HomeArchiveकृषि व्यावसायिक अभ्यासक्रमात...

कृषि व्यावसायिक अभ्यासक्रमात फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी!

Details
कृषि व्यावसायिक अभ्यासक्रमात फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी!

    26-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
राज्यात बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी पाठपुरावा केला होता.
 
 
राज्यात बारावीच्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) २३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेशप्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. या प्रश्नासंदर्भात आमदार डावखरे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर कृषी व पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना निवेदन दिले होते. तसेच फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी केली होती. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आग्रह डावखरे यांनी धरला. यासंदर्भात प्रधान सचिव डवले यांच्याबरोबरच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, शिक्षण संचालक कौसडीकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.
 
 
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने काल राज्यातील चार कृषी विद्यापीठात प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथील कृषी महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची यादी आज, गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ३ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशअर्ज दाखल करता येतील. ४ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या प्रवेशअर्जांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ९ ऑक्टोबरपासून प्रवेश फेरीला सुरूवात होईल. संस्थास्तरीय कोट्यातील रिक्त जागा संबंधित महाविद्यालयस्तरावर भरण्यासाठी ११ ऑक्टोबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
राज्यात बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी पाठपुरावा केला होता.
 
 
“राज्यात बारावीच्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) २३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेशप्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. या प्रश्नासंदर्भात आमदार डावखरे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर कृषी व पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना निवेदन दिले होते. तसेच फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी केली होती. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आग्रह डावखरे यांनी धरला. यासंदर्भात प्रधान सचिव डवले यांच्याबरोबरच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, शिक्षण संचालक कौसडीकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.”
 
 
“महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने काल राज्यातील चार कृषी विद्यापीठात प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथील कृषी महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची यादी आज, गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ३ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशअर्ज दाखल करता येतील. ४ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या प्रवेशअर्जांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ९ ऑक्टोबरपासून प्रवेश फेरीला सुरूवात होईल. संस्थास्तरीय कोट्यातील रिक्त जागा संबंधित महाविद्यालयस्तरावर भरण्यासाठी ११ ऑक्टोबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.”

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदकृषी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशभाजपआमदार निरंजन वसंत डावखरेकृषी व पशुसंवर्धन विभागफेरपरीक्षा

Continue reading

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...
Skip to content