HomeArchiveसादरीकरण हा पारंपरिक...

सादरीकरण हा पारंपरिक दशावताराचा आत्मा – ओमप्रकाश चव्हाण

Details
सादरीकरण हा पारंपरिक दशावताराचा आत्मा – ओमप्रकाश चव्हाण

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

सतीश लळीत, माध्यमकर्मी
[email protected]
“सादरीकरण हा पारंपरिक दशावतार कलेचा आत्मा आहे आणि उत्स्फुर्त संवाद हीच या कलेची ‘प्रॉपर्टी’ आहे. ही पारंपरिकता आज ट्रीकसीन, नेपथ्याचा वापर अशा प्रकारांमुळे धोक्यात आली आहे. दशावतार जर मूळ रूपात टिकवायचा असेल तर पारंपरिक दशावताराचे प्रशिक्षण नव्या कलाकारांना देणे आवश्यक आहे”, असं मत ज्येष्ठ दशावतारी कलावंत कोकणगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे मी नुकतीच त्यांची प्रकट मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कवयित्री डॉ. सई लळीत आणि पत्रकार पराग गावकर यांनी आयोजित केलेल्या आणि रसिकांच्या भरगच्च गर्दीत झालेल्या या प्रकट मुलाखतीवेळी चव्हाण यांनी अनेक प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली आणि आपल्या कारकिर्दीला उजाळा दिला. चव्हाण मुलाखतीसाठी पारंपरिक दशावातारी स्त्रीवेशात उपस्थित झाले, त्यावेळी रसिकांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांचं स्वागत केलं. कार्यक्रमाच्या सुरूवातीला देवस्थान समितीचे खजिनदार गोविंद परब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व माजी सरपंच नंदू गावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. मी त्यांना श्रीगणेशाची तसबीर भेट दिली. चव्हाण यांच्या पत्नी प्रणाली यांचा सत्कार डॉ. सई लळीत यांच्या हस्ते साडीचोळी देऊन करण्यात आला.

सुमारे दीड तास चाललेल्या या मुलाखतीत एक कलावंत आणि आणि एक माणूस म्हणून चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडले. या क्षेत्रात कसे आलात, या प्रश्नावर ते म्हणाले की, आमच्या आमडोस गावात दरवर्षी स्थानिक हौशी कलाकारांची आणि दशावतारी मंडळांची बरीच नाटकं होत. आमच्या घरातील वातावरणही कलेला अनुकूल होतं. वडील या भागातील प्रख्यात भजनीबुवा होते. ते विशेषत: ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकं बसवून त्यांना संगीत देत. घरात नेहमी संगीतमय वातावरण असायचं. वडिलांकडे ‘नाटकातील गोड गाणी’ या नावाचं एक पुस्तक होतं. त्याच्या मुखपृष्ठावर बालगंधर्वांचं स्त्रीवेषातील छायाचित्र होतं. वडील नेहमी बालगंधर्वांबद्दल आदरानं बोलायचे. तो फोटो एका पुरूषाचा आहे, हे मला लहानपणी पटायचंच नाही. घरातल्या वातावरणामुळे मला संगीत, अभिनयाची आवड उपजतच होती. त्यामुळे शाळेत, नंतर गावच्या हौशी मंडळातून मी स्त्रीभूमिका करू लागलो.

दुसऱ्या एका प्रनाच्या उत्तरात ते म्हणाले की, आठवीपर्यंत शिक्षण झाल्यावर परिस्थितीमुळे 1982 साली काकांकडे मुंबईला शिकायला गेलो. खरं तर मुंबईला जाण्यामागे शिकण्यापेक्षाही नाट्यक्षेत्रात संधी मिळवणे, हाच उद्देश होता. त्यामुळे शाळेपेक्षा माझा वेळ शिवाजी मंदिर, रवींद्र, दामोदर या परिसरात फिरण्यात जायचा. पण खूप प्रयत्न करूनही मला संधी मिळाली नाही. अनेक कलाकारांना, दिग्दर्शकांना मी तिथे गाठायचो. पण माझ्यासारख्या खेडवळ, नवशिक्या, अर्धशिक्षित पोरसवदा नटाला कोण संधी देणार? अशी दोन वर्षे मुंबईत काढली आणि आईच्या गंभीर आजारपणामुळे गावी परतलो.

दशावतार नाटकात पहिली संधी कशी मिळाली, या प्रश्नावर ते म्हणाले की, गावी आल्यावर मी पुन्हा हौशी नाटकातून कामे करायला सुरूवात केली. दशावतारी नाटकांची मला फारशी आवड नव्हती. मात्र याच काळात तेव्हाचे अतिशय लोकप्रिय दशावतारी कलाकार बाबी नालंग यांनी आपल्या वालावलकर मंडळात मला पहिली संधी दिली. त्यांनी माझं काम बघितलं आणि ते खुश झाले. त्यावेळी त्यांनी केलेलं मार्गदर्शन मला आजही उपयोगी पडते.

आयुष्‌याला कलाटणी देणारी घटना कोणती, या प्रश्नावर चव्हाण म्हणाले की, एके दिवशी नाईक-मोचेमाडकर दशावतार कंपनीचे मालक बाबल नाईक यांची भेट झाली. त्यांनी गोव्यात सती महानंदा या नाटकाचा प्रयोग घेतला होता आणि महानंदेची भूमिका करणाऱ्या प्रमुख नटाची काहीतरी आकस्मिक अडचण उद्भवल्याने तो उपलब्ध नव्हता. त्यामुळे बाबल नाईकांनी एका प्रयोगासाठी मला बरोबर घेतले. मंडळातील बाकीचे कलावंत ज्येष्ठ आणि अनुभवी होते. माझ्याबद्दल त्यांचे फारसे अनुकूल मत दिसले नाही. एकंदर परिस्थिती पाहून मी ही संधी आव्हान म्हणून स्वीकारायचे ठरवले आणि त्यादिवशी जीव ओतून काम केले. नाटक आणि विशेषत: माझी भूमिका गोव्याच्या रसिकांनी उचलून धरली. याचदिवशी माझ्यातल्या खऱ्या दशावतारी कलावंताचा उदय झाला.

कला सादर करताना आलेला एखादा अविस्मरणीय प्रसंग कोणता, या प्रश्नाचे उतर देताना त्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या मंडळाचा लक्ष्मीची पावले हा नाट्यप्रयोग मुंबईला दामोदर नाट्यगृहात लागला होता. या प्रयोगात मी रूक्मिणीची भूमिका करतो. प्रयोगाच्या मध्यंतरात एक वयोवृद्ध गृहस्थ काठी टेकीत टेकीत रंगपटात आले आणि माझ्यासमोर येऊन म्हणाले मुली, कमाल केलीस. मला सत्तर वर्षे मागे घेऊन गेलीस. ते भावनावेगाने एवढे अनावर झाले होते की त्यांचा कंठ दाटून आणि डोळे भरून आले होते. मला काय करावे ते सुचेना. मी प्रश्नार्थक मुद्रेने तेथे असलेल्या राजा मयेकरांकडे पाहिले. मयेकरांनी खुलासा केला. अरे, हे प्रख्यात ऑर्गनवादक गजाननबुवा बोरकर. बालगंधर्वांसोबत ते ऑर्गन वाजवायचे. नंतर कळले की प्रकृती बरी नसतानाही ते मुद्दाम माझा स्त्रीपार्ट पाहयला आले होते आणि माझी भूमिका पाहून भूतकाळात पोहोचले होते. त्यांच्यासारख्या ज्येष्ठांनी केलेलं कौतुक हीच माझी खरी कमाई आहे.

आज तीस वर्षांनंतर मी या क्षेत्रात स्थिरावलो आणि स्वत:ची प्रतिमा निर्माण केली असली तरी सुरूवातीला मला परिस्थितीशी खूप झगडावे लागले. माझा स्वभाव थोडासा अबोल आहे. सुरूवातीच्या काळात सहकलाकारही हेटाळणी करायचे. त्यामुळे काम करताना दबाव यायचा. खूप एकटेपणा जाणवायचा. पण मी खूप चिकाटीने तग धरून राहिलो आणि अंगभूत गुणांनी सर्वांना जिंकले, अशी आठवण त्यांनी सांगितली. आपल्या आजपर्यंतच्या यशाचे श्रेय कारकिर्दीच्या सुरूवातीला भेटलेल्या बाबी नालंग, बाबल नाईक, संगीतकार अर्जुन तावडेबुवा, गजानन दारवळकर यांच्यासारख्यांना असेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.

