Details
असे रंगले यवतमाळचे मराठी साहित्य संमेलन..
01-Jul-2019
”
सदानंद खोपकर, संपादक, साप्ताहिक मावळमराठा
[email protected]
नयनतारा सहगल यांना उद्घाटनासाठी दिलेले निमंत्रण मागे घेतल्यामुळे चर्चेत राहिलेले यवतमाळचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रविवारी समाप्त झाले. या संमेलनाचे उद्घाटन आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. मी बहिणाबाईची लेक आहे. मी साहित्य वाचले नाही, माणसे वाचली. मी विधवा नाही, एकल महिला आहे. आज बोलणारी नाही तर डोलणारी बाई लागते. तेरव नाटकाने मला बळ दिले. आज लेखक आणि कास्तकार, दोघांनाही भाव मिळत नाही, असे त्या म्हणाल्या. जय भीम, रामराम, हॅव ए गुड डेने.. त्यांच्या उद्घाटनपर भाषणाचा समारोप झाला.
त्यानंतर बडोदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचीत अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांच्याकडे सोपवली. याआधी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, शेतकऱ्यांनो, आत्महत्त्या करू नका, स्वामीनाथन शिफारसी प्राप्त करून घ्या, नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन मागे घेणे हा अनुचित प्रकार आहे. त्यामुळे मी चिंतीत आहे. ही महाराष्ट्राची रित नाही. ही सहिष्णुता नाही. मराठी शाळा बंद पडू देऊ नका. बृहन्महाराष्ट्रातील मराठी शिक्षणासाठी धोरण करा.
यानंतर ९२ व्या साहित्य संमेलनाची स्मरणिका गोंदणचे प्रकाशन झाले. राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांचे भाषण झाले. सहगल यांना निमंत्रण देऊन रद्द केले, ही भूमिका शासनाला आवडलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे हीच आमची भूमिका आहे. आजची पिढी सायबर गुलाम झाली आहे. याविरूद्ध लढा देणे आवश्यक आहे. कला राजाश्रीत नसावी. राजपुरस्कृत असली पाहिजे, से त्यांनी सांगितले.
त्यानंतर ९२ व्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांचे भाषण यांचे भाषण झाले. वाडंग्मयक्षेत्राच्या ऋणमोचन तीर्थावर मी उभी आहे. नयनतारा सहगल अखिल भारतीय पातळीवरील महत्त्वाच्या लेखिका आहेत. मराठी मातीशी नाते असणाऱ्या आहेत. अनुचित पद्धतीने त्यांचे निमंत्रण रद्द करणे ही गंभीर चूक आहे. झुंडशाहीच्या बळावर भयभीत होणे योग्य नाही. जे विपरीत भोवती घडत आहे, त्याला केवळ शासन जबाबदार नाही. कोणाची हिंसा निंद्यच आहे. झुंडीचे राजकारण त्याज्यच आहे. हे संवादाचे व्यासपीठ आहे. हा ज्ञानोपासकांचा महाराष्ट्र आहे. आपण सामान्य असलो तरी सुसंस्कृत वाचणारी माणसे आहोत. साहित्यीक, कलावंत नवी मिथके घडवत असतो. पण, मिथके ही पिंजऱ्यात लावलेली आमीषे होऊ नयेत. जाणिवांचे प्रदेश विस्तारण्याचे कार्य करतो तो साहित्यीक आहे. साहित्यीकांच्या केंद्रस्थानी माणूस असला पाहिजे. मुक्तीची लढाई ही शासन किंवा समाजाशीच नाही तर ती स्वत:तील अडथळ्यांशी असते. एकमय जगाकडे समाज-संस्कृती चालविली पाहिजे. संस्कृतीच्या अभिसारणाचे काम म्हणून अनुवादाकडे पाहवे, या शब्दांचा उच्चार करीत डॉ. ढेरे यांनी भाषणाचा समारोप केला.
संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे, यांच्या साहित्यसेवेची ओळख देणाऱ्या फलकाचे अनावरण साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा प्रभार सांभाळणाऱ्या डॉ. विद्याताई देवधर यांनी केले.
डॉ. अरूणा ढेरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, माझ्या पुण्यातील मुलींची सर्वात जुनी हुजूरपागा शाळेची आठवण येथे आल्याने झाली. आवडाबाई भिडे, पहिल्या विद्यार्थीनी होत्या. ,त्यांनी निबंधात लिहीले की, मी शिकून माझ्या आईला नव्या गोष्टी सांगेन! पुढे त्या म्हणाल्या की, मुलींनो खूप वाचा. पुस्तकांनी आम्हाला मोठे केले. पुस्तक जग फिरवून आणते. कविता, ही साधना आहे. जे हजार शब्दात सांगतात, ते कवितेत चार शब्दांत सांगणे शक्य आहे.
कृषक समाजाच्या चित्रणाबाबात नागरी लेखक उदासीन का, असा सवाल डॉ. रामप्रसाद तौर यांनी एका परिसंवादात केला. कृषक समाजाला महानागरी लेखकांकडून अपेक्षा नाही. त्यांच्या निष्ठा, जाणीवा, प्रेरणा वेगवेगळ्या असतात, असे ते म्हणाले. तेथे परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र पुनसे होते.
पत्रकार सारंग दर्शने म्हणाले की, संमेलनाने आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचा निर्णय घेतला त्याचे स्वागत आहे. शेतकरी हा आपल्या महाकादंबरीचा नायक का नाही? शेतकरी आंदोलन हा कादंबरीचा विषय का नाही? आत्महत्त्यारूपाने मोठा वंशसंहार घडतोय तरी समाजमन बधीर का, झालेय?
गजानन नारे म्हणाले की, बलुतेदारांनी गावगाडा चालायचा. ग्रामीण भागातील बरेच ले़खकही शहरात राहतात. कृषक समाजाच्या प्रश्नांचा डोळसपणे, अभ्यासू वेध घेतला पाहिजे. कृषकांच्या शोषणाला केंद्र बनविणे लेखकाचे कर्तव्य आहे.
परिसंवादाचे सूत्रसंचालक डॉ. गजाजन मुंदे म्हणाले की, महात्मा फुल्यांनी जे बीज पेरले ती परंपरा अपवाद वगळता इतरांनी जपली नाही. शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उत्पादनातून राज्ये उभी राहिली. किल्ले उभे राहिले.
प्रभाकर सलगरे म्हणाले की, कांदा फेकला, दूध ओतले तरी नागरी लेखकांच्या डोळ्यात पाणी येत नाही. वारकरी संतांनी कृषक समाजाचे वर्णन केले, तसे नागरी लेखकांनी लिहिले तर शासनाला भिडेल. सूत्र संचालक डॉ. गजानन मुंदे यांनी केले.
विष्णूपंत गारके, हे शेतकरी म्हणाले की, जीवन जगण्यासाठी जे-जे लागते ते-ते सर्व शेतकऱ्यांनी दिले. तुकारामांना जर कुणबी असल्याचा अभिमान होता तर शेतकऱ्यांना शेतकरी असल्याचा का नाही? आता स्वत: लिहीते व्हा.
केवळ नागरीच नाही तर संपूर्ण प्रस्थापीत लेखकच कृषकांबाबत कमी पडताना दिसतो. शेतकऱ्यांत सुधारणा, क्रांती घडविण्याची ताकद साहित्यात हवी. इंग्रजीत अशा नोबेल पुरस्कारप्राप्त कादंबऱ्या आहेत. इंग्रजीचा हेवा करून उपयोग नाही. वाचले पाहिजे. साहित्यीकांच्या भात्यात शब्दांचे बाण हवेत, असे परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र पुनसे म्हणाले.
