HomeArchiveनववर्षाची सूर्यकिरणे...

नववर्षाची सूर्यकिरणे…

Details
नववर्षाची सूर्यकिरणे…

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]

सकाळची कोण थंडी! पत्रकार तात्या डोळे चोळीतचोळीत कसाबसा अंथरूणातून बाहेर आला. तोंडावर पाणी मारून तोंड स्वच्छ धुतले आणि नेहमीप्रमाणे पेपर हातात घेऊन नवीन वर्षात कोणती बातमी आली हे पाहू लागला. त्याला प्रथम राज्यपालांच्या शुभेच्छा दिसल्या. जरा बरं वाटलं आणि दुसऱ्या बातमीकडे तो वळला. ‘मोदींवर थुंकणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे…’ मुख्यमंत्र्यांची ही स्टेटमेंट वाचून ‘आयला, नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच एकमेकांवर थुंकण्याचा सराव झालेला दिसतोय आणि तीही फडणवीसांनी सुरवात करावी?

असा विचार करताकरता तात्याने प्रत्येक राजकीय नेत्यांना आज भेटण्याचं निश्चित केले. नवीन वर्षाची सुरूवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासूनच करावी आणि तात्या वर्षावर पोहचले.

तात्या: नमस्ते मुख्यमंत्रीसाहेब. नवीन वर्ष आपणास सुखाचे आणि… (एवढ्यात तात्याला खोकला येतो, समोरच ठेवलेल्या ग्लासमधील पाणी पीत पुढे बोलणार…)
मामु: राहू द्या… तुमच्या शुभेच्छा मिळाल्या, कामाचं बोला..
तात्या: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही मातोश्रीवर तुटून पडलात?
मामु: तुटून पडलो म्हणजे मातोश्रीला तडे गेलेत का?
अहो, सूर्यावर थुंकणं साधी गोष्ट नाही राव! मोदीसाहेब म्हणजेच सूर्य आहेत. त्यांच्यावर टीका करणे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे… (खिडकीचा पडदा हलल्याने मामुंच्या टेबलावर सूर्यकिरण पडतात. ते उठतात नि पडदा बाजूला करून सूर्याला नमस्कार करतात…)
तात्या: मी तुमच्या मताशी सहमत आहे साहेब. मातोश्रीने चोर म्हणायला नको होते.. त्यांचीही नितीन भौसारखी जीभ घसरली, असं वाटत नाही का? (तात्यांनी काडी घातली)
मामु: ते राहुल गांधी, कसला त्यांना अनुभव नाही आणि साहेबांना चोर म्हणतो म्हणजे काय?
तात्या: मी राहुल गांधींबद्दल बोलत नाही तर मातोश्रीबद्दल बोलतोय..
मामु: तात्या, तुम्ही पत्रकार आहात. तुम्ही कशाला आणखी तेल ओतता.. आमचं राजकारण आम्हाला करू द्या की.. (तात्याला मामुंना काय सुचवायचं होतं हे कळलं आणि त्यांनी मामुंचा निरोप घेतला. ते मातोश्रीवर गेले..)
ऊठा: (उद्धवजींच्या चेहऱ्यावर खिडकीतून सूर्यकिरण आल्याने ते वैतागून खिडकीचे पडदे नीट लावायला सांगतात..) कशाला हा सूर्य तडमडतोय कळत नाही? आणि तेही नको त्या वेळी..
तात्या: उद्धवजी, आज पहिला दिवस आहे नववर्षाचा. सूर्यकिरण अंगावर घ्या की.. थोडी ऊब मिळेल या थंडीत!
उठा: अंगावर घ्यायला काहीच हरकत नाही. पण तो डोळ्यावर आल्याने काळोखी येते हो..
तात्या: येणारच! सूर्य म्हणजे मोदीसाहेब.. त्यांचा तसा दरारा आहेच ना!
उठा: तुम्ही काय वर्षावरून आलात का?
तात्या: हो..
उठा: तेव्हाच तुम्हाला मोदी आठवले.. काय म्हणाले मुख्यमंत्रीसाहेब?
तात्या: तुम्ही मोदींसाहेबांना चोर बोललात म्हणून ते फारच संतापलेत..
उठा: अस्स.. राहुल गांधी उठल्या-बसल्या मोदींना चौकीदार चोर म्हणतो तेव्हा मुख्यमंत्री..
तात्या: उद्धवजी तुम्ही त्यांचे मित्रपक्ष आहात..
उठा: तुम्ही त्यांची वकिली करता का? मग सांगा नगरला मैत्री त्यांना का आठवली नाही?
(तेवढ्यात रामदास आठवले उद्धवजींना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतात..)
राआ: उद्धवजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

तात्या: (मध्येच उठून..) आठवलेसाहेब आपणास नववर्षाच्या शुभेच्छा..
राआ: आपल्यालादेखील.. तात्या, आज काय विशेष?
तात्या: आज पेपरमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी मोदींना सूर्य म्हटले म्हणून..
राआ: साफ चूक.. सूर्य एकच आहे ते म्हणजे आमचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तात्या आम्ही त्या सूर्याची पिल्ले आहोत (उद्धवजी तोंडावर हात ठेवून हसतात आणि आठवले त्यांना डोळा मारून दाद देतात..)
उठा: तात्या, हे आता मुख्यमंत्र्याना जाऊन सांगा..
राआ: कशाला आमच्यात लावालावी लावता.. आमचं बरं चाललंय बघवत नाही का तुम्हाला? (दोघांची आता जुंपणार हे लक्षात घेऊन तात्यांनी तेथून काढता पाय घेतला आणि ते गेले राज साहेबांकडे..)
राठा: (तात्यांचे स्वागत करत) वेळेवर आलात तात्या!
ही घ्या अमितची पत्रिका..
तात्या: अमित शाहंची पत्रिका?
राठा: अमित शाह कुठून आणलात? ही लग्नपत्रिका घ्या माझ्या मुलाची, अमित राज ठाकरेंची! (दोघंही हसतात) काय काम काढलं? लवकर बोला..
तात्या: मातोश्रीवर गेलो होतो.. (असं ऐकताच राज उठून उभे राहिले.. हात जोडत..)
राठा: मला पत्रिका वाटायला जायचे आहे.. मला बोलायला वेळ नाही..
तात्या: (खवचटपणे..) कुठे मातोश्रीवर? (आणि राजसाहेब आतल्या खोलीत निघून जातात..)”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content