HomeArchiveरंगनाथ तिवारी व...

रंगनाथ तिवारी व रामेश्वरनाथ मिश्र यांना जीवनगौरव पुरस्कार

Details
रंगनाथ तिवारी व रामेश्वरनाथ मिश्र यांना जीवनगौरव पुरस्कार

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी चे पुरस्कार घोषित
राज्यशासनाच्या हिंदी साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारे यंदाचे जीवनगौरव पुरस्कार रंगनाथ तिवारी आणि रामेश्वरनाथ मिश्र यांना जाहीर करण्यात आले आहेत. शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीव्दारे सन २०१७-१८ या वर्षासाठीचे पुरस्कार बुधवारी घोषित करण्यात आले. अकादमीतर्फे तीन प्रकारचे पुरस्कार दिले जातात. यावर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये दोन अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, आठ राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार तसेच २० विधा पुरस्कार अशा एकूण ३० पुरस्कारांचा समावेश आहे.

यावर्षी ‘अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव’ पुरस्कारांमध्ये ‘महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार’ रंगनाथ तिवारी तसेच डॉ. ‘राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार’ रामेश्वरनाथ मिश्र ‘अनुरोध’ यांना प्रदान करण्यात येणार आहे. ‘राज्यस्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्कार’ पुरस्कारांतर्गत ‘छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ प्रेम शुक्ल, ‘साने गुरूजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ मंजू लोढा, ‘पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार’ डॉ. तेजपाल चौधरी, ‘डॉ उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार’ पूजाश्री, ‘गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार’ सुधीर ओखदे, ‘कांतीलाल जोशी इतर हिंदीभाषी हिंदी लेखक पुरस्कार’ माणिक बाबुराव मुंडे, ‘व्ही शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा पुरस्कार’ डॉ. विनोद नारायण इंदुरकर, ‘सुब्रमण्य भारती हिंदी सेतू विशिष्ट सेवा पुरस्कार’ डॉ. भगवान तिवारी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

‘विधा’ पुरस्कारांतर्गत ‘काव्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘संत नामदेव पुरस्कार’ शीतला पांडेय- समीर ‘अनजान’ यांना स्वर्ण, सुधा राठौर यांना रजत तसेच डॉ. मुकेश गौतम यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘कहानी’ या विधासाठी देण्यात येणारा ‘मुंशी प्रेमचंद पुरस्कार’ मंजुला जोशी यांना स्वर्ण, कृष्ण नागपाल यांना रजत, तसेच डॉ. शशी वर्धन शर्मा-(शैलेश) यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘निबंध’ या विधासाठी देण्यात येणारा ‘आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार’ प्रभा मेहता यांना स्वर्ण, शिव प्रसाद तिवारी यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘समीक्षा’ या विधासाठी देण्यात येणारा ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार’ डॉ. मजीद शेख यांना स्वर्ण, डॉ. पंडित बन्ने यांना रजत, तसेच डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’ यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे.

‘अनुवाद’ या विधासाठी देण्यात येणारा ‘मामा वरेरकर पुरस्कार’ कुमुद संघवी चावरे यांना स्वर्ण व रासबिहारी पाण्डेय यांना रजत पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘वैज्ञानिक तकनीकी’ या विधासाठी देण्यात येणारा ‘होमी जहांगीर भाभा कांस्य पुरस्कार’ मुकेश ग. पंडया यांना देण्यात येणार आहे. ‘हिंदी भाषा, भाषा शास्त्र तथा व्याकरण संबंधी लेखन’ या विधासाठी देण्यात येणारा ‘पं. महावीर प्रसाद व्दिवेदी कांस्य पुरस्कार’ डॉ. दिनेश प्रताप सिंह यांना देण्यात येणार आहे. ‘नाटक’ या विधासाठी देण्यात येणारा ‘विष्णुदास भावे स्वर्ण पुरस्कार’ डॉ. मधुकर राठोड यांना देण्यात येणार आहे. ‘जीवनी-परक साहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘काका कालेलकर रजत पुरस्कार’ डॉ. जितेन्द्र पाण्डेय यांना देण्यात येणार आहे. ‘पत्रकारिता-कला’ या विधासाठी देण्यात येणारा ‘बाबुराव विष्णु पराडकर कांस्य पुरस्कार’ अनूप श्रीवास्तव यांना देण्यात येणार आहे. ‘लोकसाहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘फणीश्वरनाथ रेणू स्वर्ण पुरस्कार’ निर्मला डोसी यांना देण्यात येणार आहे. ‘बालसाहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘सोहनलाल व्दिवेदी कांस्य पुरस्कार’ नीलम सक्सेना ‘चंद्रा’ यांना देण्यात येणार आहे.

सर्व पुरस्कार विजेत्यांना अकादमीकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम दिली जाते. ‘अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव’ पुरस्कारासाठी रू. १ लाख, ‘राज्यस्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्कारासाठी रू. ५१,००० आणि विधा पुरस्कारासाठी स्वर्ण, रजत, कांस्य अशा तीन प्रकारात अनुक्रमे रू ३५,०००/-, रू. २५,०००/- आणि रू. ११,०००/- रोख देण्यात येतात. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी, एक मार्च २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता रामा आणि सुंदरी वाटुमल ऑडिटोरिअम, के. सी. कॉलेज, चर्चगेट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या ‍ विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content