HomeArchiveविठुला लागली थंडी...

विठुला लागली थंडी…

Details
विठुला लागली थंडी…

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

[email protected]

संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत विठोबा. त्याला थंडी लागतेय हे वाचून मोरूने विचार केला-  विठोबा तर दगडाची मूर्ती. त्याला कसली थंडी? मी तर जिता जिवंत माणूस. मला थंडी लागणारच. पण एकदा झोप लागली की थंडीचा परिणाम जाणवत नाही आणि त्या थंडीचा प्रताप सकाळी उठताना चांगलाच जाणवतो. म्हणून मोरूने रात्री झोपताना कानात वारा जाऊ नये म्हणून बापाची जुनी शाल डोक्यावरून कानाला घट्ट गुंडाळली. पायाला भेगा पडू नये म्हणून बुटाचे जुने सॉक्स पायात घातले. घरात शिल्लक राहिलेल्या दुधाची साय तोंडभर चापूनचोपून लावली. कारण विठोबालाही साग्रसंगीत चेहर्‍यावर लेपन केले होते आणि नंतर त्याने अंगावर जाड गोधडी घेऊन तो झोपी गेला.

सकाळी मोरूचा बाप डोळे पुसत उठला. थंडी म्हणून त्याला अंथरूणातून उठावेसे वाटत नव्हते. पण कसाबसा आळस झटकत तो उठला. आळोखे-पिळोखे देत असताना त्याचे लक्ष मोरूच्या तोंडाकडे गेले आणि कानाच्या भोवती शाल पाहताच मोरूच्या कमरेत त्याने लाथ घातली… लाथ जोराने लागल्याने मोरू अक्षरशः कळवळून उठला… आये, आये करत कळवळत बापाला म्हणाला ‘अरे, तू माझा जन्मदाता आहेस की हैवान? लाथ मारून उठवतोस… काही मॅनर्स हाय की नाय? बापाच्या चूक लक्षात येताच तो पाच काळी स्वरातील आवाज दोन काळीमध्ये आणत म्हणाला, ‘हा काय मी तुझा अवतार पाहतोय. कानाला शाल गुंडाळलीस. पायात सॉक्स, काय भानगड आहे…?’  ‘अहो, आपला विठ्ठल, पंढरपूरचा हो,’… मोरू स्वतःची कंबर दाबत दाबत बोलत होता… तर मी काय सांगत होतो माझ्या बापा, त्या विठ्ठलाला पंढरपुरात थंडी भरली म्हणून त्याच्या पुजार्‍यांनी त्याच्या दोन्ही कानात वारा जाऊ नये म्हणून कानावर कानपट्टी बांधून अंगावर शाल व रजई घातली कारण पंढरपुरात थंडी आहे. तिथे तापमानाचा पारा १८ अंशावर आहे… रिस्क नको म्हणून मी कानाला तुमची शाल, पायात सॉक्स आणि अंगावर ही जुनी गोधडी घेतली…’ मोरूने अशाप्रकारे बापाला समजावून सांगितले.

‘अरे व्वा छान, पण तोंडाला हे सफेद सफेद काय आहे, क्रीम तर आपल्या घरात नाही… मग हे क्रीम कोठून आणले? बापाने अडचणींचा प्रश्न विचारला. ‘आपल्या घरात अठराविश्व दारिद्र्य, हे ठाऊक असून तरी तुम्ही स्वतःची लाज काढता?’ मोरूने बापाला ठणकावून सांगितले. हे बघा ही काय क्रीम नाही, ही आहे दुधावरची साय! असे मोरूने सांगताच बापाने त्याच्या कानाखाली ‘नकाशा’ काढला… ‘अरे गधड्या, ती साय दह्यासाठी मी साठवून ठेवतो, तुला माहीत नाही का? बापाने पुन्हा हात उचलत सांगत असताना मोरूने बापाचा हात धरला आणि म्हणाला ‘दुधावरची साय म्हणजे आईची माय, अरे माझ्या बापा मला आई नाही म्हणून तुझ्याकडे मी माझी माय म्हणून बघतो, या सायेतही मला माझी माय दिसते… मोरू डोळे चोळत चोळत बोलत होता. मोरूच्या बापाने मोरूला हृदयाशी घट्ट धरले आणि चूक मान्य करत म्हणाला ‘अरे पांडुरंग आपला देव आहे, तो सर्वांचा कल्याणकारी देव आहे… त्याची आपण काळजी करायची नाय तर कोणी?

‘हे बघा मला पटतं, पण कल्याणकारी विठ्ठलाला आषाढी एकादशीला लाखो वारकरी जातात.  त्यांच्या जीवनात काही फरक पडला आहे का? शेतीत राबून त्यांच्या आयुष्याची माती झाली…, मोरू एका झटक्यात बोलून मोकळा झाला. ‘मोरू विठूला असे बोलू नकोस. आज आपण जे आहोत ते त्याच्या कृपेमुळेच’… अरे राजा असे तोंडात येईल ते बडबडू नकोस. मोरूचा बाप असं बोलताच मोरू अंथरूणातून बाहेर आला… ‘विठ्ठलाला थंडी भरली नाही, तर पुजार्‍यांना कामधंदा मिळावा म्हणून ही थेरं चालवली आहेत या पुजार्‍यांनी. थंडी आहे ना, मग जसं उन्हाळ्यात गरम होतं म्हणून एसी लावून थंड वातावरण निर्माण करता येते ना तसे विठ्ठलाचा गाभारा गरम करता येईल. त्यासाठी विठ्ठलाला शाल, गरम कपडे घालण्याची गरज नाही. मोरूने बापाला सुनावले. मोरूचा बाप मोरूचे प्रवचन ऐकत बसला…

मोरूच्या बापाने मोरूच्या कानावरची शाल काढली, सॉक्स काढले. तोंडावरील साय काढत मायेने तो मोरूला खाली घेऊन गेला. रस्त्यावर कामगारांनी शेकोटी पेटवली होती, तिथे त्या कामगारांबरोबर शेकोटी घेत असताना काही अंतरावर काही कामगार विठ्ठलनामाचा गजर करीत होते. मोरूने हळूच बापाला विचारले, ‘त्या कामगारांना थंडी लागत नाही का? मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘विठ्ठलनामाने ते स्वतःला विसरलेत, हीच किमया आहे विठ्ठलनामाची! …समजलं आता.

विठ्ठलनामाने परिसर व्यापून गेला… मोरूही त्यांच्यात सामील झाला… विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल….”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content