्योग आणून युवकांना रोजगार देईन हे मी वचन देतो. दोन हजार गावे असलेला हा मतदारसंघ आहे. मुंबई ते गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करायचे काम गडकरी करत आहेत, असे विनायक राऊत म्हणाले.

कोकणी माणसांचा विकास आवश्यक- सुरेश प्रभू

मी पूर्ण देशभर फिरतोय. सगळीकडे लोकांचे एकच म्हणणे आहे की नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान म्हणून या देशाला हवे आहेत. कोकणाचा विकास तर होईलच. पण कोकणी माणसाचा विकासही झाला पाहिजे. या मतदारसंघाला रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग असे दोन जिल्हे आहेत. शेतकरी, तरूण, मच्छिमार, मागासवर्गीय या सर्वांना केंद्रस्थानी धरूनच विकासाची कामे होतील. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळून त्यांचे उत्पन्न वाढवले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारी नवीन रेल्वे रूळाचा प्रकल्प आपण करत आहोत, असे सुरेश प्रभू म्हणाले.

त्यांचे अबतक 56 करू – विनोद तावडे

या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचा कार्यकर्ता एकत्र असल्याने युतीची ताकद वाढली आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या सलोख्याच्या संबंधांमुळे आज आपली युतीही पुढे चालू आहे. देशाच्या जनतेने पुढचा पंतप्रधान ठरवलेला आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी. शरद पवार साहेब जे बोलतात ते कधीच करत नाहीत. शरद पवार म्हणजे थापा मारणारे नेतृत्त्व. 56 पक्ष जरी एकत्र आले तरी 56 इंचाच्या छातीचे काहीही करू शकणार नाही, आम्ही त्यांचे अब तक 56 करून टाकू.. नरेंद्र मोदी यांनी पुलवामाच्या घटनेनंतर लष्कराला पूर्ण सूट दिलेली होती. हीच सूट मनमोहन सिंह यांनी कधीही लष्कराला दिली नाही. आपण पुलवामा हल्ला झाल्यानंतर जे प्रत्युत्तर पाकिस्तानला दिले त्यावर कोणत्याही देशाने नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. गडकरी साहेबांनी सहा महिन्यांच्या आत सावित्री नदीवरचा पूल बांधून दाखवला. कोकणामधील सामान्यांच्या समस्या सोडवण्याचे काम भाजप-शिवसेना युतीने नेहमीच केले आहे. राहुल गांधी च्या गोष्टी करू शकत नाहीत त्या ते बोलून दाखवत आहेत, असे विनोद तावडे म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content