Details
“स्वा. सावरकर स्मारकाचे शौर्य, विज्ञान, स्मृतिचिन्ह पुरस्कार वितरीत!”
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शौर्य पुरस्कार किर्तीचक्र विजेते एस. डब्ल्यू. आर. विजय कुमार यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला तर ऐरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक, इस्त्रो, डीआरडीओ, आयआयटी (मुंबई)चे संशोधक डॉ. गिरीश देवधरे यांना विज्ञान पुरस्कारानं सन्मानित केले गेले. स्मृतीचिन्ह पुरस्कार वडोदरा येथील निवृत्त कर्नल विनोद फळणीकर आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला.
सावरकरांसारख्या महापुरूषाचे विचार साहित्याच्या माध्यमातून अमर राहणार आहेत. कारण त्याचा पायाच सर्वार्थाने मजबूत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली. केवळ देशासाठी त्यांचे क्रांतीकार्य आहे. यंदाची झालेली निवडणूक ही चौथी पानिपतची लढाईच आहे. भारताचे तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात ही निवडणूक होती. या लढाईत झालेला पराभव हा अब्दालीला बोलावणाऱ्यांचा होता. 26/11 ला हल्ला घडवून आणणाऱ्यांचा होता, असे विचार `रॉ’चे निवृत्त अधिकारी आर. एस. एन. सिंह यांनी स्वा. सावरकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमात `स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रवाद’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.
यावेळी हे मृत्युंजय नाटकाचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे सुनील वालावलकर आणि साधना वालावलकर तसेच स्वातंत्र्यवीर दौड 2019 चे यशस्वी आयोजन करणारे विज्ञानेश मासावकर व वैदेही मासावकर या दोन्ही दांपत्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, पदाधिकारी, विश्वस्त तसेच नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो