Details
दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान!
23-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
शुक्रवारी मुंबईत मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ‘पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार २०१९’ प्रदान करण्यात आले. कवयित्री मल्लिका अमर शेख, शाहीर शीतल साठे, कथाकार मेघना पेठे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीसाठी पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. रोख ११ हजार, शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचे पुरस्काराचे २२वे वर्ष आहे.
हिंदी साहित्यिक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या जूठन आत्मकथनाच्या उष्टं, या मराठी अनुवादासाठी मंगेश बनसोड यांना बलुतं पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रंथाली चळवळीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. बलुतं पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. रोख ११ हजार, पुरस्कार आणि गोधडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आलबेल आहे, असे नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न सार्वकालीक आहे. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य कधीच नव्हते, असे सांगत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा एकाकी द्यावा लागतो, हे अत्यंत दुख:द आहे, असे मत कथाकार मेघना पेठे यांनी यावेळी व्यक्त केले.
देशात अस्मितांचे तण माजले आहे. त्यामुळे दुखरेपणा वाढला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जास्त घाला पडत आहे. बलुतंमधील दुख: केवळ दलित्वाचं नाही. ते अखिल मानव जातीचे आहे. म्हणूनच माझ्यासारख्या निम्न मध्यवर्गीय दलित नसलेल्या व्यक्तीस बलुतं भावले, असे सांगत दलित साहित्यातले शब्द पुढच्या पिढ्यांना समजण्याची सोय का नसावी, असा मुद्दा त्यांनी मांडला.
मराठीत बलुतं जितके महत्त्वाचे आहे, तितके जूठन हिंदीत आहे, असे सांगून मैला वाहणारे व गटार साफ करणाऱ्यांची वेदना इतरांपर्यंत पोहोचावी, अशी जूठनच्या अनुवादामागची भूमिका होती, असे मंगेश बनसोड म्हणाले.
देशात आज कलाकार व अल्पसंख्याक यांच्यासाठी परस्थिती ठिक नाही. भारतातले खरे राजकारण सांस्कृतिक असून ते कलाकार चालवतात. पण, त्यांना स्थान मात्र दिले जात नाही, असा मुद्दा शाहीर शीतल साठे यांनी मांडला.
भारतात सरकारांना आता पुस्तकाची भीती वाटू लागली आहे. याचा अर्थ समाजाची अधोगती चालू आहे, असे ज्येष्ठ पत्रकार प्रतीमा जोशी म्हणाल्या. दलित शब्दावर बंदी घालून आज दलित साहित्य व चळवळीचा वारसा पुसून टाकला जातो आहे. अशा काळात दलित चळवळीशी जोडून घेण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न असल्याचे प्रतिष्ठानच्या संयोजिक व कवयित्री प्रज्ञा दया पवार म्हणाल्या.
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हीराबाई दया पवार यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. पुरस्कार्थीचा परिचय विणा सानेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन बाळ सराफ यांनी केले. व्यासपीठावर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रतीमा जोशी, समीक्षक डॉ. हरिश्चंद थोरात आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे होते.”
केएचएल न्यूज ब्युरो
“शुक्रवारी मुंबईत मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ‘पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार २०१९’ प्रदान करण्यात आले. कवयित्री मल्लिका अमर शेख, शाहीर शीतल साठे, कथाकार मेघना पेठे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीसाठी पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. रोख ११ हजार, शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचे पुरस्काराचे २२वे वर्ष आहे.”
“हिंदी साहित्यिक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या जूठन आत्मकथनाच्या उष्टं, या मराठी अनुवादासाठी मंगेश बनसोड यांना बलुतं पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रंथाली चळवळीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. बलुतं पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. रोख ११ हजार, पुरस्कार आणि गोधडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे.”
“भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आलबेल आहे, असे नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न सार्वकालीक आहे. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य कधीच नव्हते, असे सांगत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा एकाकी द्यावा लागतो, हे अत्यंत दुख:द आहे, असे मत कथाकार मेघना पेठे यांनी यावेळी व्यक्त केले.”
“देशात अस्मितांचे तण माजले आहे. त्यामुळे दुखरेपणा वाढला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जास्त घाला पडत आहे. बलुतंमधील दुख: केवळ दलित्वाचं नाही. ते अखिल मानव जातीचे आहे. म्हणूनच माझ्यासारख्या निम्न मध्यवर्गीय दलित नसलेल्या व्यक्तीस बलुतं भावले, असे सांगत दलित साहित्यातले शब्द पुढच्या पिढ्यांना समजण्याची सोय का नसावी, असा मुद्दा त्यांनी मांडला.”
“मराठीत बलुतं जितके महत्त्वाचे आहे, तितके जूठन हिंदीत आहे, असे सांगून मैला वाहणारे व गटार साफ करणाऱ्यांची वेदना इतरांपर्यंत पोहोचावी, अशी जूठनच्या अनुवादामागची भूमिका होती, असे मंगेश बनसोड म्हणाले.”
“देशात आज कलाकार व अल्पसंख्याक यांच्यासाठी परस्थिती ठिक नाही. भारतातले खरे राजकारण सांस्कृतिक असून ते कलाकार चालवतात. पण, त्यांना स्थान मात्र दिले जात नाही, असा मुद्दा शाहीर शीतल साठे यांनी मांडला.”
“भारतात सरकारांना आता पुस्तकाची भीती वाटू लागली आहे. याचा अर्थ समाजाची अधोगती चालू आहे, असे ज्येष्ठ पत्रकार प्रतीमा जोशी म्हणाल्या. दलित शब्दावर बंदी घालून आज दलित साहित्य व चळवळीचा वारसा पुसून टाकला जातो आहे. अशा काळात दलित चळवळीशी जोडून घेण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न असल्याचे प्रतिष्ठानच्या संयोजिक व कवयित्री प्रज्ञा दया पवार म्हणाल्या.”
“प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हीराबाई दया पवार यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. पुरस्कार्थीचा परिचय विणा सानेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन बाळ सराफ यांनी केले. व्यासपीठावर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रतीमा जोशी, समीक्षक डॉ. हरिश्चंद थोरात आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे होते.”

