Details
मातोश्रीच्या अंगणात आमदार सावंत यांची बंडखोरी!
09-Oct-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री, या निवासस्थानाच्या अंगणात म्हणजे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे न घेता बंडखोरी केली आहे.
तृप्ती सावंत या शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांच्या पत्नी आहेत. २०१५ मध्ये बाळा सावंत यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. सहानुभूतीच्या लाटेत तृप्ती सावंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केला होता. या पोटनिवडणुकीमध्ये तृप्ती सावंत यांना ५२ हजार ७११ मते मिळाली व १९ हजार ८ मताधिक्याने त्यांना विजय मिळाला होता. काँग्रेसच्या नारायण राणे यांना ३३ हजार ७०३ मते मिळाली होती तर एमआयएमच्या राजा रहबर खान यांना १५ हजार ५० मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार रिंगणात नव्हता.”
केएचएल न्यूज ब्युरो
“मुंबईतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री, या निवासस्थानाच्या अंगणात म्हणजे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे न घेता बंडखोरी केली आहे.”
तृप्ती सावंत या शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांच्या पत्नी आहेत. २०१५ मध्ये बाळा सावंत यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. सहानुभूतीच्या लाटेत तृप्ती सावंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केला होता. या पोटनिवडणुकीमध्ये तृप्ती सावंत यांना ५२ हजार ७११ मते मिळाली व १९ हजार ८ मताधिक्याने त्यांना विजय मिळाला होता. काँग्रेसच्या नारायण राणे यांना ३३ हजार ७०३ मते मिळाली होती तर एमआयएमच्या राजा रहबर खान यांना १५ हजार ५० मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार रिंगणात नव्हता.
मुंबईशिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरेमातोश्रीशिवसेनातृप्ती सावंतबाळा सावंतपोटनिवडणूकनारायण राणे