Details
वाहतुकदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – हाजी अरफात शेख
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या माध्यमातून ऑटोरिक्षा टॅक्सी चालक-मालक यांच्या समस्या मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून आम्ही सोडवू, अशी ग्वाही ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक-मालक यांना अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी दिली.
कुर्ला येथे भर पावसात त्यांनी रिक्षाद्वारे प्रवास करत वाहनचालकांशी संवाद साधला. “सदस्य गठन, मजबूत संगठन” या घोषणेखाली भाजपाप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानांतर्गत ऑटोरिक्षा-टॅक्सी चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख व प्रख्यात चित्रपट अभिनेत्री तथा महिला कार्याध्यक्षा ईशा कोपीकर रस्त्यावर उतरल्या. प्रसंगी देशभरात सुरू असलेले भाजपा सदस्यता नोंदणी अभियान-२०१९ मोबाईलवरून 8980808080 ह्या नंबरवर मिस्ड कॉल देऊन राबवण्यात आले. हा कार्यक्रम फौझिया हॉस्पिटलसमोर, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई येथे पार पडला.
या कार्यक्रमाला नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरीफ देशमुख, राष्ट्रीय सरचिटणीस विनय मोरे, महिला सरचिटणीस मदिना शेख यांच्यासमवेत शेकडो ऑटोरिक्षा चालक तसेच महिला उपस्थित होत्या.
”
“केएचएल न्यूज ब्युरो