Details
वाचावं असं काही … दिवाळी अंक २ – अक्षरलिपी
01-Jul-2019
”
महेश पवार
[email protected]
घटनास्थळी प्रत्यक्ष हजर राहून त्याचे वृत्तांकन करणे. वस्तुनिष्ठ बातमी वाचकांपर्यंत पोहोचविणे हे पत्रकाराचं काम आहे. त्याचप्रकारे देशाच्या विविध भागांमध्ये जाऊन तिथंल वातावरण जसं आहे तसं रिपोर्ताजच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहविण्याची मेहनत अक्षरलिपीच्या लेखकांनी घेतली आहे. अक्षरलिपी दिवाळी अंकाचं हे वैशिष्ट्य मानावं लागेल. महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले आणि प्रतिक पुरी यांनी संपादित केलेला अक्षरलिपी हा यंदाचा दुसरा दिवाळी अंक. रिपोर्ताज सोबतच सामाजिक भान जपण्याची कामही या दिवाळी अंकाने केले आहे.
अक्षरलिपी दिवाळी अंकाची सुरूवातच होते ती मनोहर सोनवणे यांनी लिहिलेल्या जालियनवाला बाग १०० वर्षानंतर या लेखाने. जालियनवाला बाग म्हटल्यावर आठवते ते जनरल डायर आणि त्याने केलेले मानवी हत्याकांड. १३ एप्रिल१९१९ रोजी हे हत्याकांड झाले. या हत्याकांडला २०१८ मध्ये १०० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त मनोहर सोनवणे यांनी अमृतसर, जालियनवाला बागला प्रत्यक्ष भेट देऊन त्यावर लिहिलेला लेखहा मन व्यथित करणारा आहे. एके ठिकाणी लेखक म्हणतात की, भिंतीवरच्या बुलेट माक्र्सच्या बॅकग्राऊंडवर सेल्फी काढून पराक्रम साजरा करणारे चेहरे दिसले. मोबाईलवर फोटो काढणे हा आता जणू राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे. तो इथेही स्वच्छंदपणे चालू होता. जालियनवाला बागेसारख्या विसंगत स्थळी हे असं सेलिब्रेशन विसंगत वाटतं. लेखकाचे हे मनोगत माणसाची मानसिकता किती बदलली आहे हे सांगून जाते. आम्ही शहीदांच्या स्मृतीत तिरंगा फडकवला. राष्ट्रगीत म्हटलं. रूपदद्दांनी तिरंग्याची घडी करून माझ्या हातात ठेवली. जालियनवाला बागेतून बाहेर पडताना ते माझ्यासोबत होते. उधमसिंह यांच्या पुतळ्याजवळ निरोप देताना ते म्हणाले, ‘‘यह तिरंगा तुम्हे हमेशा देश में अमन और सद्भावना बनायें रखने के लिये काम करनेकी याद देगा! अगले साल जालियनवाला कांड की शताब्दी के अवसर पर इसे जरूर फहराना‘‘ हा लेखाचा शेवट नकळतपणे डोळ्यांच्या कडा पाणवतो.
त्यानंतर मन आतुरते ते नक्षलवादी आणि आदिवासी दुर्गम भाग असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील आदिवासी गावांच्या व्यथा वाचण्यासाठी. साधन शुचितांपासून वंचित असलेल्या या आदिवासी गावांमध्ये फेरफटका मारताना, आदिवासींच्या व्यथा जाणून घेताना लेखक दत्ता कानवटे आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण भामरागड आणून उभे करतात. बांबूपासून बनविलेले पूल, पाणी साठविण्यासाठी आदिवासी वापरत असलेले भोपळे, अनेक प्रकारच्या रानभाज्या, खाण्यासाठी सुकत घातलेल्या मुंग्या, चहाऐवजी माडाच्या झाडावरून काढलेला गोरगा, अवघ्या २५ रूपयांमध्ये निवडून येणारी प्रेमिला कुडया मी अशा विविध प्रसंगांनी हा लेख सजला आहे. तर, नक्षलवाद्यांची सततची टांगती तलवार असली तरी जगण्याला, फिरण्याला, पाहण्याला आणि समजून घेण्याला कितीसमृध्द परिसर आहे हा! इथली माणसं कायम मुक्त, स्वतंत्र जगत आली आहेत. त्यांना त्यांच्या पध्दतीनं जगू देणं हेच त्यांच्या समृध्द असण्याचं गमक आहे. त्यांच्या आदिम जगण्याला तथाकथित शहरी आणि सुसंस्कृत चौकटीत बसवण्याचा कोणताही प्रयत्न करणं योग्य ठरणार नाही असे जेव्हा लेखक म्हणतो तेव्हा सुंसस्कृत म्हणवून घेणाऱ्या आणि शहरीकरणाला चटावलेल्या आपल्यासारख्यांची मान शरमेनं खाली जाते.
