Details
यारी रोड झाला चकाचक!
28-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईत ‘डेब्रिस ऑन कॉल’ अशी योजना पालिका प्रशासनाने मागे जाहीर केली होती. मात्र, सदर योजना कागदावरच राहिली आहे. घरात आणि सोसायटीतील बांधकामाचे डेब्रिस नागरिक, बांधकाम कंत्राटदार गुपचूप आणून टाकतात. वर्षनुवर्षं डेब्रिस उचलला नसल्याने दोन-तीन मजले मोठे डोंगर उभे राहतात. पालिकादेखील डेब्रिस उचण्याचे सौजन्य दाखवत नाही आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे.
वर्सोवा यारी रोड येथील इनलॅक्स नगरजवळील युनियन बँक समोरील रस्त्यासमोर डेब्रिसचे सुमारे दोन मजली इतके उंच डोंगर झाले होते. त्यामुळे येथे अस्वछता, दुर्गंधी पसरली होती. येथील २४० फुटांच्या रस्त्याची दैनावस्था झाली होती. सध्या रस्त्याच्या आड येणारे बांधकाम असल्याने सदर रस्ता यारी रोडला जोडण्याच्या कामात अडथळे येत असून ते लवकर दूर करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्याकडे होत होती.
आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी सदर डेब्रिस काढा व रस्ता लवकर मार्गी लावा, अशी विनंती आम्ही त्यांना केली. त्यांनी अलिकडेच स्वच्छ वर्सोवा अभियान राबवून व स्वतः हातात झाडू घेऊन येथील रस्त्यावरील तसेच सिल्व्हर ब्रिझ सोसायटीसमोरील सुमारे १०० ट्रक डेब्रिस त्यांनी जातीने यंत्रणा लावून उचलले आणि यारी रोड परिसर स्वच्छ केल्याबद्दल जनता समाधान व्यक्त करत आहे.
”
केएचएल न्यूज ब्युरो
“मुंबईत ‘डेब्रिस ऑन कॉल’ अशी योजना पालिका प्रशासनाने मागे जाहीर केली होती. मात्र, सदर योजना कागदावरच राहिली आहे. घरात आणि सोसायटीतील बांधकामाचे डेब्रिस नागरिक, बांधकाम कंत्राटदार गुपचूप आणून टाकतात. वर्षनुवर्षं डेब्रिस उचलला नसल्याने दोन-तीन मजले मोठे डोंगर उभे राहतात. पालिकादेखील डेब्रिस उचण्याचे सौजन्य दाखवत नाही आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे.”
“वर्सोवा यारी रोड येथील इनलॅक्स नगरजवळील युनियन बँक समोरील रस्त्यासमोर डेब्रिसचे सुमारे दोन मजली इतके उंच डोंगर झाले होते. त्यामुळे येथे अस्वछता, दुर्गंधी पसरली होती. येथील २४० फुटांच्या रस्त्याची दैनावस्था झाली होती. सध्या रस्त्याच्या आड येणारे बांधकाम असल्याने सदर रस्ता यारी रोडला जोडण्याच्या कामात अडथळे येत असून ते लवकर दूर करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्याकडे होत होती.”
“आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी सदर डेब्रिस काढा व रस्ता लवकर मार्गी लावा, अशी विनंती आम्ही त्यांना केली. त्यांनी अलिकडेच स्वच्छ वर्सोवा अभियान राबवून व स्वतः हातात झाडू घेऊन येथील रस्त्यावरील तसेच सिल्व्हर ब्रिझ सोसायटीसमोरील सुमारे १०० ट्रक डेब्रिस त्यांनी जातीने यंत्रणा लावून उचलले आणि यारी रोड परिसर स्वच्छ केल्याबद्दल जनता समाधान व्यक्त करत आहे.”
डेब्रिस ऑन कॉलवर्सोवा यारी रोडडॉ. भारती लव्हेकर