Details
पं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार
01-Jul-2019
”
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे रविवार दिनांक 6 जानेवारी 2019 या दिवशी सायंकाळी सहा वाजता 2018 सालचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. गेल्या वर्षापासून गानसरस्वती कै. किशोरी आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किशोरीताईंचे आद्यशिष्य डॉ. अरूण द्रवीड यांनी हा पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे. भारतीय शास्त्रीय कंठसंगीतात प्रतिथयश असलेल्या 50 वर्षांखालील कलाकारास हा पुरस्कार दिला जातो. 1 लाख रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या वर्षीचा हा पुरस्कार मेवाती घराण्याचे प्रख्यात तरूण गायक पंडित संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. पंडित संजीव अभ्यंकर यांच्या सुश्राव्य गायनाचा आनंदही यावेळी रसिकांना लाभणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 24304150, 7700994495.”
“दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे रविवार दिनांक 6 जानेवारी 2019 या दिवशी सायंकाळी सहा वाजता 2018 सालचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. गेल्या वर्षापासून गानसरस्वती कै. किशोरी आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किशोरीताईंचे आद्यशिष्य डॉ. अरूण द्रवीड यांनी हा पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे. भारतीय शास्त्रीय कंठसंगीतात प्रतिथयश असलेल्या 50 वर्षांखालील कलाकारास हा पुरस्कार दिला जातो. 1 लाख रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.