Details
गणवेश आणि पोषाख..
01-Jul-2019
”
भगवान निळे
[email protected]
कमरेला बंदूक, हातात दंडुका
अन्
अंगावर वर्दी नसते तेव्हा
माझा मित्र मला माझ्यासारखाच दिसतो.
तो खळखळून हसतो..
आपलेपणानं खुशाली विचारतो..
स्वतःची गाऱ्हाणीही मांडतो..
पापण्याही ओल्या करतो..
गणवेश चढवल्यावर तो
मला परका वाटू लागतो..
अगदी तसंच,
माझी मुस्लिम मैत्रीण जेव्हा
काळा बुरखा घालून बाहेर पडते
अन दुसरा एक हिंदू मित्र
भगवे वस्त्र घालून टिळा लावतो
तेव्हाही मला ते परकेच वाटतात..
श्रेष्ठत्व, धाक नि वेगळेपण
जपण्याच्या या डावात
गणवेश अन विशिष्ट धार्मिक पोशाख
यात दडलेला माणूस मात्र
मला नेहमीच आपला वाटतो.”
“भगवान निळे
[email protected]
कमरेला बंदूक, हातात दंडुका
अन्
अंगावर वर्दी नसते तेव्हा
माझा मित्र मला माझ्यासारखाच दिसतो.
तो खळखळून हसतो..
आपलेपणानं खुशाली विचारतो..
स्वतःची गाऱ्हाणीही मांडतो..
पापण्याही ओल्या करतो..
गणवेश चढवल्यावर तो
मला परका वाटू लागतो..
अगदी तसंच,
माझी मुस्लिम मैत्रीण जेव्हा
काळा बुरखा घालून बाहेर पडते
अन दुसरा एक हिंदू मित्र
भगवे वस्त्र घालून टिळा लावतो
तेव्हाही मला ते परकेच वाटतात..
श्रेष्ठत्व, धाक नि वेगळेपण
जपण्याच्या या डावात
गणवेश अन विशिष्ट धार्मिक पोशाख
यात दडलेला माणूस मात्र
मला नेहमीच आपला वाटतो.”