Details
डॉ. विजया वाड लिखित `दुर्गावतार’चे आज प्रकाशन!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल `दुर्गां’चा शानदार सत्कार सोहळा तसेच विजया वाड लिखित `दुर्गावतार’ पुस्तकाचे प्रकाशन राज्याच्या माजी मुख्य निवडणूक अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या आज, शनिवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत मुंबईच्या चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये होणार आहे.
लंडनमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे घर पंतप्रधानांना घेण्याची विनंती करणारी पहिली सूचक महिला व कमानीच्या संचालिका पद्मश्री कल्पना सरोज, मराठी शाळा वाचविण्यासाठी लढा देणारी वीणा सानेकर, महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी विजया निकम-पालव, पित्याचा खून झाल्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षांपासून आजतागायत गेली 25 वर्षे खतरनाकचा दिवाळी अंक प्रकाशित करणारी शूर व सृजनशील मुलगी सोनल खानोलकर, शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार सामाजिक भानासाठी मिळविणारी चतुरस्त्र अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, भारतातील पहिली अंध फिजिओथेरपिस्ट दिव्या बिजूर, वडार समाजातील स्त्रियांना सामाजिक आधार देणारी तरूणी सत्यभामा सौंदरमल, जगप्रसिद्ध नृत्यांगना संध्या पुरेचा, खाकी वर्दीतील मर्दानी, रश्मी करंदीकर, नापास मुलांची आई संगीता चव्हाण या दहा महिलांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच दुर्गावतार या पुस्तकाचे प्रकाशनदेखील नीला सत्यनारायण यांच्या हस्ते होणार आहे. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो