Details
रविवारच्या बाईक रॅलीला ईशान्य मुंबईत तरूणाईचा जोरदार प्रतिसाद!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत लोकसभा निवडणुकीचे मतदान २९ एप्रिलला होत असून मतदानापूर्वी प्रचाराचा शेवटचा रविवार महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत सार्थकी लावला. काल सुट्टीचा दिवस असल्याने तसेच येत्या शनिवारी सायंकाळी प्रचार थंडावणार असल्याने मतदारसंघातील सर्वच भागात जास्तीतजास्त संख्येने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते धडपडत होते. मतदानाला आता अवघा एक आठवडा शिल्लक असल्याने एकत्र प्रचाराऐवजी महायुतीने नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विविध गटागटांद्वारे प्रचारावर भर दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार बाईक रॅली आणि पदयात्रांसह मतदारांच्या घरोघरी जात वैयक्तिक भेटीगाठींवरभर देत महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी ईशान्य मुंबईत सार्थकी लावला. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने सकाळपासूनच महायुतीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारसंघातील विविध भागात फिरून थेट मतदारांशी संवाद साधताना दिसत होते. काहींनी तर सकाळी सहा वाजल्यापासूनच मतदारसंघातील उद्याने, सार्वजनिक वाचनालये तसेच चहाच्या स्टॉल्स वगैरेंना भेटी देत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. सुट्टी असल्याने महायुतीचे सर्व युवा व महिला कार्यकर्तेही उत्साहाने प्रचारात सहभागी झाले होते. रविवारी प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद वापरल्याने सकाळी प्रचाराचा जोर होता, तर दुपारी तो काही काळ थंडावला आणि पुन्हा चारनंतर प्रचाराने उसळी घेतली. पारंपरिक प्रचार पद्धतीसोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हायटेक प्रचारावरही भर दिला होता. प्रचाराचे क्षणाक्षणाचे अपटेडस, छायाचित्रे, फेसबुक पेज, वॉट्सअॅप, आणि ट्वीटरसारख्या समाज माध्यमातून व्हायरल केले जात होते. कार्यकर्त्यांच्या या प्रचारनियोजनाला मतदारांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला पाहयला मिळाला.
बाईक रॅलीला प्रचंड प्रतिसाद
ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी महा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पंतनगर बेस्ट डेपोपासून मुलुंड बालराजेश्र्वर मंदिरापर्यंत निघालेल्या या महाबाईक रॅलीत युवावर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. विशेषकरून महिला आणि महाविद्यालयीन तरूणींनीही बाईकवर स्वार होत महायुतीसाठी
मतदानाचे आवाहन केले. यावेळी भाजप, शिवसेना आणि रिपाईच्या झेंड्यांमुळे परिसर महायुतीमय झाला होता.
”
“केएचएल न्यूज ब्युरो