Details
“मातृभाषा, मराठी!”
01-Jul-2019
”
देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी
[email protected]
जगातील समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी युनेस्कोने १९९९ साली जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्यास मान्यता दिली. त्यानुसार २००० सालापासून दरवर्षी २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जात आहे. कालच हा दिवस साजरा झाला.
पूर्वपीठिका:
१९४७ साली भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे उदयास आली. तत्कालीन पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताचा बांगला देश आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताचा पाकिस्तान हे दोन वेगवेगळे भूप्रदेश होते. हे दोन्ही प्रदेश भाषा आणि संस्कृती यादृष्टीने अत्यन्त भिन्न होते.पूर्व पाकिस्तानमधील बहुसंख्य लोकांची भाषा आणि संस्कृती बंगाली असूनही पाकिस्तान सरकारने १९४८ साली उर्दू भाषेलाच राष्ट्रभाषेचा दर्जा दिला. या निर्णयामुळे पूर्व पाकिस्तानमधील जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला. सर्वसामान्य नागरिक चळवळ करू लागले. नागरिकांच्या चळवळीला समर्थन म्हणून ढाका विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या सहकार्याने सभा घेतल्या, निषेध मोर्चे काढले, आंदोलन सुरू केले. पोलिसांनी २१ फेब्रुवारी १९५२ रोजी आंदोलकांवर गोळीबार केला. यात सलाम, बरकत, रफिक, जब्बार, शफीउर हे आंदोलक जागीच ठार झाले तर शेकडो नागरिक जखमी झाले. आपल्या मातृभाषेसाठी प्राणत्याग करण्याची ही इतिहासातील अत्यन्त दुर्मिळ घटना आहे. शेवटी सततच्या आंदोलनांमुळे तत्कालीन पाकिस्तान सरकारने बांगला भाषेला शासकीय दर्जा दिला. तरीही मातृभाषेच्या आग्रहामुळे वातावरण धुमसत होते. अखेर भारताच्या सहकार्याने १९७१साली स्वतंत्र बांगला देश अस्तित्त्वात आला.
दरम्यान, कॅनडातील व्हॅकुवर येथील रफीकुल इस्लाम यांनी युनोस्कोचे तत्कालीन सरचिटणीस कोफी अन्नान यांना ९ जानेवारी १९९८ रोजी पत्र लिहून बांगला देशात २१ फेब्रुवारी १९५२ रोजी मातृभाषेसाठी शहीद झालेल्याना मानवंदना म्हणून २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची सूचना केली. या सूचनेनुसार युनेस्कोने १९९९ मध्ये रितसर ठराव केला. त्यानुसार २००० सालापासून दरवर्षी २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा होतो.
मराठी भाषा
महाराष्ट्र राज्यात जवळपास ८ कोटी नागरिक मराठी भाषा बोलतात. संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठे आंदोलन झाले. १०८जण हुतात्मा झाले. या आंदोलनाला यश येऊन १मे १९६० रोजी आताचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे तर गोवा राज्यात कोकणी बरोबर मराठीला सहराजभाषा म्हणून दर्जा आहे. भारतीय घटनेने मान्य केलेल्या २२ भाषांमध्ये मराठी एक प्रमुख भाषा आहे. देवनागरी ही मराठीची लिपी आहे. तत्पूर्वी मोडी लिपीत सर्व पत्रव्यवहार, कारभार होत असे.
समृद्ध परंपरा
महाराष्ट्रात मराठी भाषेची समृध्द परंपरा आहे. चक्रधर स्वामी यांनी ११व्या शतकात स्थापन केलेला महानुभाव पंथ मराठी भाषेचा पाईक आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ, महदाईसा ही कवयित्री प्रथम या पंथात निर्माण झाली. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अजरामर केलेली ज्ञानेश्वरी, संत तुकाराम, रामदास स्वामी, संत नामदेव, संत एकनाथ, इतर अनेक संतांचे, लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत, राजकीय नेते, संपादक, पत्रकार, विविध संस्था यांचे मराठी भाषा समृद्ध, सशक्त करण्यासाठी योगदान लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पत्रव्यवहारात तत्कालीन पध्दतीनुसार केवळ फारसी भाषेचा वापर न करता जाणीवपूर्वक मराठी भाषा वापरण्यास सुरूवात केली. त्यांचे हे धोरण पुढे सर्व राज्यकर्त्यांनी कायम ठेवले.
सावरकरांचे योगदान
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रज सरकारने राजकारणात भाग घेण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे त्यांनी आपले लक्ष सामाजिक सुधारणा, लिपी सुधारणा, पंचाग सुधारणा या बाबींकडे वळविले. या विषयांवर त्यांनी वृत्तपत्रातून अनेक लेख लिहिले, पुस्तकं लिहिली, व्याख्याने दिली. नागरी लिपी सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छापखान्यातील नागरी टंकांची संख्या त्यांनी २५० वरून ८० वर आणून दाखवली. त्यांनी अनेक इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी शब्द सुचविले. मेयरला महापौर, बजेटला अर्थसंकल्प, टेलिव्हीजनला दूरदर्शन, टेलीप्रिंटरला दूरमुद्रक इत्यादी त्यांनी सुचविलेले अनेक शब्द आज मराठीत किती रूढ झाले आहे हे आपण पाहतोच.
मराठी भाषा दिन
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. मराठी भाषेचे जतन, संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन केला आहे . या विभागातर्फे विविध प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
सार:
आज जगभर इंग्रजी भाषेचा वापर वाढला आहे. प्राप्त परिस्थिती पाहता तो वाढतच जाणार आहे. आपण व्यावहारिक कारणास्तव ती भाषा अवगत केलीच पाहिजे. परंतु, आपले भाषिक, सांस्कृतिक वैविध्य जपण्यासाठी मातृभाषा मराठीचा सार्थ अभिमान बाळगलाच पाहिजे. आज महाराष्ट्र राज्यात मराठी मातृभाषा नसलेल्या अनेक व्यक्ती मराठी भाषा उत्कृष्ट बोलतात. पण त्यांना मराठी येतच नसेल, असे गृहीत धरून आपण त्यांच्यासमवेत मराठी बोलण्याचे टाळतो. मी मराठी आहे आणि मराठीतूनच बोलणार हा आग्रह जर प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक ठिकाणी धरला तर महाराष्ट्र राज्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती मराठी भाषा बोलताना, लिहिताना, वाचताना दिसेल.”
“देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी