HomeArchiveकृषी अभ्यासक्रमात फेरपरीक्षा...

कृषी अभ्यासक्रमात फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी द्या – निरंजन डावखरे

Details
कृषी अभ्यासक्रमात फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी द्या – निरंजन डावखरे

    04-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
जुलैमध्ये झालेल्या बारावीच्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.
 
 
राज्य सरकारच्या उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला. त्यावर डवले यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.
 
 
राज्यात बारावीच्या जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) २३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेश प्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे. राज्यात अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ ऑगस्ट २०१९च्या परिपत्रकान्वये शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा. यासंदर्भात पुणे येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च संस्थेला आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी विभागात करीयर करण्याची इच्छा असलेल्या फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असेही ते म्हणाले.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
“जुलैमध्ये झालेल्या बारावीच्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.”
 
 
“राज्य सरकारच्या उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला. त्यावर डवले यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.”
 
 
“राज्यात बारावीच्या जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) २३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेश प्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे. राज्यात अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ ऑगस्ट २०१९च्या परिपत्रकान्वये शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा. यासंदर्भात पुणे येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च संस्थेला आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी विभागात करीयर करण्याची इच्छा असलेल्या फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असेही ते म्हणाले.”

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content