Details
“पु.लं., गदिमा आणि बाबुजींची जन्मशताब्दी”
01-Jul-2019
”
केएचएल ब्युरो
संगीत, अभिनय आणि लेखन या विषयावर १०० कार्यशाळांचे राज्यात आयोजन
आपल्या शब्दांनी मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारे ग. दि. माडगूळकर तथा गदिमा, त्यांच्यासह अनेक गीतकारांच्या शब्दांना संगीताचे कोंदण देऊन ती गीते अजरामर करणारे सुधीर फडके ऊर्फ बाबूजी आणि महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला खळखळून हसायला लावणारे पु. ल. देशपांडे तथा पुल, अशा या दिग्गजांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. हा योग साधून तिन्ही कलाक्षेत्रांशी आजची तरूणाई जोडली जावी यासाठी राज्यशासनाने पुढाकार घेऊन लेखन, संगीत तसेच अभिनय या विषयांवर राज्यभर १०० कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. तिन्ही क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून घेतल्या जाणाऱ्या या कार्यशाळांत गदिमा, बाबुजी आणि पुल यांच्या कार्याचा आढावा घेत लेखन, संगीत अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मंगळवारपासून लातूर येथून या कार्यशाळांना सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात ५० कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे.
या कार्यशाळा राज्याच्या प्रत्येक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये आहेत. या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात स्टँड अप कॉमेडी स्पर्धा, पुल, गदिमा व बाबुजींच्या जीवनावर आधारीत प्रदर्शन विविध ठिकाणी फिरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. सर्व कलाप्रेमींसाठी या कार्यशाळा खुल्या असतील.
गदिमा, बाबूजी आणि पुल यांच्या असामान्य कार्याची ओळख आजच्या पिढीला व्हायला हवी. शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक होतकरु लेखक, संगीतकार आणि कवी आहेत. अशा तरूणांना राज्य शासनातर्फे व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न आहे. सर्व कलाप्रेमींनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालिक स्वाती काळे यांनी केले आहे.”
“केएचएल ब्युरो