वऱ्हाडी बोली कवी संमेलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुनील पखाले-कास्तकार दादा कविता म्हणताना म्हणाले-
एकाचा तू २१ झाला
स्वत: उरला झिरो
जित्यापनी केवाच मेला
मात्र देशासाठी हिरो
कवी जयंत चावरे म्हणाले-
माय सुखाची घागर
सुख तिच्या पदराले
हे पाहून वाटते
माय असावी साऱ्याले
कवी नितीन देशमुख म्हणाले-
हारपला ठेचा हारपला कैना
गावात आता लाजेना मैना
कवयित्री अलका तारूलकर म्हणाल्या-
याद येते माहेराची
मन झुरलं झुरलं
कवयित्री ऋता खापर्डे म्हणाल्या-
झक्क मारली तुया संग लगीन केलं राज्जा
आनी
आता माया जिंदगीच्या वाजला बाजा
कवी मिर्झा बेग म्हणाले-
शेतकऱ्याच्या मरनाचा ढोल नसते बडवाचा
आनी उंदराच्या कातड्याने ढोल नसते मडवाचा
काल माह्या सपनात
माय मराठी आली
दाखवली तिनं माहा
झोयी तिची खाली
प्रत्येकाने अंतरात्म्याच्या
हुंकारात डोलावे
आनी मराठी माणसानं
मराठी माणसाशी मराठीत बोलावे
कवी संमेलनाच्या अध्यक्षा मीराताई ठाकरे म्हणाल्या-
सोनं चांदी पिकते रे
किती सोसते रे घाव
माल नेते बाजारात
कसा उतरते भाव
कवी कट्ट्यावर, प्रवीण दवणे उपस्थित होते. डॉ. राणी बंग यांची मुलाखत झाली. आमच्यावर जो विश्वास आयोजकांनी दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही, असे त्या म्हणाल्या.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने संमेलनाचा समारोप झाला. विचारमंथनातून लेकशिक्षण, लोकप्रबोधन, लोकसंस्कार घडतात. मूल्याधिष्ठीत संस्कृती ही भारतीय समाजाची विशेषता आहे. चांगुलपणा, गुणवत्तेवर कोठलेही पेटन्ट रजिस्टर होत नाही. युद्धात हरल्याने माणूस समाप्त होत नाही. मात्र, युद्धातून पळाल्यास तो समाप्त होतो. ज्यांना लहान समजतो ती माणसे प्रत्यक्षात मोठी असतात. वैशालीताईंना आपण उद्घाटनाला बोलावले हे चांगले केले. फक्त राजकारणातून सर्वकाही होत नाही. माणूस आयुष्षभर विद्यार्थी असतो. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी आपले कार्य योग्य पद्धतीने करावे. त्यासाठी सर्वांमध्ये समन्वय हवा. मतभेद असू द्या, मनभेद नसावा. सामुहिक प्रयत्नांतून पुढे गेलो तरच विश्वगुरू होऊ शकतो. राजकारणी लोकांनी बाकीच्या क्षेत्रात हस्तक्षेप करू नये. पण, संबंध असू नये हे बरोबर नाही. जुनं तेच सोनं म्हणून चालणार नाही. शेतीसाठी जे योग्य ते सोनं ही भूमिका घेऊन बदलही स्वीकारावे लागतील. ह्या तीन दिवसांत ज्या प्रचंड संख्येने आपण अमृताचा अनुभव घेतला, त्या जनसंमेलनाला हात जोडून प्रणाम करतो, असे ते म्हणाले.
संमेलनाध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे म्हणाल्या की, यवतमाळला विसरणे शक्य नाही. सगळं सावट दूर करून हजारोंची गर्दी करून यवतमाळकरांनी संमेलन यशस्वी केले. रमाकांत कोलते या शिक्षकांनी घडवलेला हा चमत्कार आहे. यवतमाळने आपला ससंस्कृत चेहरा दाखवला. गडकरींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला संमेलनाध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांचा सत्कार झाला व संमेलनाचे सूप वाजले..”
“सदानंद खोपकर, संपादक, साप्ताहिक मावळमराठा