मुंबईच्या संगीत कला केंद्राने दिलेला आदित्य विक्रम बिर्ला कलाकिरण पुरस्कारावेळची अविस्मरणीय आठवण सांगताना ते म्हणाले की, मुंबईच्या षण्मुखानंद प्रेक्षागृहामध्ये झालेल्या समारंभात तेव्हाचे राज्यपाल मोहम्मद फजल यांच्या हस्ते आणि अभिनेता शाहरूख खान याच्या उपस्थितीत हा पुरस्कार मला देण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभात मी पहिल्या रांगेत स्त्रीवेषात बसलो होतो. मला कोणीही ओळखले नाही. आयोजक कोकणातून आलेल्या कलावंताच्या शोधात होते आणि तो सापडत नसल्याने हैराण झाले होते. अखेर कार्यक्रम सुरू झाला आणि माझे नाव पुकारून प्रेक्षागृहात असल्यास व्यासपीठावर येण्याची विनंती करण्यात आली. मी स्त्रीवेशात जेव्हा व्यासपीठावर गेलो, तेव्हा बहुतेकांना वाटले की, ही स्त्री म्हणजे बहुधा ओमप्रकाशची प्रतिनिधी असेल. पण मी आपणच ओमप्रकाश असल्याचे सांगताच सगळे अवाक झाले. तेथे उपस्थित असलेले +कमलाकर सोनटक्के यांनी दुजोरा देत ही स्त्री नसून ओमप्रकाशच आहे, असे सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. कार्यक्रमानंतर शाहरूख खानने रंगपटात ओमप्रकाशची खास भेट घेऊन माझे कौतुक केले.

काळानुसार या कलेतही काही बदल होत आहेत. परंपरागत मंडळांच्या जोडीने अनेक नवी हौशी दशावतार मंडळे स्थापन होत आहेत. वार्षिक उत्सवाशिवाय अन्य वेळीही आख्याने लावली जात आहेत. यामुळेच या कलेचे थोडेसे व्यावसायिकरण, आधुनिकीकरण होत आहे. कलेशी काही तडजोडी केल्या जात असल्याचे दिसत आहे. पौराणिक कथाभागांऐवजी काल्पनिक कथाभागांचे सादरीकरण होताना दिसत आहे. एवढेच काय, कोणत्याही प्रकारचे नेपथ्य नसणे हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य असलेल्या या कलेच्या सादरीकरणावेळी ट्रीकसीन्सचा वापर करण्याचेही प्रकार घडले आहेत, याबाबत विचारता चव्हाण यांनी सविस्तर मत व्यक्त केले.

ते म्हणाले की, वेशभूषा, रंगभूषा, शब्दसामर्थ्य, संगीत आणि मुख्य म्हणजे सादरीकरण ही या कलेची बलस्थाने आहेत. या कलेचे मूळ स्वरूप जपताना ही बलस्थाने जपायला हवीत. नवीन बदलांच्या विरोधात मी नाही. कारण बदल होतच असतात. पण त्यामुळे कलेच्या मूळ गाभ्याला, स्वरूपाला धक्का लागता नये. बाह्य गोष्टींवर जास्त भर दिला, तर शब्दसामर्थ्य कमी होण्याची भीती आहे. यासाठी खूप काळजीपूर्वक जुन्याची आणि नव्याची सांगड घालायला हवी. कारण आधुनिक जमान्यात ही कला जिवंत ठेवायची असेल तर नव्या पिढीसाठी थोडे बदल करावे लागतील. मात्र यासाठी या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांनी जुन्याजाणत्या कलावंतांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. ज्या कलेमुळे मी मोठा झालो, तिचा आत्मा हरवता नये, अशीच माझी इच्छा आहे. यासाठी पारंपरिक दशावतार प्रशिक्षण केंद्र सुरु होण्याची मोठी गरज असल्याचे प्रतिपादन चव्हाण यांनी केले.
(छायाचित्रे: अदिती लळीत)”
 
“सतीश लळीत, माध्यमकर्मी

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content