HomeArchiveपत्रकारांसाठी लोकसभा निवडणूक...

पत्रकारांसाठी लोकसभा निवडणूक निकाल अंदाज स्पर्धा!

Details
पत्रकारांसाठी लोकसभा निवडणूक निकाल अंदाज स्पर्धा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
23 मे हा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे तसतशी लोकसभा निवडणूक निकालांबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असून केवळ राजकीय निरीक्षक किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीच नव्हे तर सुजाण नागरिकही निवडणूक निकालांबाबतची आपली भाकिते मोठ्या विश्वासाने व्यक्त करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबईसह महाराष्ट्रातील मराठीभाषिक पत्रकारांसाठी लोकसभा निवडणूक निकाल अंदाज स्पर्धा जाहीर केली आहे.

ही स्पर्धा दोन प्रकारात विभागण्यात आली आहे. मुंबईच्या सहा जागा, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड आणि मावळ आदी भागांचा समावेश असणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक निकालांचे अचूक अंदाज वर्तविणाऱ्या पत्रकारास 5001/- रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. एकाहून अधिक विजेते असल्यास पारितोषिकाची रक्कम विभागून देण्यात येईल.

स्पर्धेच्या दुसऱ्या प्रकारासाठी रोख 10,001/- रूपयांचे पारितोषिक आले असून स्पर्धकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच्यासर्व 48 लोकसभा मतदारसंघांचे अचूक अंदाज वर्तविण्याचे आव्हान आले आहे. याही विभागात एकाहून अधिक विजेते असल्यास पारितोषिकाची रक्कम विभागून देण्यात येईल. ही स्पर्धा विनाशुल्क असून महाराष्ट्रातील सर्व मराठीभाषिक पत्रकारांना ती खुली आहे. इच्छुकांना स्पर्धेच्या कोणत्याही एका प्रकारात वा दोन्ही प्रकारात भाग घेता येईल. स्पर्धकांना प्रत्येक गटासाठी एकेक प्रवेशपत्रिकाच पाठविता येईल.

स्पर्धकांनी आपल्या अचूक निकालपत्रिका, दोन स्वतंत्र लिफाफ्यातून व त्यावर तसा स्पष्ट उल्लेख करून, अध्यक्ष/कार्यवाह, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई 40001 या पत्त्यावर शनिवार दि. 18 मे, 2019 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्या. तद्नंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. स्पर्धा निकालाबाबतचा अंतिम निर्णय मुंबई मराठी पत्रकार संघाचा असेल व तो सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. या स्पर्धेचा निकाल दि. 24 मे 2019 रोजी जाहीर होईल. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिन सोहळ्यात, 21 जून 2019 रोजी सायंकाळी पारितोषिक वितरण होईल. पत्रकार बांधवांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेऊन ती यशस्वी करावी, असे आवाहन पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी केले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content