Details
अरविंद सावंत यांच्या रूपाने मुंबईला मिळाले सशक्त प्रतिनिधित्व – लोढा
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळासाठी निवड केल्यामुळे मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. या आनंदाच्या क्षणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे उपाध्यक्ष लोढा म्हणाले की, सावंत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाल्याने दक्षिण मुंबईला आणखी एक सशक्त प्रतिनिधित्व लाभले आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, सावंत यांना दक्षिण मुंबईतील समस्यांबाबत माहिती आहे. त्यामुळे आता येथील अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्राकडून अधिक सहकार्य मिळेल.
नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात आमदार मंगल प्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर सावंत यांच्या घरी भेटून त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दक्षिण मुंबईच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. लोढा यांनी विश्वास व्यक्त केला की, मंत्री झाल्यानंतर केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत सावंत यांचा महत्त्वाचा वाटा असेल व समस्या निराकरणाचे काम लवकर सुरू होईल व तितक्याच लवकर पूर्ण होईल. खासदार अरविंद सावंत मंत्री झाल्याने विकासासाठी अडथळा ठरणारे अनेक प्रस्ताव मार्गी लागतील.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मलबार हिल भागातील सावंत यांना सुमारे ६० हजारांनी मताधिक्य मिळाले आहे. त्यांच्या विजयासाठी मलबार हिल येथील मतदानाचा टक्का महत्त्वपूर्ण ठऱला आहे. आमदार लोढा म्हणाले, की सावंत एक लढाऊ नेता आहेत व ते जनतेच्या समस्या समजून घेतात. त्यामुळे लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.”
“केएचएल न्यूज ब्युरो