मुक्ता चैतन्य यांनी लिहिलेला भारत-पाकबॉर्डरवर असलेल्या पंजाबच्या तीन जिल्ह्यांत फिरून, तेथील लोकांशी संवाद साधून बॉर्डरलगतचं जगणं हा लेखही तेथल्या मानवी जीवनाचं दर्शन घडवतो. आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हटल्या की सर्वसाधरणपणे आपण जवानांबद्दल वाचतो,त्यांच्या अवघड कामाबद्दल, बलिदानाबद्दल ऐकत असतो. पण, सीमेलगत असलेल्या गावांबद्दल, तिथे राहत असलेल्या सर्वसामान्य लोकांबद्दल, त्यांच्या रोजच्या जगण्याबद्दल, त्यांची सुख-दुखं, अडचणी संघर्ष याबद्दल क्वचित काही माहित नसतं. मुक्ता चैतन्य यांनी याबद्दल समर्पक असे लेखन आपल्या लेखातून केलेआहे. त्याशिवाय येथे होणाऱ्या ड्रग्जच्या समस्येवरही त्यांनी भाष्य केले आहे.स्वतः त्या भागात जाऊन तेथून माहिती घेऊन हा लेख लिहिला असल्याने तो अधिक वाचनीय झाला आहे.
जम्मू-काश्मिर येथील पत्रकारितेवर अभिषेक भोसलेंचा बुलेट्स आणि स्टोनमधला माध्यम स्फोट हा लेख, शर्मिष्ठा भोसले यांचा जमाव, चार हत्या आणि दोन गोरक्षक हा लेख ऱ्हसा घडून गेल्यावर मागे उरलेले सगळे ऱ्हसेचे पडसाद नेमके कसे ऐकतात कुठल्या अवस्थांमधून जातात यावर आधारित आहे. सध्या सर्वांच्या हाती झिकझॅक मोबाईल कॅमेरे आले आहेत. याच मोबाईल कॅमेऱ्यांच्या वापरातून उत्कृष्ट छायाचित्रण कसे करता येते यावर आधारित इंद्रजित खांबे यांचा फॅमिली ड्रामा हा लेखही सुंदर आणि वाचनीय आहे. हिना कौसर खान-रपजर यांनी लिहीलेला ‘‘जटा मोकळ्या होतात तेव्हा‘‘ हा लेख तर समस्त महिलावर्गाने वाचण्यासारखा आहे. जटांचा संबध दैवाशी जोडला आहे. मात्र, जटाधारी महिलांची सोडवणूक करून त्यांना मोकळ्या केसांपर्यंत आणून समाज जागृती करणाऱ्या नंदिनी जाधव यांची मुलाखत छान रंगली आहे. प्रभा कुडके यांचा स्टंटबाजीवर आधारित ढिशुम् – ढिशुमची दुनिया, स्वर्गीय कविता महाजनयांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आलेला काव्यविभाग, आणि अन्य लेखांमुळे अक्षरलिपीचा हा दुसरा अंक वाचनीय झाला आहे.
अक्षरलिपी
संपादक : महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले, प्रतिक पुरी
मुखपृष्ठ : इंद्रजित खांबे
किंमत : १६० रूपये”
“महेश पवार