Details
अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत 1960च्या सुमारास बांधलेला आणि रेल्वे ट्रॅकवरून जाणारा अंधेरी पश्चिम व पूर्वेला जोडणारा व थेट पश्चिम द्रूतगती महामार्गापर्यंत जाणारा दुवा म्हणजे अंधेरीचा गोखले पूल. रोज या पुलावरून सुमारे 2.50 ते 3 लाख वाहने ये-जा करतात. गेल्या वर्षी 2 जुलैला सकाळी 8च्या सुमारास पावसात या पुलाचा दक्षिणेकडचा पदपथाचा काही भाग पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवरच कोसळल्याने मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत बंदच होती. तसेच गोखले पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने आणि पुलाचा काही भाग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. परिणामी हा पूल अरूंद झाल्याने गेले वर्षभर अंधेरीकरांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. हा पूल कोसळल्यानंतर या पुलाची जबाबदारी महापालिकेची का रेल्वेची यावरून या दोघांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला होता.
अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण झाल्याने गेल्या रविवार दि. 16च्या सकाळपासून हा पूल अखेरीस वाहतूकीस खुला करण्यात आला. या पुलाच्या कामास सुमारे 3.34 कोटी रूपये खर्च आला आहे. आयआयटी पवईने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले असून या पुलाचा दक्षिणेकडच्या पदपथाचा काही भाग कोसळल्याने येथील पुलाच्या दुरूस्तीचे काम गेल्या जुलैपासून सुरू करण्यात आले होते. पालिका व रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयातून या पुलाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले. अखेर हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने येथील काही प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली असा विश्वास पालिकेच्या के पश्चिम विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला.
याप्रकरणी अंधेरी पश्चिम येथील भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले की, सदर घटना घडल्यापासून ते या पुलाची यशस्वी व मजबूत दुरूस्ती होण्यासाठी पालिका, रेल्वे यांच्याशी पाठपुरावा करत होते. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. पावसाळा तोंडावर आला असताना अखेरीस हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.”
“केएचएल न्यूज ब्युरो