Details
देवेंद्र भुजबळ यांना अग्निशिखा गौरवरत्न पुरस्कार
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महिलांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या अखिल भारतीय अग्निशिखा मंचद्वारे महिला कल्याण क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल देवेंद्र भुजबळ यांना “अग्निशिखा गौरवरत्न पुरस्कार” जाहीर केला आहे. पुरस्कार प्रदान समारंभ येत्या १४ मार्च रोजी होईल, अशी घोषणा संस्थेच्या अध्यक्षा अलका पांडेय यांनी नुकतीच केली आहे.
भुजबळ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या आणि आता इतरांना जगण्याचं बळ देणाऱ्या महिला, मुलींच्या प्रेरककथा लिहून त्या विविध प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध केल्या आहेत. काही महिलांच्या आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. या सर्व प्रेरककथांचे संकलन करून “गगनभरारी” पुस्तक औस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व स्वा. सावरकर सम्मेलनात झाले होते. या पुस्तकाची हिंदी, इंग्रजी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो