Details
उत्तर भारतीयांच्या सुख-दु:खात सामिल होणाऱ्या कीर्तिकरांना विजयी करा – दिनेश शर्मा
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
उत्तर भारतीयांच्या सुख-दु:खात सामिल होणारे, त्यांच्या प्रश्नांची जाण असलेले कार्यतत्पर शिवसेना-भाजपा-रिपाईं महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यांचे आवाहन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले.
महायुतीचे उमेदवार कीर्तिकर यांच्यासाठी प्रेमनगर, गोरेगाव (प) व कुरारगांव, आप्पारपाडा, मालाड (पू) येथील प्रचार सभेत बोलताना ते पुढे म्हणाले की, सर्जीकल स्ट्राचईकला फर्जीकल स्ट्राईक म्ह्णून हिणवणाऱ्या काँग्रेसच्या संजय निरूपम यांचा दारूण पराभव करून महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना प्रचंड मताधिक्या्ने विजयी करा.
महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी या लोकसभा मतदारसंघातील केलेल्या कामाचा आढावा घेतला. उत्तर भारतीयांना गावी जाण्यासाठी खासदार कोट्यातून आरक्षण मिळवून देतो. पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधीव्दारे अनेक गरजू-गरीब उत्तर भारतीयांना मदत मिळवून देण्यात मी पुढाकार घेतला आहे. होळी महोत्सव, लाई चना, बाटी-चोखा, बिरहा अशा उत्तर भारतीयांच्या पारंपारिक व सांस्कृ्तिक कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून केले जाते, असे ते म्हणाले.
याप्रसंगी व्याासपीठावर राज्य मंत्री विद्या ठाकूर, आमदार सुनील प्रभू, भाजपाचे अमरजीत मिश्रा, जयप्रकाश ठाकूर, रिपाईंचे काकासाहेब खंबाळकर, शिवसेना पदाधिकारी राजू पाध्यें, दीपक सुर्वे, उत्तर भारतीय कार्यकर्ता मंचचे अशोक तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो